दहावीनंतर मी पार्ल्याच्या म. ल. डहाणुकर महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा आईकड च्या नातलगांनी तिथे इकॉनॉमिक्स साठी प्रा. नलिनी पंडित आहेत, हे सांगितलं.
त्यांचं नाव त्याआधीच माझ्या कानावर पडलं होतं. माझ्या मावशीच्या यजमानांनी मात्यापित्याचं छत्र लहानपणीच गमावलं होतं आणि त्यांचं संगोपन संवर्धन नलिनी पंडितांचे सासरे बाबुराव पंडितांनी केलं होतं. माझी आई मावशीपेक्षा दोन वर्षांनी लहान. आई माझ्या मामांकडे माहीमला राहायला होती. पंडितांचं घर बांबुळी निवास हेही माहीमला. बांबुळी हे त्यांच्या गावाचं नाव. आई मावशीसोबत बांबुळी आणि बांबुळी निवास दोन्ही जागी गेलेली, राहिलेली होती. आई- मावशी इ. भावंडांचं गावचं - मालवणचं घर त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर कधीचंच सुटल्यात जमा होतं. त्यामुळे माहेरच्या आठवणी सांगाव्यात तसं आई पंडितांबाबत बोले. त्यांच्या गावी रोजच्या जेवणालाही मोठी पंगत असे आणि पानात काही टाकलेलं त्यांना खपत नसे.
मी लहान असताना आई मला घेऊन पंडित आजोबांना भेटायला गेली होती. ते तोवर पारच वृद्ध झाले होते. ते, पंडित आजी, त्यांची दुसरी सून - ज्यांचं तिथेच मॅटर्निटी हॉस्पिटल होतं, यांना भेटल्याच्या अंधुक आठवणी आहेत.
प्रा. नलिनी पंडित पदवीच्या वर्गांना शिकवायच्या होत्या. त्या तिथे विभागप्रमुख होत्या. आणि आमच्या वर्गाला दोन्ही वर्षी त्याच होत्या. आमच्या वर्गावरचा त्यांचा पहिला तास होताच त्यांना जाऊन मी मावशीच्या संदर्भाने ओळख सांगितली. अर्थात आईचे माहेरचे नाव सांगितले असते तरी त्यांनी ओळखले असते. तिच्या साखरपुड्याला नलिनीवहिनी आल्या होत्या, अशी नोंद आईच्या डायरीत आहे. मी ती आई गेल्यावरच वाचली. नलिनी पंडितांच्या मुलीच्या - शमाच्या लहानपणीच्या आठवणीही आईने पुढे कधीतरी सांगितल्या.
मला हे तेव्हा फार काही माहीत नव्हते.
नुकतीच माझी मावशी गेली तेव्हा नलिनी पंडितांची दोन्ही मुले आपापल्या जोडीदारासोबत अंत्यदर्शनाला आली होती.
हे मी नेम ड्रॉपिंग म्हणून नव्हे, तर इतक्या मोठ्या लोकांचा अकृत्रिम स्नेह माझ्या मावशीच्या कुटुंबाला आणि माझ्या आईलाही मिळाला यासाठी लिहितोय.
कधीकधी कॉलेज सुटल्यावर त्यांच्यासोबत स्टेशनपर्यंत चालत जाताना गप्पा मारायची संधी मिळत असे. त्या काही कौटुंबिक जिव्हाळ्याच्या गप्पा नसत. फार आठवत नाही , पण चालू घडामोडी, सामाजिक विषयांवर त्या बोलत.
मी आणि माझा एक मित्र अशा दोघांना त्यांनी एकदा लायब्ररीत निवांत बोलायला बोलवलं होतं. तेव्हा अध्यापकवर्गासाठी तिथे आत तळघरासारखी एक प्रशस्त खोली आहे असा शोध लागला. त्यांनी त्यांच्या संग्रहातलं - माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट - हे पुस्तक मला वाचायला दिलं होतं. त्यातला विचार माझ्या मनावर ठसला होता आणि पुस्तकं ऑनलाइन विकत घेता येऊ लागल्यावर मी ते विकत घेऊन ठेवलं.


त्यांची मुलगी शमा दलवाई जोगेश्वरीच्या इस्माइल युसूफ कॉलेजात प्राध्यापिका होती. आमच्या कॉलेजच्या म. वा. मं च्या शनिवार गप्पा या कार्यक्रमासाठी त्यांना एकदा बोलवलं होतं.
आम्ही टी वाय ला गेलो, त्यावर्षी प्रा. पंडित निवृत्त झाल्या आणि कॉलेजात दोन माजी विद्यार्थ्यांना बोलवून त्यांची प्रकट मुलाखत घेतली गेली होती. त्यातलं फार काही आठवत नाही.
निवृत्तीनंतर त्या मराठी अर्थशास्त्र परिषद आणि एशियाटिक सोसायटीच्या प्रमुखपदी होत्या.


