Submitted by धनवन्ती on 15 September, 2026 - 14:47
" लवकर निघूया म्हणून किती वेळा सांगतेय. आता तू बरोबर मध्यरात्री मला त्याच घाटातून नेणार", तन्वी माझ्याशेजारी बसून तणतणतेय. चिडली की तिचे देशी गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांचे गुलाबी ओठ थरथरतात आणि मी खुळावतो, पार वेडावतो. तिचा राग काढण्यात तर आपण एकदम माहीर.. जितकी चिडेल तितकीच उत्कट.. धबधब्यासारखी झोकून देते..
" सांडासारखा दणकट नवरा सोबत असताना त्या घाटाला काय घाबरतेस? भूतबीत बाता सगळ्या, एकदम झूठ.." ती अस्वस्थ, चुळबुळत गप्प, मी अजूनच बेदरकार, गाडी एकदम F1...
अचानक गाडीसमोर कोणीतरी की काहीतरी.. ????
क्षणात गाडी हवेत फेकली जातेय, भेलकंडते, आणि कमालीची शांतता, जणू काळ गोठलाय त्याच एका क्षणात..
" लवकर निघूया म्हणून... " ती पुन्हा माझ्याशेजारी बसून तणतणतेय....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमितव, माझ्या पहिल्या श श क
अमितव, माझ्या पहिल्या श श क च्या पहिल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.. तो वाचून खात्री पटली की कथा जमलीय.
आणि अजून खास धन्यवाद, मला 'मी अनु" हिच्या धाग्यावर कथा लिहायला प्रोत्साहित केल्याबद्दल. हा पुश मला गरजेचा होता

तू पुणे गटग ला म्हणाला होतास की मी अजून लिहिले पाहिजे, त्याचा तू असा फॉलो अप पण घेतो आहेस
जमलीय.
जमलीय.
सामो, धन्यवाद.
सामो, धन्यवाद.
मला वाटले, बायको खुन करते. आजकाल गडावर ढकलण्याचे मीम व रील्स वाढलेत जिकडे तिकडे....
भारी !
भारी !
मस्त लिहिली आहे...
मस्त लिहिली आहे...
काटा येतो अंगावर वाचताना! छान
काटा येतो अंगावर वाचताना! छान जमलीये.
सर्वांना मनापासून धन्यवाद..
सर्वांना मनापासून धन्यवाद..
चांगली आहे.
चांगली आहे.
श प थ! जमलीय. भारीच शेवट
श प थ!
जमलीय. भारीच शेवट
परत वाचली ! डेंजर!
परत वाचली !
डेंजर!
अडकलेत बिचारे लूप मध्ये
अडकलेत बिचारे लूप मध्ये
डेंजरच रात्रीचा प्रवास
खतरा एकदम...
खतरा एकदम...
जबरदस्त, आवडली !
जबरदस्त, आवडली !
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना खूप धन्यवाद ..
एक ऐकलेला प्रतिसाद इथे देण्याचा मोह आवरत नाहीय..
" खूप scary आहे ग,
.
.
.
.
कारण मेल्यावर पण बायको शेजारी बसून तणतण करणे सोडत नाही"....
जमलीय.
जमलीय.
मेल्यावर पण बायको शेजारी बसून
मेल्यावर पण बायको शेजारी बसून तणतण करणे सोडत नाही …
😂
जन्मजन्मांतरीचा पत्नीग्रस्त !
खतरनाक !!
खतरनाक !!
भारी जमलीयं कथा..!
भारी जमलीयं कथा..!
तुम्हाला नेहमी इतर लेखनावर प्रतिसाद देताना पाहिलयं.. आज तुमची कथा वाचली... छान लिहू शकाल तुम्ही कथा..!
मस्त जमली आहे!
मस्त जमली आहे!
Pages