Submitted by deepak_pawar on 6 August, 2026 - 01:19
रात दाटली दाटली
उरी भावना कल्लोळ
एका दिव्याचा उजेड
लिही प्रकाशाची ओळ.
सारा अंधार अंधार
मनी एक आठवण
जरा उसवी अंधार
असं नभात चांदणं.
कोण झुरे अंधारात
कोण आठवितो कुणा
काळोखाच्या वाटेवरी
शोधी पावलांच्या खुणा.
काढी का ही रात अशी
काळजाला उकरून
चांदण्यांच्या सोबतीनं
येई तुझी आठवण.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर
सुंदर
सुंदर.
सुंदर.
दत्तात्रय साळुंकेजी, मानव
दत्तात्रय साळुंकेजी, मानव पृथ्वीकरजी मन:पूर्वक आभार.
सुरेख, सुरेख
सुरेख, सुरेख
आवडली. मस्त आहे.
आवडली. मस्त आहे.
आवडली!
आवडली!
बेफ़िकीरजी, सामोजी, भ्रमरजी
बेफ़िकीरजी, सामोजी, भ्रमरजी मनःपूर्वक आभार
सुरेख जमलीय कविता..!
सुरेख जमलीय कविता..!