शशक स्पर्धा - झेलम - वार (शांत रस, श्लेष अलंकार)

Submitted by झेलम on 17 September, 2026 - 17:58

“अरे मधू असा काय घुटमळतो आहेस बाहेर? आत ये. सत्यनारायणाचं दर्शन घे आणि जेवायला बस’. पहिल्यांदाच देशमुखांकडे आलेला मधू त्यांचे शब्द ऐकून भानावर आला.

मागे एका घरी तो नादात आत पानावर जाऊन बसला तेव्हा वारावरच्या मुलांची सोय बाहेर आहे असं सांगून त्याला भरल्या ताटावरून उठवलं होतं. वय लहान असलं तरी अपमानाचा तो वार मधू विसरला नव्हता.

“सूनबाई हा मधू. आपल्याच गावच्या शाळेत शिकतो. तुम्ही जबाबदारी मागत होता ना? मधू शाळेत जाण्याआधी आपल्याकडे जेवायला येईल. त्याचं जेवणखाण व्यवस्थित होतंय हे बघाल तुम्ही? घ्याल ही जबाबदारी?

नववधूचं तेज चेहऱ्यावर आलेल्या सूनबाईंनी आनंदाने मान डोलावली आणि मधूला माजघरात मांडलेल्या पानावर बसायची खूण केली.

रस – शांत
अलंकार – श्लेष
शब्द संख्या – 100

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान.