धुक्यात चालताना…

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 August, 2026 - 09:14

दिसतील त्या गोष्टी पाहायच्या,
नजरेआड होताच विसरायच्या,
आठवणी ताज्या करायच्या…
धुक्यात चालताना…

अशीच भेट झाली
नजरेसमोर आली
हवेत विरून गेली
धुक्यात चालताना…

तरीही जिवंत आहे ,
धुक्यात हरवलेला…
भले परतलो मी
धुक्यात चालताना…

धुके विरून गेले
जरी चिरून गेले
लोचनात खास जागा
तिच्याच पावलांना....

वाट हि धूकेरी
एकटाच चालतो मी
आस का त्या पावलांची ?
हृदयात स्पंदनांना .....

पुन्हा नव्याने तेथे
धुक्यात मी हरवलो
विरळ होत गेली
सोडून पाऊलखुणांना …

सिद्धेश्वर पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults