Submitted by Adm on 15 September, 2026 - 15:09
पहाटे पहाटे पैलवान पांडूरंग पाटील पिवळाधमक पायघोळ पायजमा घालून पेरूच्या परसबागेत पळापळा पळाले. पण पलीकडच्या पाटातून पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून पतंगराव पवारांचा पांढरा पाळलेला पिल्लू पिसाटल्यासारखा पळत आला. पिल्लाला पाहताच पांडूरंग पाटलांचे पाय लटपटू लागले!
पळता पळता पांडूरंग पाटील पाय घसरून पडले आणि पाठीवर पालथे पडून पिकलेल्या पपईच्या पोत्यात जाऊन फसले. पिकलेल्या पपईचा पिवळा पिवळा पल्प पांडूरंग पाटलांच्या पागोट्यावर, पोटावर आणि पायजम्यात पार पसरला. पपईत पचकलेले पाटील पाठीवर पडून पाहतात, तर पुढे पतंगराव पवार पोट धरधरून हसत पाहत होते!
पैलवान पांडूरंग पाटलांचा असा पपईत पचका झालेला पाहून पाटील आणि पवारांची पोरंही पटापट टाळ्या पिटत पळू लागली.
-------
एव्हडा अनुप्रास चालेल का ते सांगा.. आणि हसू आलं का ते ही सांगा... 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
अनुप्रसाचा पार पडेलोट, opps..
अनुप्रसाचा पार पडेलोट, opps.. कडेलोट झाला आहे की..
पसू opps... हसू आले ..
छान जमलेय
पळता पळता पैलवान पपईत पडला..
पळता पळता पैलवान पपईच्या पोत्यात फसला...खूप हसलो
जबरदस्त कथा. आवडली. हसू आले.
जबरदस्त कथा. आवडली. हसू आले.
अनुप्रास जमलाय. पाय पसरून
अनुप्रास जमलाय. पाय पसरून पाडता आलं असतं.
पपया वाया गेल्या ना पण? त्या कोणाच्या?
अरे हे भारी आहे.. एवढा मोठा
अरे हे भारी आहे.. एवढा मोठा अनुप्रास !!
आलं आलं... हसू आलं...
आलं आलं... हसू आलं...
अनुप्रास जमलाय
अनुप्रास जमलाय
आणि imagine करून हसूही आले
अनुप्रास जमलाय
अनुप्रास जमलाय
आणि imagine करून हसूही आले
>>>> + १०००
छान.
छान.
अनुप्रासाचा अतिरेक न करता अनुप्रासाची मजा घेत अनैसर्गिक शब्दप्रयोग/ वाक्यरचना न करता प्रसंगी इतर व्यंजने वापरली आहेस ते ही आवडले.
अनुप्रास जमलाय.
अनुप्रास जमलाय.
आणि imagine करून हसूही आले. +१
अनुप्रासाचा अतिरेक न करता
अनुप्रासाचा अतिरेक न करता अनुप्रासाची मजा घेत अनैसर्गिक शब्दप्रयोग/ वाक्यरचना न करता प्रसंगी इतर व्यंजने वापरली आहेस ते ही आवडले.>>+१
मस्त
मस्त
भारी!
भारी!
>>> एव्हडा अनुप्रास चालेल का ते सांगा
हो, पुरे पुरे!