मायबोली गणेशोत्सव २०२६ श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 13 September, 2026 - 12:47

"जय देवा म्हाराज्या..."

"होय म्हाराज्या..."

"आज सगळी लेकरां तुझ्या दर्शनाची आस लावन बसली आसत, तेंचां गाराणां घालतंय.. (होय म्हाराज्या)

आजच्या या शुभदिनी, शुभमुहूर्तावर...

आपल्या मायबोलीवर, दुःखहर्ता, सुखकर्ता,चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती...
श्री गजाननाचे मंगलमय आगमन झाले आहे!

हा मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा सत्ताविसावा उत्सव...
बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे...
घरातील/परिसरातील सर्व संकटं, विघ्नं दूर होऊ दे ...
सर्वांना उदंड आयुष्य, सुख-समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे...
बाप्पाचा वरदहस्त आमच्या पाठीशी सदैव राहू दे...

आणि
सगळ्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळू दे...
सगळ्यांची प्रकाशचित्रे विनासायास अपलोड होऊ दे...
बाळ-गोपाळांना उपक्रमांत भाग घ्यायची इच्छा होऊ दे...
शशक जरा समजतील अशा येऊ दे...
मायबोलीकरांना पाककृतींसाठी नव्या नव्या कल्पना सुचू दे...
लिखाणासाठी प्रेरणा मिळू दे आणि त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटू दे...
मायबोलीकरांना त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून गणेशोत्सवात भाग घ्यायला भरपूर सवड मिळू दे...
लिखाणाचा उसाह टिकू दे, आणि अपलोड करताना कुठलेही विघ्न न येऊ दे...
पुढचे अकरा दिवस मायबोलीकरांचे हापिसातील वरिष्ठ, क्लायंट, घरातील जोडीदार , कुटुंबीय सुखी समाधानी आणि आनंदी राहू दे...

आणि सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा भला करून भला कर..."
आणि या दहा दिवसांच्या सेवेत आमच्याकडून काही चूकभूल झाली, तर ती पदरात घेऊन बाप्पा, आम्हा सर्वांवर कृपेची सावली अखंड राहू दे...

होय म्हाराज्या...!!!

होय म्हाराज्या...!!!

"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिध्दिचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथां शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलाची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंद शोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे पार्वतीचे लास्य गणपतीच्या साक्षीने चालते, अगदी त्याचप्रमाणे एका शिष्याचे जीवन हे त्याच्या सद्गुरुंच्या साक्षीने चालत असते। जर शिष्य या जगदाभासात किंवा मायेमध्ये गुंतू लागला, तर सद्गुरुंचा हा साक्षीभाव त्याला योग्य दिशा दाखवतो।

ॐ शुक्लांबरधरंदेवं शशिवर्णंचतुर्भुजम्।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतयेत्॥

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।
जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥

कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।
मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥

तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।
कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥

यावेळेला गणपतीचा श्लोक नाही लिहीलेला. अन्य भूपाळी लिहीली आहे.

उठि उठि पाटील जीवा ॥
सोडी बुद्धीचा कावा ॥धृ०॥

मन कारटे मोठे द्वाड ॥
पोरे गोळा केली फार ॥१॥

शब्द , स्पर्श , रुप , रस पोरे ॥
धूम करिती पहांटेच्या वेळे ॥२॥

काम क्रोध करितिल दावा ॥
घालिती जन्म -मरणाच्या फेर्‍या ॥३॥

आशा -तृष्णा दोघी बहिणी ॥
ह्या करितिल तुझा हेवा ॥४॥

बलभीमचरण धरी ॥
चुकवी जन्म -मरणाची वारी ॥५॥

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि॥
विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥

_/\_
गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ती मोरया|

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् |
जेष्ठराज्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शूण्वन्नूतिभि: सीद सादनम् ||

ll श्री गणेशाय नमः ll

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

श्रेष्ठः किमर्थं गणपोमहात्मा | सगंडशुंडानन आदिदेवा: |
नित्यःकिलाहं प्रणवस्वरूपो | मूढानितिख्यां परितोभिमन्यै: ||

|| गणेश स्तुती ||

ॐ ॐ ॐकार रुपं त्रह्यमिति च परम् यत्स्वरुपं तुरीयम् |
त्रैगुण्यातीतनीलं कलयति मनस् तेजसिंदूरमूर्तिम् |
योगीन्द्रै: ब्रह्मरंध्रै: सकलगुणमयम् श्री हरेंद्रेण संगम् |
गं गं गं गं गणेशं गजमुखममितो व्यापकं चिन्तयन्ति ||

गणपती बाप्पा मोरया....

