Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 August, 2026 - 09:15
उगाच लट्टू होते
कधीही खुट्ट होते
कधी मिठी ती घट्ट
कधी तो लडिवाळ हट्ट
कधी खमंग वास
कधी कधी तो त्रास
हवाहवासा श्वास
ऐसा कैसा हा सहवास
आधी होते फक्त दोन
आता दोनाचे चार
अजुनी चार येता
कसे सोसू ते प्रहार
पगार फार थोडा
दहा तारखेलाच घोडा
लगाम होई जेव्हा लाल
कसे सोसू मी ते हाल?
हाती धरावा ग्रंथ
करावे काम संथ
करू नये कधी रवंथ
सांगुनी गेले संत
ऐकून ज्ञान सारे ,
फुलले पुन्हा पिसारे ,
पुन्हा तसाच शिमगा ,
पुन्हा जुने धुमारे ....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा