चिमटा

Submitted by तुष्कीनागपुरी on 15 July, 2026 - 07:57

सकाळच्या उन्हात तुझ्या
निरभ्र नितळ चेहऱ्याकडे पाहतो ना
तेव्हा वाटतं
एक नक्षत्र चुकून
आकाशगंगेतून माझ्या बाजुला
येऊन बसलंय
कौतुक वाटतं, भीतीही वाटते
की आपल्याला चुकून
हे भाग्य मिळालेय आणि
नियतीला क्षणात चूक लक्षात आल्यावर
सगळं हरवून जाईल
खूप इच्छा होते
गालावरून हात फिरवायची पण
मनात येतं लगेच की आपण
चिमणीच्या पिल्लाला लागणारा
छोट्या मुलाचा हात ठरू नये
फक्त बघत राहिल्याने पण
कधी कधी अपराधी वाटतं
इतकं तरल सौंदर्य आहेस तू
डोळे बंद करून घेतो मी
उघडल्यावर कदाचित तू हरवलेली असशील
अशी आशंका घेऊन उघडतो
तुला पाहतो आणि
स्वतःला चिमटा पण घेऊन पाहतो
.
तू म्हणतेस… मी आहे
मी सुखावतो… डोळेभरून वाहतो..
.
तुष्की नागपुरी
नागपूर, शुक्रवार, १९ जून २०२६, १२:००

Group content visibility: 
Use group defaults

ज्ञानिनाम अपि चेतांसि देवी भगवती हि सा
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति|

अर्थात हिलाच विष्णुमाया म्हणतात जी भल्याभल्या पंडित, विवेकी, तर्ककठोर, विद्वान व्यक्तींनाही आकृष्ट करुन मायेचे आवरण त्यांच्या ज्ञानचक्षुंवरती ओढते.
अति मोहक असते ही विष्णुमाया आपल्याला अपल्या अपत्याच्या प्रेमात सपाटुन आपटवते Happy
---------------------
कविता रिलेट झाली.