Submitted by अजय on 13 September, 2026 - 22:58
संत ज्ञानेश्वरांच्या या ओळींचे इंग्रजीत भाषांतर हवे आहे.
माझा मराठाचि बोलु कवतुके, परी अमृतातेही पैजा जिंके.
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.
-संत ज्ञानेश्वर
गुगलने हे भाषांतर केले. .
I shall speak my Marathi with such delight that it vies with and surpasses even the nectar of the gods.
I shall weave together words that will captivate the hearts of connoisseurs.
- Saint Dnyaneshwar
ते बरोबर आहेच . त्यात आणखी सुधारणा करता येईल का? अर्थ न बदलता सोपे/सुंदर करता येईल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Perplexity ने करून दिलेलं
Perplexity ने करून दिलेलं भाषांतर...
Prompt
माझ्या मराठीचा बोलू कवतुके, परी अमृतातेही पैजा जिंके.
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.
-संत ज्ञानेश्वर
Translate into poetic English
________________________
.....>>>
A poetic English rendering of Sant Dnyaneshwar’s lines:
Though I speak my Marathi in playful jest,
It wins the wager even against nectar’s best.
Such honeyed words, so rich and rare,
I shall gather and offer with loving care.
Or, in a slightly more lyrical version:
I may speak my Marathi lightly, in jest,
Yet it out-sweetens nectar, and wins the test.
Words so luscious, so deeply dear—
Such words I’ll weave, and bring them here.
Oh, the joy of words in
Oh, the joy of words in Marathi
Sweeter than nectar, forever young.
In every syllable, my roots I see—
Marathi, Marathi! My mother-tongue
I shall speak my Marathi with
I shall speak my Marathi with such delight >> हे अचूक नाही. इथे बोलु ह्या शब्दाचा अर्थ स्पीक असा (क्रियापद) नसून शब्द ( आपण अनुभवाचे बोल म्हणतो ना तसा एकवचनी बोल, पण ज्ञानेश्वर अनेकदा शब्द उकारान्त करतात, विठ्ठलु, वेधु, अवगुणु वगैरे प्रमाणे बोलु) असा अर्थ आहे.
बहुधा तिसर्या की चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये ही ओवी येते. थोडक्यात, श्रोत्यांनो नीट लक्ष द्या बरं का, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते मराठीत जरी असलं (म्हणजे तथाकथित उच्च भाषा जरी नसली) तरी माझा शब्द हा इतका मधुर आहे की तो अमृताहुनी गोड वाटेल याची खात्री बाळगा - असं साधारण म्हणायचं आहे असं पुढचं मागचं वाचताना जाणवतं
बरोबर आहे.
बरोबर आहे.
ते 'माझ्या मराठीचा बोलू' नसून 'माझा मराठीचा बोलु' असं आहे. यावरूनसुद्धा बोलु हे क्रियापद नव्हे, तर पुल्लिंगी नाम ('माझा') म्हणून येतं, हे लक्षात येईल.
दुसरं म्हणजे 'रसिके' म्हणजे connoisseurs हे सुध्दा बरोबर नाही. ते 'अक्षरे' चं विशेषण, म्हणजे रसाळ या अर्थाने येतं. Connoisseurs मध्ये एक एलिटिझम येतं, जे ओवीच्या भावार्थाशी विसंगत आहे.
"My beloved Marathi will humble the nectar of paradise,
Such beautiful words shall I weave"
सोपे/सुंदर करता येईल का? असे विचारले आहे म्हणून फॅन्सी शब्द टाळले आहेत.
सुंदर मोरोबा. अर्थ, त्याची
सुंदर मोरोबा. अर्थ, त्याची उकल आणि इंग्रजी भावांतर - सर्व उत्तम
छान लिहिले आहे मोरोबा!
छान लिहिले आहे मोरोबा!
>>छान लिहिले आहे मोरोबा!>>+१
>>छान लिहिले आहे मोरोबा!>>+१
काय मस्त धागा आहे. हर्पाचे
काय मस्त धागा आहे. हर्पाचे "बोलु" आणि मोरोबांचे विवेचन - दोन्ही आवडले.
