गणपती बाप्पा मोरया!
‘जिन्नस एक, पदार्थ अनेक’ या स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी आम्ही निवडलेला मुख्य घटक पदार्थ आहे तांदूळ.
थाळी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते भात, भाजी, पोळी, तोंडी लावणं, गोड पदार्थ वगैरे. त्यामुळे या स्वरूपात थाळी सजवण्यासाठी तांदूळ हा मुख्य घटक वापरून केलेले पदार्थ पुढीलप्रमाणे: मसालेभात, तांदुळाच्या कण्या घालून केलेली अंबाडीची भाजी, तांदुळाची उकड भरून केलेल्या पीठपोळ्या आणि त्याबरोबर आमरस, साईड डिश म्हणून तिखट-मिठाच्या शिरवळ्या आणि नारळाची चटणी; आणि गणेशोत्सवासाठी खास उकडीचे मोदक!

(पोळीच्या आतली उकड दिसावी म्हणून वरचा पापुद्रा काढला आहे.)
मुख्य पदार्थांच्या पाककृती:
१. मसालेभात:
साहित्य
तांदूळ: १ वाटी
फ्लॉवर: १/२ वाटी
मटार: १/२ वाटी
कोरडा मसाला: (खालील सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक पूड करून)
- १ टेबलस्पून जिरे
- ४ लवंगा
- २ इंच दालचिनीचा तुकडा
- १ टेबलस्पून काळा मसाला
फोडणीसाठी:
- १ तमालपत्र
- २ हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता (कढीलिंब)
- ओले खोबरे, कोथिंबीर
तूप
खोबरं-कोथिंबीर
कृती:
१. तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले.
२. तेलाच्या फोडणीत फोडणीचे साहित्य + फ्लॉवर + मटार + काजू घालून परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ आणि कोरडा मसाला घातला.
३. तांदूळ निथळून त्यात घातले व परतून घेतले.
४. तीन वाट्या आधणाचे पाणी घालून भात शिजवून घेतला. शिजताना थोडेसे तूप आणि बारीक गुळाचा खडा घातला.
५. गरम भाताची मूद पाडून वर पातळ साजूक तूप घातले आणि खोबरे-कोथिंबीर घालून वाढला.
२. पीठपोळ्या:
साहित्य:
१. तांदुळाची उकड
- १ वाटी तांदुळाचं पीठ
- १ वाटी पाणी
- २ चमचे तेल
- १/२ चमचा मीठ
२. पुरणपोळ्यांना भिजवतो तशी तिंबलेली कणीक
कृती:
१. पाण्यात तेल आणि मीठ घालून उकळी आणली.
२. मग त्यात तांदुळाचं पीठ घालून एक वाफ आणली.
३. परातीत काढून व्यवस्थित मळून घेतलं. (कोरडं वाटलं तर थोडा तेलाचा हात लावावा).
(ह्या पुढच्या सगळ्या पदार्थांमध्ये उकड करायची पद्धत हीच.)
४. पुरणपोळ्या करतो त्याच पद्धतीने तांदुळाची उकड भरून पोळ्या करायच्या. वरची कणकेची पारी जाड होऊ द्यायची नाही. अगदी तलम लुसलुशीत पोळी होते. या पोळ्यांबरोबर आमरस मस्त ओरपता येतो! हंगाम जवळ जवळ संपला असल्याने आम्ही डब्यातला रस घेतला होता. अंबाडीच्या भाजीबरोबरही या पोळ्या एकदम मस्त लागल्या. पीठपोळ्या हा खास खानदेशी प्रकार आहे. जावयासाठी करतात म्हणे.
३. अंबाडीची भाजी:
थाळीमध्ये भाजी-पोळी हवीच होती. अंबाडीची भाजी दोन-तीन प्रकारे करता येते. पण तांदूळ मुख्य पदार्थ असल्याने तांदुळाच्या कण्या घालून केली.
साहित्य:
अंबाडी: १ जुडी
१ लहान वाटी (साधारण २ टेबलस्पून) तांदूळ
डाळ, शेंगदाणे: १ टेबलस्पून
फोडणीचे साहित्य आणि लसूण ५-६ पाकळ्या (तुकडे करून)
चवीप्रमाणे लाल तिखट (हिरवी मिरची नको)
चवीप्रमाणे गूळ
मीठ
चमचाभर डाळीचे पीठ
कृती:
१. अंबाडी बारीक चिरून डाळ, शेंगदाणे आणि तांदूळ घालून एकत्र शिजवून घेतली.
२. शिजल्यावर अगदी चमचाभर डाळीचे पीठ घालून घोटून घेतली.
३. तेलाची फोडणी करून (लाल तिखटासह) हे मिश्रण घालून ढवळून घेतले.
४. मीठ, गूळ घालून नीट एकत्र केले.
५. खायला घेण्याआधी वर लसणाची चुरचुरीत फोडणी घालून घ्यावी.
