Submitted by स्वाती२ on 20 August, 2026 - 12:48
मंडळी,
आमच्या भारतातील सदनिकेचे रिडेवलपमेंट होण्याची लक्षणे आहेत तर या बाबतचा व्यवहार करताना टॅक्सेस वगैरे बद्दल माहिती हवी आहे. आम्ही अमेरीकेचे रहिवासी असल्याने भारत अणि अमेरीका या दोन्ही देशातील टॅक्स लॉज लागणार तर मायबोलीकरांपैकी कुणी यातून गेले असल्यास त्यांनी अनुभवाचे बोल शेअर करावे ही विनंती. तसेच अशा प्रकारच्या व्यवहारातली टॅक्सेसची बाजू संभाळण्यासाठी अनुभवी सीए-सीपीए वगैरे सुचवल्यास खूप मदत होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
याचा फारसा अनुभव नाही. पण
याचा फारसा अनुभव नाही. पण सदनिका विकण्याचा अनुभव आहे. २०२४ च्या नवीन नियमानुसार किम्म्तीच्या १२.५० टक्के कर भारतात भरावा लागतो.
इथे Federal Income Tax साठी Dual Taxation Treaty असल्याने तो कर Federal वाले हिशोबात धरतात.
पण राज्य (state) हा कर हिशोबात धरत नाही. ते तुमच्या उत्पन्नात आलेली रक्कम धरतात आणि त्यावर कर लावतात. निदान न्यू-जर्सी मधे तरी हे होतेच. तुमच्या राज्याचे नियम तुम्हाला शोधावे लागतील.
सदनिका redevelop झाली तर तुम्ही तुमचे पैसे खर्च करत आहात, तेव्हा त्यावर अमेरिकेत कर लागण्याची शक्यता वाटत नाही. भारतात त्यावर किती कर लागतो (किंवा लागतो का) हे माहीत नाही. पण गुंतवणूक करताना शक्यतो कर नसतोच. तुम्ही विकायला गेलात की झालेल्या फायद्यात सरकार वाटेकरी असते.
किमतीच्या का. नफ्याच्या नाही
किमतीच्या का. नफ्याच्या नाही का?
By default, TDS for NRIs is
By default, TDS for NRIs is deducted on the original total sale price (sale consideration), not just the capital gains. This often catches non-residents off guard and results in significant over-withholding.
धन्यवाद परदेसाई.
धन्यवाद परदेसाई.
मी आमच्या राज्यात सध्या चांगला सीपीए शोधत आहे. आमच्या नेहमीच्या टॅक्सवालीला याची काही माहिती नाहीये. सध्या सोसायटीतर्फे नुसती बोलणी सुरु आहेत असे भाच्याने सांगितले पण मी आयत्यावेळी घोळ नको म्हणून शोधाशोध सुरु केली आहे. आमची रिटायरमेंटचे roth conversion, ACA subsidy, medicare irmaa वगैरे कसरत असणारच आहे. त्यात अजून या सदनिकेमुळे काही नवे प्रश्न उभे रहाणार असल्यास निदान त्या साठी थोडीफार तयारी हवी.
मला जी माहिती मिळेल ती इथे अपडेट करेनच.
म्हणजे विकताना टॅक्स घेतला
म्हणजे विकताना टॅक्स घेतला जातो त्यात पूर्ण विक्रीची किंमत धरून त्यावर लावतात आणि मग रिटर्न्स भरताना कॉस्ट बेसिस वगैरे धरून तो कसा कमी हवा हे दाखवले जाते, व (होपफुली) त्यानंतर रिफण्ड मिळतो, असे असते का?
फारेंड, बरोबर आहे, दीड
फारेंड, बरोबर आहे, दीड वर्षांपूर्वी एका परिचित एन आर आय महिलेने आपला मुंबईतला फ्लॅट विकला तेव्हा असेच झाले होते. रिफंड मिळायला त्रास झाला नाही.
Lower Deduction Certificate
Lower Deduction Certificate मिळवता येते, फायनल पेमेंट पूर्वी. Tracers site वर फॉर्म 13 अप्लाय करायचा , खरेदी किंमत प्रूफ जोडून, इंडिक्सेशन, विक्री किंमत दाखवून कॅपिटल गेन किती आहे ते दाखवायचे. मग LDC मिळेल ते खरेदीदाराला दिले की मग कॅपिटल गेनवरून TDS कापला जाईल.
https://www.icici.bank.in/nri-banking/nriedge/nri-articles/understanding...
Lower Deduction Certificate
Lower Deduction Certificate साठी बरीच मगजमारी आहे असे ऐकतो. मी प्रयत्नही केला नाही. कोणी केला असल्यास इथे टाका.