नेक्टर ऑफ पॅरेडाइज बद्दल - अमृत हे अमर करणारे पेय असा अर्थ आहेच पण आपल्याकडे अमृताशी तुलना ही चवीच्या बाबतीत होत असते. ती पुण्यातील अमृततुल्य (चहा) सारखी शब्दशः किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा सारखी उपमेच्या रूपातही असते. या वरच्या रचनेत ती तशी उपमेच्या रूपात केली आहे असे वाटते. इंग्रजीत जे याच्या जवळ जाणारे शब्द आहेत - Elixir वगैरे, किंवा नेक्टर ऑफ हेवन/पॅरेडाइज - या शब्दांची किंवा संकल्पनांची तुलना कधी अशी चवीच्या बाबतीत केली जात नसेल, तर हे भाषांतर अमराठी लोकांपर्यंत पोहोचणार नाही. किंवा असा पहिलाच वापर त्यांना समजून घ्यावा लागेल. इंग्रजीत एखाद्या गोष्टीचे माधुर्य आणि त्याची तुलना एखाद्या स्वर्गीय गोष्टीशी - यासारखे काहीतरी त्याकरता वापरले तर तो अनुवाद जास्त चपखल होईल.
सगळ्यांच्या सूचनांबद्दल
सगळ्यांच्या सूचनांबद्दल मनापासून आभार.
मोरोबा , चूक लक्षात आणून दिल्याबद्द्दल आणि सोप्या शब्दात उकल केल्याबद्दल धन्यवाद. वर बदल केला आहे (माझा, बोलु )
>Connoisseurs मध्ये एक एलिटिझम येतं, जे ओवीच्या भावार्थाशी विसंगत आहे.
मला याची चिंता होती . धन्यवाद.
>nectar of paradise,
हे अजूनही थोडंस अवघड वाटतंय .
फारएण्ड
> इंग्रजीत एखाद्या गोष्टीचे माधुर्य आणि त्याची तुलना एखाद्या स्वर्गीय गोष्टीशी - यासारखे काहीतरी त्याकरता वापरले तर तो अनुवाद जास्त चपखल होईल
याचाच शोध चालू आहे.
रच्याकने,
Ambrosia: In ancient Greek mythology, this was the literal food or drink of the gods, often described as sweet and bringing immortality.
मी प्रयत्न केला मनात पण एकतर
मी प्रयत्न केला मनात पण एकतर गोडवा जात होता नाही तर अभिव्यक्तीची धार. सतत कृत्रिम वाटत होतं. मग मला लक्षात आले ज्ञानेश्वरी आहे ही. दोन्ही तंतोतंत उतरणं अशक्य आहे, फार तर जास्तीत जास्त जवळ जाणारे भाषांतर होईल.
फा चे पटले.
सॉरी, ते माझा मराठाचि बोलु
सॉरी, ते माझा मराठाचि बोलु असे आहे
हर्पा, मोरोबा आणि फा ... छान
हर्पा, मोरोबा आणि फा ... छान विवेचन केलं आहे. बोलु!
'अमृताची गोडी तुझ्या भजनात' हे ही तसंच आहे.
'बोला अमृत बोला
शुभ समयाला बोल बोल' या नाट्यगीतातही 'अमृत' हे गोड म्हणूनच आले आहे. हा कधी विचारच केला न्हवता.
वाचते आहे.
वाचते आहे.
मराठीतून इंग्रजीत उडी मारण्याइतकं इंग्रजी एरवीही येत नाही, त्यात ही तर ज्ञानेश्वरी!
भाषेच्या गोडव्याच्या संदर्भात एका मैत्रिणीने mellifluous(ness) / dulcet(ness) ही विशेषणं सुचवली.
बोलु = Attentionu
बोलु = Attentionu
>>माझा मराठाचि बोलु कवतुके,
>>माझा मराठाचि बोलु कवतुके, परी अमृतातेही पैजा जिंके.
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.<<
संस्कृतच्या तुलनेत मराठीचा गोडवा आणि जनाधार याची पार्श्वभूमी आहे या श्लोकाला. त्या दृष्टिकोनातुन एक छोटा प्रयत्न -
Marathi’s charm triumphs over the language of the gods. I aspire to create a vast body of literature in it.
Or
Marathi’s affability prevails over Sanskrit, the scripture of God. I aspire to write many literary works in it...
प्रश्न विचारताना कदाचित
प्रश्न विचारताना कदाचित खरोखरच गंभीर भाषांतर हवं असेल किंवा वेगळं काही अपेक्षित असेल. या प्रश्नामुळे जुनाच एक भाषांतराचा पेच आठवला.
"आमच्या हिच्या हातच्या फोडणीची सर कशाकशाला नाही."
इंग्रजीत: There's simply nothing that can match the tadka my missus makes with her own hands.
हे भाषांतर कुणी तरी उत्साहाने केलेलं आहे. पुल देशपांडेंपर्यंत पोहोचलं का आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती हे काही माहिती नाही.
