Submitted by सिद्धेश्वर विला... on 6 August, 2026 - 12:02
मेहफिलीत सुरांच्या, सूर चोरिले मी
येत नव्हते गाता, तरी छेडिले मी
ऎदीत त्या सुरांचा ठेक्यात घात केला
स्वप्नातल्या कलेचा गर्भात पात झाला
स्वप्नात देखीले मज , सुरांशी खेळताना
सत्यात झुंजलो मी, सुरांना चोरताना
कंठात माल भरला, तरी ना ताल धरला
मालकंस छेडता , कंठाशी प्राण आला
रदीफ काफिल्याने भलेही धुंद झालो
मेहफिलीत सुरांच्या पुन्हा पुन्हा नहालो
जखम त्या ज्वराची जरी खोल आहे
अजूनही गळ्याला सुरांची ओढ आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा