सैय्याँ छेड़ देवे, ननद चुटकी लेवे
ससुराल गेंदा फूल
सास गारी देवे, देवर समझा लेवे
ससुराल गेंदा फूल
ह्या गणपती गेट टुगेदर मध्ये आयुष्य असं झालं असेल तर,
हे मॉकटेल बनवा पटकन
सगळ्यांना chill करा झटकन!
त्यासाठी साहित्य:
१. गेंदा फूल म्हणजे आपला झेंडू (edible असलेला) - चार मोठी फुले
२. लिची - साधारण दहा लिचीचा रस
३. परदेसियाss छोटी संत्री - २, एका संत्र्याचा रस, एकाचे स्लाइस
४. गरम पाणी
५. साखर
६. खडे मीठ
७. अर्धी चिमूट चाट मसाला
८. बर्फाचे तुकडे
कृती:
१. तीन फुलांच्या पाकळ्या ब्लेंडरमधून जरा पाणी घालून प्युरी केल्या. मग गॅसवर जरासं पाणी आणि चमचाभर साखर गरम करून त्यात ती प्युरी ओतून ढवळली. अगदी पाक व्हायच्या आधीच गॅस बंद केला.
२. लिची आणि संत्री रस काढून ठेवला. एका संत्र्याचे स्लाइस केले.
३. आता एक मोठा/उंच ग्लास/मेसन जार घेऊन त्याच्या काठाला मध लावला आणि तो उलटा धरून झेंडूच्या पाकळ्या आणि मिठाच्या मिश्रणातून फिरवला. मग सरळ करून त्यात बर्फ भरला. त्यात मधे मधे संत्र्याचे चे स्लाइस टाकले. मग हळूहळू बेस म्हणून झेंडू सिरप ओतले. मग लिची आणि शेवटी संत्र्याचा रस. थोडं स्ट्रॉने ढवळलं. वरून चाट मसाला भुरभुरवला. थोडं कडेला ऑरेंज स्लाइस, शेजारी झेंडू ठेऊन सजवलं आणि tada!!
(हा मोठा केशरी झेंडू edible आहे. किंचित मिरमिरी आणि तिखटसर चव/फ्लेवर असतो.)

हे परत सकाळी!

काय सुंदर गं मॅगी!!! मी
काय सुंदर गं मॅगी!!! मी नुकताच विचार करत होते की जास्वंद झाला गुलाब झाला आता झेंडू आणि गोकर्ण येणार!!
फारच मोहक दिसतंय.भारी आयडीया.
मस्त दिसतंय!!
मस्त दिसतंय!!
झेंडू च्या वापराबाबत मला खात्री नव्हती.
छानच.
छानच.
मस्त दिसतय
मस्त दिसतय
झेंडू खातात हे आज तुझ्यामुळे कळलं. करुन बघेन हे
अनु, गोकर्ण रुसलाय माझा नाहीतर मला तो वापरुन करायचं पेयं डोक्यात तयार होतं. बघू फुलतोय का एक दोन दिवसात
फारच सुंदर दिसतय.
फारच सुंदर दिसतय.
गोकर्ण रुसलाय माझा नाहीतर मला
गोकर्ण रुसलाय माझा नाहीतर मला तो वापरुन करायचं पेयं डोक्यात तयार होतं. बघू फुलतोय का एक दोन दिवसात
Same pinch. एरवी दिवसाला दिडशे दोनशे फुले देणारा आमचा गोकर्ण पण रुसलाय. सध्या कुठेच नाही मिळत.
बाकी पेय छानच
बाकी पेय छानच
अरे वाह मस्त दिसतेय
अरे वाह मस्त दिसतेय
एक फेस्टिव्ह लूक आला आहे
गोकर्ण नसेल पण प्राजक्त असेल
गोकर्ण नसेल पण प्राजक्त असेल तर त्याची डेखं केशरी रंगासाठी वापरून ही काही करता येईल. ती डेखं पण खाऊ शकतो.
अरे वा! ममो हे मस्त सांगितलेत
अरे वा! ममो हे मस्त सांगितलेत. आहे प्राजक्त बागेत
अरे वा !! रंग कसला सुरेख आला
अरे वा !! रंग कसला सुरेख आला आहे! भारी आयडिया मॅगी!
आहाहा सहीच, कसलं केशरी कलरफुल
आहाहा सहीच, कसलं केशरी कलरफुल आहे. छान इनोव्हेटिव्ह.