यंदा लायटिंग नाही का बाप्पांना?

रच्याक, गाऱ्हाणे मस्त जमलंय

नमो नमो गणराया तू चौदा विद्येचा पाया,
मंगलमूर्ती अगाध कीर्ती बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे ।।

ती रिद्धी सिद्धी माया गणरायाच्या त्या पाया,
अनंत गुणांचा तू परमेश्वर बुद्धी दे गणराया,
शिवसुता गौरीपूता, आदी गुणांचा तूच पिता,
गौरीनंदना करितो वंदना नित्य तुझे गुण गाई,
बाप्पा मोरया रे ।।
बाप्पा मोरया रे ।।

बोलाविले दोघांसी गणेश कार्तिकासी,
पृथ्वी प्रदक्षिणा घालील जो मिळेल मोदक त्यासी,
नारायणा त्याच क्षणा गणेश घाली प्रदक्षिणा,
पृथ्वीभोवती कार्तिक फिरला अंत भेटला नाही,
बाप्पा मोरया रे ।।
बाप्पा मोरया रे ।।

गणरायाची ती स्वारी आली इंद्रदरबारी,
उंदरावरुनी पाय घसरला चंद्र हासला भारी,
चंद्राला शाप दिला डाग पडेल सौंदर्याला,
गणेशचतुर्थीस तुज कोणी तोंड बघणार नाही,
बाप्पा मोरया रे ।।
बाप्पा मोरया रे ।।

नमो नमो गणराया तू चौदा विद्येचा पाया,
मंगलमूर्ती अगाध कीर्ती बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे ।।

जय देवा मोरेश्वरा जय मंगळमूर्ती॥
आरती चरणकमळा, ओवाळू प्राणज्योती॥जय.॥धॄ.॥
सुंदरमस्तकी हो, मुकुट पिसे साजीरा।
विशाळ कर्णद्वय, कुंडले मनोहर।
त्रिपुंड्रटिळा भाळी, अक्षता ते सोज्वळी।
प्रसन्न मुखकमळ, मस्तकी दुर्वांकुर॥जय.॥
नयन निर्मळ हो भुवया अति सुरेख।
एकदंत शोभताहे, जडित स्वर्ण माणिक।
बरवी सोंड सरळ, दिसतसे अलौकिक।
तांबूल मुखीं शोभे अधररंग सुरेख॥जय॥
चतुर्भुजी मंडित हो, शोभती आयुधें करी।
परशुकमलअंकुश हो, मोद्क पात्र भरी।
अमृतसम मधुर, सोंड शोभे तयावरी।
मूषक वाहन तुझें, लाडू भक्षण करी॥जय.॥
नवरत्नहार कंठी, यज्ञोपवीत सोज्वळ।
ताईत मिरवीतसे, त्याचा ढाळ निर्मळ।
जाईजुई नागचांफ़े, पुष्पहार परिमळ।
चंदनी कस्तुरीचा शोभे टिळक वर्तुळ॥जय.॥

आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् | मंगलं परमं रुपं श्री गणेशं नमाम्यहम् ||

एकदन्तं महाकायं तप्तकाञ्चनसन्निभम् ।
लम्बोदरं विशालाक्षं वन्देऽहं गणनायकम् ॥

मुञ्जकृष्णाजिनधरं नागयज्ञोपवीतकम् ।
बालेन्दुकलिकामौलिं वन्देऽहं गणनायकम् ॥

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम् |
बल्लाळं मुरुडं विनायक महं चिन्तामणिं थेवरम् |
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम् |
ग्रामे रांजण संस्थितो गणपतिं कुर्यात् सदा मंगलम् ||

ॐ नृत्यकर्त्रे नमः ।
ॐ शिवपुत्राय नमः ।
ॐ स्रवन्मदाय नमः ।
ॐ आनन्दान्दोलितमनाय नमः ।
ॐ गिरिशात्मजाय नमः ।
ॐ पार्वतीनन्दनाय नमः ।
ॐ सद्योगलक्षणाय नमः ।
ॐ अग्रपूज्याय नमः ।
ॐ सदामङ्गलरूपवते नमः ।
ॐ शुक्लमूषिकारूढाय नमः । २०
ॐ देवराजाय नमः ।
ॐ शशिसूर्यविलोचनाय नमः ।