मग रिटर्न्स भरताना कॉस्ट बेसिस वगैरे धरून तो कसा कमी हवा हे दाखवले जाते, व (होपफुली) त्यानंतर रिफण्ड मिळतो, असे असते का? > हो .. पूर्वी रुपयाची किंमत , महागाई , किती वर्षे तुमच्या मालकीत आहे असे बरेच Variables असलेले समीकरण होते.. आता सरसकट १२.५% टक्के खरा कर आहे. पण विकताना CA १४.९५% कमीत कमी भरायला लावतो. मग Tax Return मधे Capital Gains प्रमाणे फरक परत येतो.
अजिबात काही मगजमारी नाही,
अजिबात काही मगजमारी नाही, कागदपत्रे नीट हवीत आणि ca चांगला हवा. 30 किंवा त्याहून कमी दिवसात certificate येते. 12.5 चे कमी होऊन 3 / 3.5 पर्यंत देतात. त्याचा पण refund येतोच. सगळे ऑनलाइन आहे, पण ca ला साहेबाला भेटावे लागू शकते
CA करतो नीट सगळे. CA लोक 15 / 20 हजार फी घेतात ह्या कामाची पुण्यात तरी ( 'सगळे' धरून).
थँक्स विकु
थँक्स माहितीबद्दल!
धन्यवाद लंपन. चांगली माहीती.
धन्यवाद लंपन. चांगली माहीती. मला वाटते की १२.५% आधी काय आणि शेवटी काय द्यावेच लागतात. नाहीतर नियमाला अर्थ उरत नाही.
(This percentage is published by Govt. Of India as per CA).
दुसरे म्हणजे मी परदेशात राहत असल्याने CA ला पाठवलेल्या Email चे उत्तर यायला पण दिवस लागतात. आणि बँकेचे व्यवहार आणि मी यावर मी पुस्तक लिहू शकेन. सदनिका विकून दोन महिने झालेत आणि मला काय काय कटकटी कराव्या लागल्या त्या मला माहीत आहेत.
आता मूळ प्रश्नाबाबत -
आता मूळ प्रश्नाबाबत -
१. फ्लॅट रिडेवलप्मेंटला गेल्यावर बिल्डर्/डेवलपर कडुन मिळालेला कॉर्पस फंड आणि टेंपररी जागेचं रेंट भारतात टॅक्सेबल नाहि. परंतु यात एक कॅवियाट आहे. फ्लॅट रेंटल प्रॉपर्टि असेल तर भारतात रिडेवलप्मेंट हा टॅक्सेबल इवेंट होउ शकतो (जसं रेंटल इंन्कम टॅक्सेबल आहे)
२. हाच नियम अमेरिकेत युएस रेसिड्म्ट्सना लागु आहे. ज्याप्रमाणे रिडेवलप्मेंटच्या आधी रेंटल इंन्कम रिपोर्ट करणं बंधनकारक आहे (फॉर्म ११४/८९३८, स्केड्युल इ, १०४० वगैरे), त्याचप्रमाणे बिल्डर कडुन मिळालेलं रेंट टॅक्स रिटर्न्स मधे दाखवावं लागेल...
धन्यवाद राज. तुम्ही खूप
धन्यवाद राज. तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत.
काही विपरित घडल्यास माझ्या आणि लेकाच्या डोक्यावर छत्र असावे या हेतूने कधी काळी घेतलेली ही सदनिका कधीच भाड्याने दिली नव्हती. इन फॅक्ट तिथे कधी कुणी राहिलेच नाहीये.
मला वाटते की १२.५% आधी काय
मला वाटते की १२.५% आधी काय आणि शेवटी काय द्यावेच लागतात. नाहीतर नियमाला अर्थ उरत नाही.>>
कळले नाही. समजा १ करोड विक्री किंमत आहे, १२.५ लाख व त्यावर सेस धरून १४.९५ लाख टीडीएस. आणि समजा तुमचा यात कॅपिटल गेन आहे २० लाख. तर ३ लाखा ऐवजी १५ भरले म्हणजे १२ लाख अडकून पडले, ते रिर्टन फाईल होऊन प्रोसेस झल्यावर मिळणार. पुढल्या जुलै-ऑगस्टमध्ये. यावर व्याजही मिळेल पण मला वाटते ते व्यवहार झालेल्या दिवसापासून नव्हे, पुढल्या १ एप्रिल पासून रिफंड मिळे पर्यंतच्या कालावधीवर ०.५% प्रतिमहिना मिळेल. म्हणजे तुमची विक्री या वर्षी मे मध्ये झाली तर ११ महिन्यांचे व्याज मिळणार नाही. म्हणजे १४ महिने पैसे अडकले, त्यातील ११ महिन्यांवर व्याज नाही. (लंपन, कृपया माझी ही माहिती बरोबर आहे का सांगाल का?)
