Submitted by स्वाती_आंबोळे on 17 September, 2026 - 16:03
खेद न कसला, खंत न काही
खळबळ खदखद उरली नाही
खेळ आवरुन खोल सागरी
निखळ नितळ जळ वाहत जाई
खळाळ बाळपणींचा ठेवा
खट्याळ वळणे तारुण्याची
उमगुन येणे खाचाखोचा
हीच खरी खुण पक्वपणाची
दर्या नि खोरी खोदत फुलवत
खूप खेळुनी झाले आहे
खडकांवरती कभिन्न काळ्या
खळ्ळ आदळुन झाले आहे
खाचा, खळगे मागे पडले
तशाच विरल्या लाटा लहरी
अखेरीस ये वळण असेही
अखंड तृप्ती केवळ उरली
क्षितिजावरती सुवर्ण खिरते
नभोमंडळी किलबिलती खग
प्रवास आखिव काठांमधला
अखेर होई अथांग, व्यापक
उथळ दिसो वा सखोल भासो
ख्याती होवो वा अपकीर्ती
विलीनता उदधीच्या उदरी
या यात्रेची ही परिपूर्ती
आठ रसांच्या विसर्जनातुन
शांत रसाची हो निष्पत्ती
शब्दसंख्या : १००
रस : शांत
अलंकार : अनुप्रास, यमक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच सुंदर ! खरंच
फारच सुंदर ! खरंच परिपूर्तीच्या शांततेची अनुभूती पोचली. अगदी निर्माल्यासारखी शांत आहे.
खाचा, खळगे मागे पडले
खाचा, खळगे मागे पडले
तशाच विरल्या लाटा लहरी
अखेरीस ये वळण असेही
अखंड तृप्ती केवळ उरली >> क्या बात है!
विलीनता उदधीच्या उदरी >> हा अनुप्रास आवडला.
शेवटी आठ रसांतुन शांत रस निष्पन्न होवो. हे फार उच्च प्रकारे आलं आहे. आवडलीच!
निव्वळ अहाहा!
निव्वळ अहाहा! आवडेश
फारच सुंदर स्वाती.
फारच सुंदर स्वाती.
अगदी, का च्या का फॉरवर्ड चा दोष पत्करून म्हणावेसे वाटते, की जीवनाचे प्रतिबिंबच या जलाच्या प्रवाहगीतात उतरले आहे !
सुंदर!
सुंदर!
कवितांचा उपक्रम ठेवला नाही तरी आमचं काही अडत नाही!
खिरते हा नवा शब्द कळला.
सुन्दर...
सुन्दर...
सुंदर!
सुंदर!
@भरत, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. (स्वप्नाची समाप्ती)
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
आठ रसांच्या विसर्जनातुन
शांत रसाची हो निष्पत्ती >>> उच्च!!!
उत्तम! खळ्ळास कविता!!
उत्तम! खळ्ळास कविता!!
सुंदर !
सुंदर !
सुंदर !
सुंदर !
सर्व अभिप्रायांसाठी मनःपूर्वक
सर्व अभिप्रायांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
>>> कवितांचा उपक्रम ठेवला नाही तरी आमचं काही अडत नाही!

>>> खिरते हा नवा शब्द कळला
वावेने एक उदाहरण दिलंच आहे.
बोरकरांच्या कवितेतही आहे ना - 'क्षितिजी आले भरते गं, घनांत कुंकुम खिरते गं'
शिरते/विखुरते अशा अर्थी वापरतात.
नितांत सुंदर.. शांतरसपरिपोष..
नितांत सुंदर.. शांतरसपरिपोष..
अतिशय सुंदर कविता आहे.
अतिशय सुंदर कविता आहे.
परिपक्वतेचे, आणि प्रगल्भतेचे मापदंड नक्की मांडते.
>>>खडकांवरती कभिन्न काळ्या
खळ्ळ आदळुन झाले आहे
या ओळींवार मला तरी खूप कसंतरी झाले.
व्वा! फारच छान.
व्वा! फारच छान.
<<अखंड तृप्ती केवळ उरली>>
<<खडकांवरती कभिन्न काळ्या
खळ्ळ आदळुन झाले आहे>>
<<खाचा, खळगे मागे पडले
तशाच विरल्या लाटा लहरी
अखेरीस ये वळण असेही
अखंड तृप्ती केवळ उरली >>
या सर्व ओळी फारच आवडल्या.
स्वानंदी१ यांची क्षमा मागून
स्वानंदी१ यांची क्षमा मागून त्यांचेच वाक्य चोरतो. मला कुठे जमतय् असे लिहायला!
<< जीवनाचे प्रतिबिंबच या जलाच्या प्रवाहगीतात उतरले आहे !>>>
सुंदर कविता!
सुंदर कविता!
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
मला त्या प्रसिद्ध गोष्टीची आठवण झाली. ळ अक्षर वापरून झालेली घननीळा लडिवाळाची रचना.... तसंच काहीसं इथे जाणवलं. 'ख', 'ळ' अशी भारदस्त मंडळी सहसा इतक्या मोठ्या संख्येने, तीही चपखल आणि तरीही सहजपणे.... कवितेत सामावली जात नाहीत. मला हेही खूप खास वाटलं!
अभिवाचन असतं तर "वन्स मोअर" म्हणता आलं असतं इतकं आवडलंय.
अप्रतीम शब्दकळा
अप्रतीम शब्दकळा
एक अभिवाचनाचा ऑडीयो येऊच दे कसा!
उच्च !
उच्च !
सुंदर! जमली आहे.
सुंदर! जमली आहे.
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
खरंच अप्रतीम शब्दकळा!
खरंच अप्रतीम शब्दकळा!
कमाल कमाल भारी आहे हे! वरवर
कमाल कमाल भारी आहे हे! वरवर वाचताना एखाद्या व्यक्तीच्या साठीकरता/निवृत्तीच्या वेळी (यात काहीही खोचक निर्देश वगैरे नाही
) रचलेली यमकप्रधान कविता वाटते. पण जसे नीट वाचत जाऊ तसे हे काहीतरी वेगळेच आहे हे लक्षात येते! फारच सुंदर!
शशक मधे गद्य लिहीणेही जिथे अवघड आहे तिथे यमक, प्रास वगैरे जमलेली कविता आणि शांतरसाचा असा वापर! रिस्पेक्ट!
अप्रतिम! आत्ता पाहिली ही!
अप्रतिम! आत्ता पाहिली ही! शब्द्सामर्थ्य अफाट आहे. इतक्या कमी शब्दात केवढे काही म्हणून गेलीस!. झक्कींच्य शब्दात आख्ख्या कवितेचे सार "जिंदगी ख्वाब है" फेज असे त्याहून फार कमी शब्दात म्हणता येईल ते एक असो
फारच सुंदर... काव्य शशक.
फारच सुंदर... काव्य शशक.
खिरते हा नवा शब्द कळला.
फार सुंदर. स्वाती
फार सुंदर. स्वाती
अप्रतिम आहे
अप्रतिम आहे
खूपच छान
खूपच छान
सुरेख!
सुरेख!
Pages