भरून पावली वारी माझी

Submitted by स्मिता श्रीपाद on 27 July, 2026 - 07:35

8874fffb-785c-4665-9a30-f44fa2436d0f.png

स्वरसेतूची पहिली रचना "सावळा विठोबा" ला सर्वांचे खूप प्रेम मिळाले.
विठुरायाच्या वारीसोबत स्वरसेतूची सुरुवात झाली.
यावर्षीची आषाढी वारी आम्ही भरून पावलो.
याच भावनेतून स्फुरलेलं स्वरसेतूचं दुसरं गीत...." भरून पावली वारी माझी "

https://www.youtube.com/watch?v=uTeVPZyrAV4

सज्जनांची भेट, सज्जनांचा संग
नामात हो दंग, मैत्र जीवांचे
तुझ्या नामघोषे, वाणी सुखावली
भरून पावली, वारी माझी

निळ्या अंबरात, पताकांची ओळ
भक्तीचा हा खेळ, खेळू सारे
भक्तांचा सागर, माऊलीच्या घरी
म्हणे वारकरी, वारी माझी

नाचती वैष्णव, तल्लीन होऊन
नुरे देहभान, विठू पायी
टाळ चिपळ्यांना, साथ मृदूंगाची
अभंगात न्हाली, वारी माझी

#वारी2026

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर झालीय ही रचनाही.
एक किर्तनात ऐकलं
पांडूरंगाला सुख हवं असतं तेव्हा तो संतात रमतो.
वारीतही संत ज्ञानोबा, तुकोबा आदी असल्यावर पांडुरंग असणं अपरिहार्य, मग सुखाची काय कमतरता .

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.

पांडूरंगाला सुख हवं असतं तेव्हा तो संतात रमतो.
वारीतही संत ज्ञानोबा, तुकोबा आदी असल्यावर पांडुरंग असणं अपरिहार्य, मग सुखाची काय कमतरता . >> अगदी खरं आहे. वारीमधली उर्जा वेगळीच असते.