२६ जुलै २००९ रोजी त्या गेल्या. लोकसत्तेत पहिल्या पानावर त्याबद्दलची बातमी आणि अग्रलेख आले. तेव्हा किती मोठ्या , विद्वान व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभला होता हे आणि त्यातही त्यांचा साधेपणा ठळकपणे जाणवलं.



त्यांची नात प्रा समीना दलवाई यांनी लिहिलेला हा लेख
त्यांच्या स्मृतींना वंदन !
छान लेख.
छान लेख.
माझ्या मैत्रिणीचे हे कुटुंब जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे तिच्याकडून प्रा. नलिनी पंडित, त्यांचे कुटुंबीय , बांबूळी निवास ह्याबद्दल खूप ऐकायला मिळायचं. त्यामुळे आज ही वाचताना मजा आली.
नलिनी पंडिंतांबद्दल/ त्यांची
नलिनी पंडिंतांबद्दल/ त्यांची पुस्तके, वाचायला आवडतील वाटतंय. ओळख आवडली.
छान परिचय.
छान परिचय.
शमा दलवाई आणि हुसेन दलवाई यांची मुलाखत बहुतेक कांचन अधिकारी यांनी घेतलेली बघितली होती. तेव्हा शमा यांनी माहेरचा उल्लेख केलेला.
समिना यांचा लेखही छान आहे.
सुरेख लिहिले आहे भरत तुम्ही.
सुरेख लिहिले आहे भरत तुम्ही. मागेही एक दोनदा तुमच्या लिखाणात प्रा. नलिनी पंडितांबद्दल ओलावा जाणवला आहे.
भरत, तुमचे असे आठवणीपण लेखन
भरत, तुमचे असे आठवणीपण लेखन अगदी पोटातून आलेले मर्मबंधातले आहे हे जाणवते. पूर्वी ही जोगळेकर बाई, शांता शेळके, तुमच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी हे लेख लक्षात आहेत. असे लेख प्रसंगोचित अधूनमधून लिहित रहा.
सुंदर ओघवता परिचय! त्यांच्या
सुंदर ओघवता परिचय! त्यांच्या नातीचा लेखही आवडला.
सुंदर लेख, प्रसंगी नात्याची
सुंदर लेख, प्रसंगी नात्याची नसणारी पण उदंड असणारी माणसे आयुष्यात येऊन आयुष्य कसे समृद्ध करतात त्याचा हृद्य मासला म्हणजे हे लिखाण. आवडलाच.
लेख खूप आवडला. समिनाचा लेख पण
लेख खूप आवडला. समिनाचा लेख पण आवडला.
तुमच्याकडून पूर्वी पण उल्लेख वाचलय नलिनी पंडितांचा
ह्रद्य संस्मरण भरत.
ह्रद्य संस्मरण भरत.
भरत, तुमचा लेख समिनाला पाठवला
भरत, तुमचा लेख समिनाला पाठवला होता. ती धन्यवाद म्हणाली आहे. तिला तिच्या आईने पण लेख पाठवला होता.
खूप मस्त लिहिलंय!
खूप मस्त लिहिलंय!
प्रसंगी नात्याची नसणारी पण उदंड असणारी माणसे आयुष्यात येऊन आयुष्य कसे समृद्ध करतात त्याचा हृद्य मासला म्हणजे हे लिखाण. >>अनुमोदन.
अमितव +१
अमितव +१
सुंदर परिचय..!
भरत, भाग्यवान आहात तुम्ही .. खूप थोर सहवास लाभला तुम्हांला..
मी दलवाईं कुटूंबातील सदस्याचा लेख कुठल्या तरी अंकात वाचला होता तेव्हा नलिनी पंडीताबद्दल वाचलेलं आठवत्येयं..
अवांतर.- माझा मामाही माहिम परीसरातच राहायला आहे अजून.. आईच बालपण तिथेच गेलं.. पूर्वी माहीम परिसर बराच .मराठमोळा होता.... डॉक्टर, समाजसेवकाबद्दल तिच्याकडून ऐकलंय बऱ्याचदा..!
अभिप्रायासाठी सगळ्यांचे आभार.
अभिप्रायासाठी सगळ्यांचे आभार.
अल्पना, तुझे विशेष आभार.
अमित, सध्या डोस्टँडिंग सुरू आहे. कधी पासून ठेवलेली कात्रणे सोडून देताना त्यांच्यासोबत जुळलेल्या आठवणीही लिहून काढतो.
आणखीही लिहायचा विचार आहे. त्यावेळी आता पुरे, असं म्हणू नकोस.
छान हृद्य लिहिलं आहे.
छान हृद्य लिहिलं आहे.