टॅक्स घर विकल्या वर लागेल ना?
टॅक्स घर विकल्या वर लागेल ना? कि रिडेवलपमेंट च्या प्रोसेस मधे पण टॅक्स चा विचार करावा लागतो?
भारतात असाल तर
भारतात असाल तर रिडेवेलपमेंटच्या प्रोसेसमधे टॅक्सचा विचार करावा लागणार नाही. माझ्या मामाची आणि जावेची सदनिका नुकतीच रिडेवलप झाली, वर्षभरापूर्वी तर त्यांना टॅक्स पडला नव्हता. पण इतर देशात असाल तर तिथले नियम लागणार. उदा. भारतात आपण एक एक ग्रॅम घेवून साठवलेले सोने सोनाराला देतो आणि करणावळ देवून दागिने करतो. कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. पण अमेरीकेत कॉईन/ जुना दागिना दिला आणि दागिना घेतला तर बार्टर केले असे धरुन कॅपिटल गेन टॅक्स आपापल्या ब्रॅकेटनुसार ( २८% / ०%, १५%, २०% वगैरे) पडणार.
ओह मग १ लाखाला घेतलेले घर
ओह मग १ लाखाला घेतलेले घर रिडेव्हलपमेंट्ला गेले कि मारकेट वॅल्यु १० लाख असेल तर ९ लाखावर टॅक्स द्यायचा, असे का? घर त्या पॉईंट ला विकायचे नसेल तरी?
अदिती,
अदिती,
मी सोन्याचे उदाहरण दिले, रिडेव्हलपमेंटचे काय प्रकारे बघितले जाते ते मला माहिती नाही. त्या संदर्भातल्या सल्ल्यासाठी शोधाशोध सुरु आहे.
आम्हाला 'कमी उत्पन्नाच्या विंडोत' आधीच्या पोस्ट मधे लिहिल्या प्रमाणे बरेच काही साध्य करायचे आहे. त्यामुळे सध्या पगार येणे कधी थांबवायचे आणि कुठल्या बकेट मधून कधी आणि किती पैसे काढले तर ओवर ऑल टॅक्स इफिशियन्सी मिळेल त्याची मांडणी सुरु आहे. त्यात आता हे रिडेव्हलपमेंटचे झाल्यास तो टॅक्स इवेंट असेल का, असल्यास ते कधी आणि कशा प्रकारे रिपोर्ट करायचे, कॅपिटल गेन धरल्यास कुठल्या ब्रॅकेटमधे राहिल्याने ते कमी पडतील याचा विचार करावा लागणार म्हणून मग इथे मदत मागितली.
अदिती म्हणताहेत तसं होत असेल
अदिती म्हणताहेत तसं होत असेल तर ते म्हणजे एएमटी ( ऑलिटरनेट मिनिमम टॅक्स) ट्रिगर झाल्यासारखं वाटतंय?
>>काही विपरित घडल्यास माझ्या
>>काही विपरित घडल्यास माझ्या आणि लेकाच्या डोक्यावर छत्र असावे ..<<
इन दॅट केस, मुलाची खाली लिहिलेली कागदपत्रं तयार नसतील तर करुन घ्या.
१. ओसिआय
२. इंडियन पॅन कार्ड; ए मस्ट-हॅव (अमेरिकेतुन अप्लाय करता येतं. हजार रुपये फि दिल्यास अमेरिकन पत्त्यावर फिजिकल कार्ड पाठवतात)
३. आणि शक्य झाल्यास आधार कार्ड..
शक्य झाल्यास म्हणतोय कारण भारतात रेसिडंसीची अट (१८० दिवस) पूर्ण केल्याशिवाय अमेरिकन्स्/ओसिआय धारकांना आधार कार्ड मिळत नाहि. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, एस्पेशियली भारतात ब्रोकरेज्/इन्वेस्टमेंट अकाउंट असणार्या ओसिआय धारकांना. अजुनहि कित्येक फायनांशियल इन्स्टिट्युट्सच्या वेब्साइट्स रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड नंबर दिल्याशिवाय पुढे जात नाहित - बिग्गेस्ट रोडब्लॉक. असो.
आय्रनी हि कि जुगाड करुन आधार कार्ड मिळवता येतं...
धन्यवाद राज!
धन्यवाद राज!
