स्कूल ठीक करो - जेन झी आंदोलन!

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 August, 2026 - 14:07

स्कूल ठीक करो!
ये अब बडा होने वाला है!
मेरा देश बदल रहा है..
स्कूल के अच्छे दिन आने वाले है..
कोकरोच पार्टी झिंदाबाद!
नवीन आंदोलन नवीन धागा..

देशाच्या गावाखेड्यात जाऊन तेथील सरकारी शाळांची दुरावस्था दाखवून सरकारला जाब विचारायची मोहीम हाती घेतली गेली आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हे बघताच संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. आज चक्क मारहाण सुद्धा झाली.
पण आता हे जेन झी थांबणार नाहीत.
जोपर्यंत देशात चांगले काही घडायची आशा दाखवत आहेत... फुल सपोर्ट !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती मुलगी नाहीये पण
43 वर्षाची आहे, इंग्रजीची शिक्षिका आहे उत्तर प्रदेश मधली
आता ती लाख स्वतःला म्हणवून घेईल जेनझी पण होत नाही ना ती Happy

मी सुद्धा आमच्या शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जो मेंबर टॅग असतो तो The gen Z असा लावला आहे Happy
वय नाही तर बिनधास्त जाब विचारायची वृत्ती म्हणून..
बाकी त्या महिलेचा व्हिडिओ ग्रूपवर कोणीतरी शेअर केलेला पण मी तो पाहिला नाही. असे एकेक किस्से वेचून सरसकटीकरण करत बदनामी केलेले व्हिडिओ बघायचेच नाही असे ठरवले आहे.

<< अक्षरशः देश थुंकतोय ह्या आंदोलकांवर (आंतरजालावर).
खरे आणि सुसंस्कृत, चांगले जेन झी जंतर मंतर वर नव्हतेच. >>

------ कुठला देश थुंकत आहे ?
सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.

सुसंस्कृतपणाचे प्रमाण पत्र कुणी द्यायला हवे ? काही पात्रता निकष आहेत का आणि आपण त्या मधे बसतो का ? Happy

१) अनेक दशके, विरोधी विचारांच्या स्त्रियांची (इंदिरा, सोनिया, आणि आता प्रियांका.... ) यथेच्च बदनामी करणारी विधाने होत असतांना त्याबद्दल केवळ बघ्याची ( दे टाळी... ) भुमिका घेणारे सुसंस्कृत आहेत का?
५० कोटीची गर्लफ्रेंड , काँग्रेसकी विधवा म्हणणारा सुसंस्कृत आहे का?

२) बालात्कार तसेच खुनाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगत असलेले " गुन्हेगार " लोक तुरुंगातून सोडविल्यावर त्यांचे बाहेर हार तुर्‍यांनी जंगी स्वागत करणारे, पेढे वाटणारे सुसंस्कृत आहेत का?
बलात्कार, खुनाच्या गुन्ह्यांतले " आरोपी " तुरुंगातून बेलवर / पॅरोलवर/ फार्लो वर बाहेर सोडविले जातात. त्यांचे स्वागत भारत माता कि जय, जय श्री राम असे करणारी लोक सुसंस्कृत आहेत का?

३) पहलगाम हल्ल्यानंतर देशभरांत युद्धज्वर पेटला होता. अशावेळी शांती - सबुरीचा संदेश देणारे पत्र लिहीणार्‍या वीरमाता गाडगीळ यांना टारगेट करणारे सुसंस्कृत आहेत का?
त्यांना हिणवण्याच्या उद्देशाने " संत " पदवी बहाल करणारे मायबोलीकर "जंत" सुसंस्कृत आहेत का?

याच पहलगांम हल्ल्यामधे पती गमाविलेल्या महिलेने ( हिमांशी नरवाल ) विखारी विचार प्रदर्शित करण्यास स्पष्ट नकार दिला होता म्हणून तिला संघटीत पणे टारगेट करणारे सुसंस्कृत आहेत का? तिचा नवरा मारला गेला होता, मोठ्या धक्क्यातून सावरत होती. एका धर्माला टारगेट करण्याचे नाकारले हाच तिचा दोष होता. आपल्याला हवे असलेले नरेटिव / बाईट्स मिळत नाही कर बदनामी , चरित्र हनन. तिच्या बद्दल गलिच्छ लिहीणारे सुसंस्कृत आहेत का?

ऑपरेशन सिंदूर दरम्यान... कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल अपशब्द वापरणारा मंत्री सुसंस्कृत आहे का?
https://youtu.be/P4sDk1CYx4M

४) दिल्ली मधे क्रिडापटूंनी लैंगिक शोषण होत असल्याचा अत्यंत गंभिर आरोप केला होता . साधा FIR नोंदविण्यासाठी अनेक आठवडे महिने झगडावे लागले होते. महिलांना रस्त्यावरुन अक्षरश: फरफटत नेले गेले. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावरच FIR नोंदवला गेला, चौकशी न्यायाची अपेक्षा कशी करायची? अशा वेळी केवळ बघ्याची भुमिका घेणारे मंत्री, खासदार, प्रधान सुसंस्कृत आहेत का?