भाषांतरात अर्थ बरोबर पोहोचतो, पण सांस्कृतिक तोटे किंवा गाळण्या आहेत.
हिच्या - बायकोचा उल्लेख करण्याची ही ठराविक मराठी लाडिक/संकोची पद्धत आहे. यात जो घरगुती विनोद आणि माया आहे, त्याला इंग्रजीत जागाच नाही.
फोडणी - ही खास भारतीय किंवा मराठी संस्कृती आहे. ती इंग्रजांना माहितीच नाही. हा एक सांस्कृतिक इंद्रियानुभव आहे. तेल, मोहरी, हिंग , कढीपत्ता तडतडण्याचा आवाज, वास, आठवण इत्यादी . Tempering हा शब्द तांत्रिक/परका वाटतो.
सर नाही - ग्रामीण वाक्प्रचार आहे, match/rival या शब्दांत तितकी सहजता, तितका ठसका नाही.
म्हणून भाषांतरात सांस्कृतिक तोटा असतो. अनुवाद प्रत्येक ठिकाणी होईलच असे नाही. याला त्या त्या भाषेतल्या प्रतिमांची मांडणी करून भावार्थ पोहोचवता आला पाहीजे. ए आय तरी करेल का? अवघडच वाटते. प्रॉम्प्ट देण्यात निष्णात असतील ते करू शकतील. दोन्ही भाषांत पारंगत असतील ते करू शकतील.
मलाही या वाक्यांचे / शब्दांचे अर्थ हवेत.
You can't have your cake and eat it too.
Bless your heart
Serendipity
It is what it is
भाषांतरा पेक्षा त्या मागचे
भाषांतरा पेक्षा त्या मागचे विचार वाचायला मजा येतेय.
इंग्रजी भाषांतर कुठे वापरणार याचा संदर्भ सांगितला तर भाषांतराचा प्रयत्न करणार्यांना मदत होईल
It is what it is >> याला आहे की जुनेच ' ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे , समाधान '
ठेविले अनंते तैसेचि रहावे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे , समाधान <<<<
याचा अर्थ वेगळा आहे
आहे हे असं आहे - इतकं सोपं आणि सेम अर्थाचं भाषांतर आहे की
फोडणी - Seasoning
माझा मराठीचा बोलु' चे भाषांतर याबाबत सहमत.
______________________________
फोडणी - Seasoning
सौजन्य Perplexity
सौजन्य Perplexity, translates to English:
ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे, समाधान”
“Whatever is ordained by the Infinite, accept it just as it is; offer your heart to it, and find contentment.”
This line reflects a devotional and philosophical sentiment common in Marathi spiritual poetry (such as in the works of saints like Tukaram or Ramdas), emphasizing surrender to divine will and inner peace through acceptance.
It is what it is >> नकारात्मक
It is what it is >> नकारात्मक परिस्थिती आहे, कुणी त्यावर जास्त पाल्हाळ लावले तर It is what it is म्हटले कि बास आता हा ध्वनयार्थ त्यात लपलेला आहे.
"आहे हे असं आहे" हे जुनं नसावं. त्यात आता हा विषय बंद हा अर्थ दडलेला नाही.
भाषांतर म्हणून बरोबर.
हे काम अवघड आहे. ज्ञानदेवांचा
हे काम अवघड आहे. ज्ञानदेवांचा भाव त्यात उतरायला हवा. नुसतं भाषांतर ते साधू शकणार नाही. भावानुवाद त्याच्या जवळपास जाऊ शकेल. विंदा म्हणतात
शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा
रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा
ज्ञानेश्वरीची इंग्रजी भाषांतरं आहेत
Google AI overview मधून हे
Google AI overview मधून हे मिळालं
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) ग्रंथाच्या ६ व्या अध्यायातील १४ व्या ओवीचे "माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेंही पैजासीं जिंकें।" हे मूळ रूप आहे. इंग्रजी भाषांतरित आवृत्त्यांमध्ये (उदा. व्ही. जी. प्रधान आणि रामकृष्ण केशव भागवत यांच्या अधिकृत अनुवादांमध्ये) याचा इंग्रजी अनुवाद खालीलप्रमाणे केला आहे:
"I shall speak my Marathi with such delight that it vies with and surpasses even the nectar of the gods. I shall weave together words that will captivate the hearts of connoisseurs."
युट्यूबवर हिंदी गाणी मराठी
युट्यूबवर हिंदी गाणी मराठी सबटायटल्स ऑन ठेवून ऐका.