अगजानन-पद्माकं गजाननम् अहर्निशम् |
अनेकदंतं भक्तानाम् एकदन्तम्-उपास्महे ||

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा
शिंदे बंधूंच्या आवाजातले हे गाणे ऐकल्याशिवाय सर्वजनिक गणेशोत्सवाचा फील येत नाही Happy

ॐ सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं
सुरासुरैर्नमस्कृतं जरापमृत्युनाशकम् ।
गिरा गुरुं श्रिया हरिं जयन्ति यत्पदार्चकाः
नमामि तं गणाधिपं कृपापयः पयोनिधिम् ॥ १॥

गिरीन्द्रजामुखाम्बुज प्रमोददान भास्करं
करीन्द्रवक्त्रमानताघसङ्घवारणोद्यतम् ।
सरीसृपेश बद्धकुक्षिमाश्रयामि सन्ततं
शरीरकान्ति निर्जिताब्जबन्धुबालसन्ततिम् ॥ २॥

शुकादिमौनिवन्दितं गकारवाच्यमक्षरं
प्रकाममिष्टदायिनं सकामनम्रपङ्क्तये ।
चकासतं चतुर्भुजैः विकासिपद्मपूजितं
प्रकाशितात्मतत्वकं नमाम्यहं गणाधिपम् ॥ ३॥

नराधिपत्वदायकं स्वरादिलोकनायकं
ज्वरादिरोगवारकं निराकृतासुरव्रजम् ।
कराम्बुजोल्लसत्सृणिं विकारशून्यमानसैः
हृदासदाविभावितं मुदा नमामि विघ्नपम् ॥ ४॥

श्रमापनोदनक्षमं समाहितान्तरात्मनां
सुमादिभिः सदार्चितं क्षमानिधिं गणाधिपम् ।
रमाधवादिपूजितं यमान्तकात्मसम्भवं
शमादिषड्गुणप्रदं नमामि तं विभूतये ॥ ५॥

गणाधिपस्य पञ्चकं नृणामभीष्टदायकं
प्रणामपूर्वकं जनाः पठन्ति ये मुदायुताः ।
भवन्ति ते विदां पुरः प्रगीतवैभवाजवात्
चिरायुषोऽधिकः श्रियस्सुसूनवो न संशयः ॥ ॐ ॥

॥ इति दक्षिणाम्नाय श्रिङ्गेरी श्रीशारदापीठाधिपति
शङ्कराचार्य जगद्गुरुवर्यो श्री सच्चिदानन्द
शिवाभिनव नृसिंहभारती महास्वामिभिः विरचितम्
श्री गणाधिपति पञ्चरत्न स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

गणपतीबाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या

इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान
येवढे थोरले डोके , कसे पेलते तरी मान
गोरा गोरा पान रंग, मऊ नितळ छान अंग
मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया

मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड
सोंडेखाली लपून बसे देवा तुमचे तोंड
दोनावरी दोन हात , एकच कसा तुमचा दात
अजब वाटे रूप तुमचे बघावया

उंदरावरी बसुन कशी डुलत येते स्वारी
गोड गोड मोदकांची आवड तुम्हां भारी
शोभिवंत मखर त्यात , पुजेचाही थाटमाट
आरतीला टाळ झांजा वाजवाया

पाहुणे तुम्ही येता घरी, मौज होई मोठी
खिरापत खाऊ मिळे, मिळे आम्हा सुटी
पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या- ज्ञान आम्हां द्यावे
मनो भावे वंदु तुम्हां गणराया

गणपतीबाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् |
वासरमणिरिव तमसां राशिंनाशयति विघ्नानाम् ||

(संध्याकाळी निरोप देईन, आत्ता देणार नाही!! Happy )

महादोष जाती जयाच्या सुनामे ।
घडे सद्गती पूर्ण होताती कामे ॥
तशी सर्व सिद्धी मिळे मोक्ष-मेवा ।
मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा ॥१||

गणेशा नाम उच्चारिता नाहि कष्ट ।
न वेचे मुळी गाठिचा अर्थ शिष्ट ।
महापाप संसार-सिंधू तरावा ।
मयूरेश हा सुप्रभाती स्मरावा ॥२||

|| श्री गणेशाय नमः ||

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ||
भक्तावासं स्मरेनित्यमायु:कामार्थसिद्धये ||१||

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम् ||
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकम् ||२||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||३||

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||४||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दिकरं प्रभो ||५||

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ||
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||६||

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ||
संवत्सरेण सिध्दिं च लभते नात्र संशयः ||७||

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||८||

इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||

गणपत्ती बाप्पा मोरया !!!

Pages