५) विरोधी विचार असणार्‍या, अहिंसक तसेच लोकशाही मार्गाने द्वेषाच्या दाट अंधारांत धडपडणार्‍या देशाला प्रकाश दाखविण्यासाठी धडपडणार्‍या एखाद्या राजकीय नेत्या बद्दल नाबाद९९ असे लिहीणे आणि त्या अनुषंगाने हिंसा सुचविणारे सडके विचारी लोक सुसंस्कृत आहेत का?
नाबाद ९९ पॅरा अपेक्षित नव्हता.

जेन झी ला सुसंस्कृत असल्याचे प्रमाण पत्र कुणाकडूनही नको आहे हाच प्रॉब्लेम आहे.

जेन झी समर्थक नाही, पण त्यांच्याबद्दल आदर आहे. ते भारताचे भविष्य आहे.

<< जर हा व्हिडिओ पाहूनही तुम्हाला स्वतःच्या देशाच्या स्थितीची शरम नाही वाटली, तर सगळंच कठीण आहे मग. >>

------ बघितला व्हिडिओ. Sad
मर्यादित रिसोर्सेस आहेत आणि इच्छाशक्ती कमी पडत आहे.

कुंभमेळा ३५००० रु, कोटी खर्च मंजूर होतो पण शाळा पैशा अभावी कमी होतांना दिसत आहेत.

शाळा ठीक करा म्हणलं तर कोणाला प्रॉब्लेम कसा वाटू शकते हे कळण्यापलीकडे आहे असो>> अगदी खरं. किती ईनसेक्युअर असावं एखाद्याने? शाळेत रीव्ह्यु ला निघालेल्या लोकांना मारहाण? किती नीच लोक.
महाराष्ट्रातील अन्गणवाडी सेविकेचे प्रकरण>>> ती तर हद्द होती. बिचारीला परत तर घेतलंय पण त्याच नीच लोकांसोबत काम करावे लागणार आहे Sad

खरे आणि सुसंस्कृत, चांगले जेन झी जंतर मंतर वर नव्हतेच>>> डोळे मिटून दूध पिणारी मांजर Wink
ह्या असल्या सत्तेत ढोंगी पाखंडी बाबा लोक सरळ पे रोल वर सुटुन मजेत राहतात. देशा साठी गोल्ड आणणार्या कुस्तीपटू पण सुरक्षित नाहीत & न्याय मिळत नाहीये तर रेप करणारे कशाला घाबरतील? माहित आहे त्यांना, सुटतीलच ते. करा गुन्हे.

<< शाळा ठीक करा म्हणलं तर कोणाला प्रॉब्लेम कसा वाटू शकते हे कळण्यापलीकडे आहे असो >>

----- समस्त भारतीयांच्या मुलांनी शिकावे असे सर्वांनाच वाटायला हवे. तेव्हढेच दिमागी नक्षली कमी.
नाहीतर ३५००० हजार कोटी एका उत्सवासाठी खर्च होत असतांना शिक्षणासाठी (शाळा, सुविधा) पैशांचा खडखडाट दाखविला नसता.

https://www.ndtv.com/india-news/1-of-kumbh-budget-could-save-125-schools...

ह्या असल्या सत्तेत ढोंगी पाखंडी बाबा लोक सरळ पे रोल वर सुटुन मजेत राहतात. >> आताच बातमी पाहिली - राम रहीम ला १७ व्या वेळी furlough मिळाला. हयाखेपेस २१ दिवसांसाठी !!

जेन झी ला सुसंस्कृत असल्याचे प्रमाण पत्र कुणाकडूनही नको आहे हाच प्रॉब्लेम आहे.>>>
जेन झी सुसंकृत नाही तर कोण आहे सुसंकृत.
३० दिवस जंतर मंतर येथे मुली रात्रंदिवस निर्भय पणे वापरल्या. एकही केस molestation ची आली नाही. अगदी मुली तिथे रात्री रस्त्यावर झोपल्या होत्या पण त्यांना भीती वाटली. जेन झी ने त्यांना अगदी आदरपूर्वक वागवले. हे भारतात किती धार्मिक स्थळी दिसून येते.

जेन झी ने घाणेरड्या मानसिकतेच्या भाजपेयी नेत्यांना शिव्या दिल्या त्यापण जेन झी ची डोकी फोडलीत, डोळे फोडलेत, हात पाय तोडले त्यानंतर

कुठलेही आंदोलन मोडण्यासाठी शहा यांनी आखलेली SOP इथेही वापरण्यात आली होती. नंतरच सर्व काही बिथरले. अतिरिक्त बळाचा वापर करण्याचे आदेश कुणी दिले याचे उत्तर टाळण्यासाठी अमित शहा लपत आहे.

सहा वर्षाचा आंदोलनकारी विद्यार्थी जो इतक्या लहान वयात आपल्या भविष्याची चिंता व्यक्त करतो आणि ह्याला जबाबदार कोण आहे हे त्याला पक्के ठाऊक आहे म्हणून तो आंदोलनात सामील झाला. पोलिसांनी नेहमीप्रमाणे माती खाल्ली आहेच. खरंच ही नवीन पिढी हाताळणे कठीण आहे, खासकरून ७५ वय झालेल्या पिढीला. धाप लागेल ह्या जेन अल्फाला समजून घ्यायला .

https://youtu.be/Vw-WfbNbBc0?si=gkuoNRV7APz52OG-

Pages