पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - चवींचा त्रिवेणी संगम - रोझ ऑरेंज मोहितो - निल्स_23

Submitted by निल्स_23 on 17 September, 2026 - 14:04

स्पर्धेचा हा विषय इंटरेस्टिंग आहे फार.
मोहीतो हे आवडते पेय आहेच. तेच माॅडिफाय करून स्पर्धेच्या नियमात बसविले.
साहीत्य म्हणाल तर नेहमीचे आपले लिंबू सरबताचे. लिंबू, मीठ आणी साखर.
पण आधी एका ग्लासमध्ये मस्त हिरवागार पुदिना, खाता येणाऱ्या गुलाबाची पाने, एखाद दोन संत्र्याच्या फोडी छान खलून घ्यायच्या. त्यात थोडेसे पाणी आणी लिंबाच्या सरबताचे साहित्य घेऊन मिक्स करायचे.
नंतर एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घ्यायचा. त्यात हे सरबताचे मिश्रण, संत्र्याचा रस आणी हवा असल्यास सोडा घालायचा. आणी एक दालचिनीचा छोटा तुकडा.
छान मिसळून घ्यायचे आणी आपले रिफ्रेशिंग रोझ ऑरेंज मोहितो तयार.
एक विसरलेच कि थोडे रोझ वाॅटर किंवा रोझ सिरप घालायचे.
करून बघा नक्की.
मी सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या घालून आईस क्युब्ज बनवले.

Screenshot_20260917_223814_Gallery.jpgScreenshot_20260917_233236_Gallery.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

व्वा मस्तच.
तुमची एन्ट्री येणार ह्याची १००% खात्री होती.
गुलाब पाकळ्यांचा बर्फ...मस्तच

मस्त! मलाही ती गुलाबपाकळ्या घातलेल्या आइसक्यूब्जची कल्पना आवडली आहे.
आधी मला द्राक्षं आहेत असं वाटलं - तीही फ्रीझ करून आईसक्यूब्जसारखी वापरतात.