आम्ही ही सदनिका १९९७ मधे घेतली होती. देवाच्या कृपेने त्या सदनिकेची कधी गरज पडली नाही. आता लेकच ३०-३१ चा, त्याची या आधीची भारत वारी झाली ती २१ वर्षांपूर्वी. आता तो स्वतःच्या पायावर उभा आहे, दुसर्या राज्यात त्याचे स्वतःचे आयुष्य सुरु आहे. त्याला ओसीआय आणि पॅन करायला सांगते. बाकी आमची भारतात इन्वेस्टमेंट अकाउंट्स नाहीत. खरे तर गेल्या वर्षी आईबाबांसाठी भारतात गेले होते तेव्हा लेकाच्याच सल्ल्याने या सदनिकेसाठी देशातील व्यक्ती वारस-मृत्यूपत्र वगैरे करुन आले. मात्र आता हे पुनर्विकासचे निघाल्यास सर्व काही वेळेवर, नियमाप्रमाणे निभावता आले की हुश्श!
सध्या लेकाच्या सल्ल्यानेच Boldin ची वार्षिक वर्गणी भरलेय तर त्यात आकडे घालून वेगवेगळ्या परीस्थितीत काय याचा अंदाज घेणे सुरु आहे. शेवटी डेथ आणि टॅक्सेस हेच शाश्वत! मृत्यू काही हातात नाही, जमेल तितकी टॅक्स इफिशियंसी आमच्यासाठी आणि पुढे लेकाच्या कुटुंबासाठी एवढीच माफक अपेक्षा.
स्वाती२
स्वाती२
मला याबद्दल बाकी काहीच माहिती नाही पण शेवटच्या पोस्ट मध्ये तुम्ही लिहिले आहे की वारस आणि मृत्यपत्र केलं आहे.
जर ही प्रॉपर्टी किंवा त्यामधून होणारा नफा तुम्हाला नकोच असेल तर जागा बक्षिसपत्र करून इतर कोणाच्या नावावर करता येऊ शकते. त्याला किती amount वर लिमिटेशन असेल तर ते विचारावे लागेल. असे केल्याने री डेव ची जबाबदारी देखील तुमची राहणार नाही.
सल्ला योग्य वाटला नसेल तर इग्नोर करा .
धन्यवाद सावली! हा एक नवा अँगल
धन्यवाद सावली! हा एक नवा अँगल मिळाला. त्या दृष्टीनेही विचार करेन.
>>तर जागा बक्षिसपत्र करून इतर
>>तर जागा बक्षिसपत्र करून इतर कोणाच्या नावावर करता येऊ शकते. <<
तुमच्या मुलालाच ती जागा द्यायची असल्यास, गिफ्ट हा ऑप्शन मी रेकमेंड करणार नाहि - टॅक्सेशन्च्या दृष्टिकोनातुन..
तुम्हि विल केलंय हि अतिशय चांगली स्टेप आहे. मुल्गा सोल लीगल एयर असल्याने प्रॉपर्टि ऑटोमॅटिक त्याच्या नांवावर होइल. विल रजिस्टर्ड केलेलं असेल आणि इतर कोणि दावेदार नसतील तर प्रोबेट कोर्टात खेपा माराव्या लागणार नाहित. इन्हेरिटेड प्रॉपर्टि अॅट्रॅक्टस लेस कॅपिटल गेन टॅक्स दॅन ए गिफ्टेड प्रॉपर्टि...
>>इन्हेरिटेड प्रॉपर्टि अ
>>इन्हेरिटेड प्रॉपर्टि अॅट्रॅक्टस लेस कॅपिटल गेन टॅक्स दॅन ए गिफ्टेड प्रॉपर्टि...>> धन्यवाद राज. हे लक्षात ठेवेन.
या सदनिकेचा वारस मुलगा नसणार आहे ( ते त्याला माहिती आहे, निर्णयात त्याचा सहभाग होता.).
+१ चे म्हणणे - लेक त्याचे बघायला समर्थ झाला आहे तरी मी स्वतःसाठी सेफ्टी नेट म्हणून या सदनिकेकडे बघावे. तसेच आत्ता गिफ्ट डिड करुन नात्यातील मंडळींत चर्चा-वाद-अपेक्षा वगैरे उद्भवू शकतात. त्या पेक्षा पुनर्विकासाचे झाल्यास योग्य सल्लागार शोधून जे काही व्यवहार या निमित्ताने करावे लागतील ते करावे.
सल्लागार मिळाला की इथे काय ते सांगेनच. मी बर्याच वर्षांपूर्वी एकदा roth आणि simple ira चा घोळ केला होता तेव्हा चक्क टॅक्सवाल्यांनाच फोन केला होता. त्या IRS च्या बाईंनी सगळे ऐकून घेतले आणि घाबरु नको म्हणत छान मार्गदर्शन केले होते. आत्ताही तसे करावे का असा विचार करत आहे.