तू विसरल्यानंतर

Submitted by Kalpesh Gaikwad on 7 August, 2026 - 11:45

खरी किंमत कळली तू गेल्यानंतर
मी एकटाच उरलो तू नसल्यानंतर

तू प्रतिसाद माझ्या गे! जीवनाचा
मी इशारेच केले तू बोलल्यानंतर

बरी स्वप्ने ती की ज्यात तू होतीस
घर अडगळीत गेले तू गेल्यानंतर

मलाही त्याचा गे ! दुःश्वास‌ झाला
ज्या सुरांना हाय! तू टाळल्यानंतर

घुमतो‌ आवाज‌ तुझा , कानी‌ माझ्या
जेव्हा नाकरले मला तू भेटल्यानंतर

अजब तमाशा होता नाशिबाचा माझ्या
मी स्वतः विसरलो‌ , तू विसरल्यानंतर

Group content visibility: 
Use group defaults