सगळ्यांना धन्यवाद.. मला निळा
सगळ्यांना धन्यवाद.. मला निळा रंग खूप आवडतो म्हणून गोकर्णच होता लिस्टवर, पण ती फुलं मिळाली नाहीत.
झेंडूचं पाकळ्याखालचं खोबरं आम्ही लहानपणी खायचो, पण पाकळ्या खातात हे माहिती नव्हतं. बरंच शोधून नक्की हाच झेंडू edible आहे हे कळलं. घरातलं वादळ बाहेर गेल्यावर घाईघाईत करून फोटो काढले.
आणि तिथेच बसून सिप करत श्रम परिहार केला! चव खरंच भन्नाट आली होती. यातच 30ml vodka घालून कॉकटेलसुद्धा छान होईल.
आहा.. रंग काय सुरेख आलाय!
आहा.. रंग काय सुरेख आलाय!
झेंडू फुले edible आहेत हे
झेंडू फुले edible आहेत हे माहित नव्हते
+ १
छान दिसतंय.
छान दिसतंय.
वा सुंदरच. फक्त फोटॉ बघूनच
वा सुंदरच. फक्त फोटॉ बघूनच झेंडू एडिबल असतो का विचारणार होते पण त्याचं उत्तर मिळालं.
सुंदर दिसतंय पेय फार. करून
सुंदर दिसतंय पेय फार. करून बघणार नक्की.
Btw, monsoon wedding मध्ये डेकोरेटर असलेला विजय राज येताजाता झेंडूची फुलं खात असतो. तोच आठवला एडिबल झेंडूवरून.
भारी दिसतंय मॉकटेल!
भारी दिसतंय मॉकटेल!
धन्यवाद!
धन्यवाद!
मला हम तुममध्ये सुरुवातीला मंडप डेकोरेट करणारा माणूस काहीतरी विचारल्यावर गेंदे का फूल उत्तर देतो तेव्हा तोंड वाकडं करून गेंदे का फूल?? विचारणारा सैफ आठवला होता 
श्र, कसलं भारी character आहे ते पण हे पाकळ्या खाण्याचे विसरूनच गेले होते. तू लिहिल्यावर आठवलं.
Mocktail घरी केलं तर एका ग्लास साठी साधारण दोन टेबलस्पून झेंडू सिरप घाल, 100 ml लिची रस आणि 90 ml संत्री रस.
मस्त वेगळी कल्पना आहे ही.
मस्त वेगळी कल्पना आहे ही. छान लागेल.
धन्यवाद पारिजाता
धन्यवाद पारिजाता
रंग अफाट सुंदर आहे..
रंग अफाट सुंदर आहे..
झेंडूच्या पाकळ्या कधी खाण्याचा विचार नव्हता केला.
मस्त दिसतंय मॉकटेल.रंग सुंदर
मस्त दिसतंय मॉकटेल.रंग सुंदर आलाय.
व्वा जबरदस्त दिसतंय.
व्वा जबरदस्त दिसतंय. Presentation उच्च!!.
लहानपणी झेंडूच फुलातील खोबरं खाल्लं आहे मागे कोणत्यातरी व्हॉट्सअँप पोस्टमध्ये पाकळ्या खातात ही माहिती मिळाली. मिरमिरीत चव... करून पाहणार.
रंग जबरी आलाय..मस्त..
रंग जबरी आलाय..मस्त..
भारीच कल्पना आहे.
भारीच कल्पना आहे.
झेंडू फुले edible आहेत हे माहित नव्हते >>> +१
४ मोठी फुले म्हणजे स्वाद नक्कीच जाणवत असणार.
धन्यवाद
धन्यवाद
माधव, एवढी नाही वापरली. तीन फुलांचा रस काढला, तो थोडा आटवला आणि एका जारसाठी दोन चमचे घातला. चव फारशी नाही, पण फ्लेवर मस्त आला.
मारिगोल्ड एडिबल आहे हे माहीत
मारिगोल्ड एडिबल आहे हे माहीत नव्हते आम्ही लहानपणी, त्याचे खोबरे म्हणजे तो मधला भाग खात असू मला वाटते.
हो बरोबर सामो. पण तसे तर आपण
हो बरोबर सामो. पण तसे तर आपण काही जास्वंद किंवा गोकर्ण फुलंसुद्धा डायरेक्ट चावून खात नाही. ह्या सगळ्यांचे वाळलेल्या पाकळ्यांचे टी करण्याचे fad आले आणि आता सगळे करतात. Dried झेंडूच्या पाकळ्या सुद्धा marigold tea म्हणून मिळतात. डायरेक्ट पाकळ्या खाण्याचे फुल गुलाबच आहे.