४. तिखट मिठाच्या शिरवळ्या:
खरं तर पारंपरिक शिरवळ्या गोड असतात आणि नारळाच्या दुधाबरोबर खातात. पण बाकी बरेच पदार्थ गोड असल्याने, तसेच भजी-वड्यांसारखी काहीतरी तिखट-मिठाची साईड डिश हवी असल्याने तिखट-मिठाच्या शिरवळ्या करून बघितल्या. त्याबरोबर नारळाच्या दुधातले भाज्या घातलेले स्ट्यू करता आले असते, पण ते नंतर सुचले. आम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाल्ल्या.
साहित्य:
तांदुळाची उकड
हिरवी मिरची + कोथिंबीर वाटण
कृती:
१. तांदुळाच्या उकडीत मीठ आणि हिरवी मिरची-कोथिंबिरीचे वाटण घालून एकत्र करून घेतले.
२. उकडीचा उंडा करून तो मोदक वाफवतो तसा वाफवून घेतला.
३. उंडा गरम असतानाच सोऱ्याला शेवेची चकती लावून छोट्या छोट्या शिरवळ्या पाडल्या. उंडे गार झाल्यावर हे करता येत नाही. धातूचा सोऱ्या असेल तर चटका बसू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक करावे लागते.
५. उकडीचे मोदक:
गणेशोत्सव म्हटला की उकडीचे मोदक हवेतच! त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले; त्यात काहीही फॅन्सी केले नाही. गूळ, खोबरं आणि वेलची पुड घालून सारण केलं आणि उकडीचे मोदक केले.
गोड, तिखट, आंबट अश्या चवी असलेली आणि भात, पोळी, भाजी, साईड डीश (स्टार्टर) आणि गोड पदार्थ असलेली ही थाळी तुम्हांला नक्की आवडेल.
ग्रेट !! सुंदरच झाली आहे .
ग्रेट !! सुंदरच झाली आहे ..छान दिसतेय थाळी.. तिखट शिरवळ्या भारीच एकदम! शुभेच्छा!!
मस्त आणि कल्पक..
मस्त आणि कल्पक..
काही पदार्थांचे स्वतंत्र क्लोजअप फोटो बघायला सुद्धा आवडले असते.
व्वा!
व्वा!
मस्तच झाली आहे थाळी. सुरेख.
मला तांदुळाच्या कण्या घालून केलेली अंबाडीची भाजी आणि साईड डिश म्हणून तिखट-मिठाच्या शिरवळ्या हे दोन पदार्थ खूप आवडले.
नक्की करून पाहणार....
व्वा. मस्त दिसतेय थाळी
व्वा. मस्त दिसतेय थाळी
तोंपासू!
तोंपासू!
सुंदर सजवलीत थाळी आणि तोंपासू
सुंदर सजवलीत थाळी आणि तोंपासू!
मस्त दिसते आहे थाळी!
मस्त दिसते आहे थाळी!
वा ! भारी आहे थाळी
वा ! भारी आहे थाळी
कल्पक मेनू - तिखट-मिठाच्या
कल्पक मेनू - तिखट-मिठाच्या शिरवळ्या करुन बघेन. थाळी छान दिसत आहे
👌
👌
तोंपासू! अगदी कल्पक मेन्यू.
तोंपासू! अगदी कल्पक मेन्यू.
भारी झाला आहे तांदूळ महोत्सव
भारी झाला आहे तांदूळ महोत्सव!
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता
सगळ्यांना प्रतिक्रियांकरता धन्यवाद
आहाहा सुरेख तांदूळ महोत्सव.
आहाहा सुरेख तांदूळ महोत्सव. आमरसासह छान कल्पकतेनं सजलेलं नैवेद्य ताट, सोबत रांगोळी.
अंबाडीची भाजी बघून आई आठवली, ती अशीच कण्या घालून करायची.
तिखट मीठ शिरवळ्या ही मस्त आयडीया.
सर्व प्रकार मस्त आहे वेगळे
सर्व प्रकार मस्त आहेत, वेगळे आहेत.यातले बरेचसे कठीण पेपर आहेत, पण थाळी कोणी आयती करून समोर ठेवल्यास झकास.
छान दिसतंय ताट.
छान दिसतंय ताट.
हे इतकं सगळं लिहिणं पेशन्सचं काम आहे.
त्या पीठपोळ्यांनाच गवसणी म्हणतात का?
छान.
छान.
इतकं सगळं करणं आणि लिहिणं पेशन्सचं काम आहे.
छान दिसतेय थाळी. तिखट
छान दिसतेय थाळी. तिखट मिठाच्या शिरवळ्या करून पाहीन.
त्या पीठपोळ्यांनाच गवसणी
त्या पीठपोळ्यांनाच गवसणी म्हणतात का? >>>> नाही माहीत. मी घरी नेहमी पीठपोळ्याच ऐकलं आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.
छान पदार्थ आणि फोटोही
छान पदार्थ आणि फोटोही