लहान मुलांसाठी कला उपक्रम : माझा आवडता लोगो

Submitted by संयोजक on 12 September, 2026 - 12:53

PHOTO-2026-09-04-14-18-14.jpg

हॅल्लो छोट्या दोस्तांनो? कसे आहात तुम्ही ?

आता काय तुमच्या आवडत्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यामुळे तुम्ही खुश असणारच!
शाळेला सुट्टी, मस्त खाऊ, बाप्पाच्या आरत्या, सगळी मित्रमंडळी मिळून एकदम फुल टू धम्माल!
यावर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक मस्त चित्रे रंगवा उपक्रम.
यासाठी तुम्हाला मोबाईल किंवा कोणत्याही स्क्रीन ची गरज नाहीये. रंग भरण्यासाठी, तुमच्याकडचे कोणतेही रंग उचला, स्केचपेन, खडू किंवा जलरंग, दिलेल्या विषयायचं चित्र काढा किंवा तयार छापील कोरं चित्र घेऊन सुंदर रंगवा.
तर यंदा विषय पण एकदम हटके आहे आहे.
मित्रानो, तुम्हाला गाड्या आवडत असतील, किंवा एखादी स्पोर्ट्स टीम आवडत असेल, किंवा एखादया ब्रॅण्डच्या वस्तू आवडत असतील. तर त्या आवडत्या टीमच्या, कंपनीच्या किंवा ब्रॅण्डच्या लोगोचे (प्रतीकचिन्ह) चित्र काढायचे आहे.
तुमच्या आवडीचा कोणताही लोगो निवडा, त्याचं चित्र घ्या आणि ते रंगवा.

धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
चित्रकला उपक्रम : माझा आवडता लोगो - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव

नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) चित्र मुलांनी स्वतः रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
४) चित्रं पाठवायची शेवटची तारीख शुक्रवार सप्टेंबर २५, २०२६ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
५) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी
६)प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता १४ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७)‘मायबोली गणेशोत्सव २०२६' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८)याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२६ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरू नये).

छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही रंगवलेली छान छान चित्र ?

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users