Submitted by द्वैत on 16 September, 2026 - 09:51
पहाटेचे निळे ऊन
उतरते मृगजळी
साऱ्या वाटा ओळखीच्या
वाटतात अशावेळी
वाटतात ओळखीच्या
साऱ्या जागा साऱ्या खुणा
तरी ओळखीचे काही
फसविते पुन्हा पुन्हा
शाप ज्याला तहानेचा
त्याला सारे अवगत
सवयीची नवी आस
सवयीची फसगत
- द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>शाप ज्याला तहानेचा
>>>>शाप ज्याला तहानेचा
त्याला सारे अवगत
सवयीची नवी आस
सवयीची फसगत
क्या बात है!
अहाहा..!! सुंदरच....
अहाहा..!!
सुंदरच....
तरी ओळखीचे काही
तरी ओळखीचे काही
फसविते पुन्हा पुन्हा
खूप सुंदर लिहिलेय कविता.
वा ! आवडली.
वा ! आवडली.