Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2026 - 12:39

अजूनही चुकवून दाखवा, आम्रसांदणी सोपी आहे
जुनीच आहे पाककृती, पण लिहिण्याची ढब ताजी आहे
रवा छान बारीकच कपभर, खमंग भाजा शुद्ध तुपावर
रंग गुलाबी, खरपुस दरवळ हीच कसोटी त्याची आहे
ताटलीत पसरून निवू द्या, तोवर कपभर आम्रस काढा
रेष-न्-रेष रसातिल आता गाळुन काढायाची आहे
दही घट्ट घाला अर्धा कप, मिश्रण घुसळुन एकजिव करा
निवलेला मिसळून रवा, मग साखर घालायाची आहे
मीठ चिमुटभर घालुन, ढवळुन, दोन तास हे मुरवत ठेवा
दूध घालुनी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायाची आहे
इडलीपात्री भरून मिश्रण वीस मिनीटे वाफवून घ्या
तुपासवे खा, नादुसवे खा, आम्रसांदणी रेडी आहे!
लेखनप्रकार : ग़ज़ल, स्वरयमक
तळटीप : 'लेखन पूर्वप्रकाशित नसावे' म्हटलंय नियमांत, 'पाककृती पूर्वप्रकाशित नसावी' म्हटलं नाहीये, त्यावर विसंबून ही प्रवेशिका देत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा! पहिलीच एंट्री आणि ती
वा वा! पहिलीच एंट्री आणि ती धमाकेदार!
जमलीये, गझल आणि इडली, दोन्ही.
जमलीये, गझल आणि इडली, दोन्ही..
भारीच. आवडली पाकृ
भारीच.
आवडली पाकृ
व्वा
व्वा
भारी!
भारी!
क्या बात!!
क्या बात!!
वा! जमली आहे गझल/कविता
वा! जमली आहे गझल/कविता
हाहा !! मस्तच झाली गज़ल !!
हाहा !! मस्तच झाली गज़ल !!
तेच म्हटलं नाव तर इथेच ऐकल्यासारखं / वाचल्यासारखं वाटतंय ...
मग तळटीप पाहिली
मस्त जमली आहे गझल.
मस्त जमली आहे गझल.
व्वा जबरदस्त...
व्वा जबरदस्त...
मस्त!
मस्त!
आवडली.
आवडली.
तळटीप : 'लेखन पूर्वप्रकाशित
तळटीप : 'लेखन पूर्वप्रकाशित नसावे' म्हटलंय नियमांत, 'पाककृती पूर्वप्रकाशित नसावी' म्हटलं नाहीये, त्यावर विसंबून ही प्रवेशिका देत आहे.>>>>
कन्फ्युज्ड बाहुली.
कसलं कन्फ्युजन? ही लेखन
कसलं कन्फ्युजन? ही लेखन स्पर्धा आहे. पाककृती स्पर्धा नाही.
लेखनचा विषय पाककृती.
आम्रसांदणी सोपी दिसली, तरी न
आम्रसांदणी सोपी दिसली, तरी न वाटेला मी जाईन
वोट मात्र मी देईन नक्की, लिखाण ऐसे भारी आहे