आम्ही तीन जोडप्यांचा (एकूण ६ जण) ज्येष्ठ नागरिकांचा गट श्रीलंकेच्या सहलीचे नियोजन करत आहोत. आमची विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स आधीच बुक झाली आहेत. आमचा प्रवास कार्यक्रम (itinerary) खालीलप्रमाणे आहे. आमच्यासोबत ड्रायव्हरसह एक व्हॅन असेल.
आमचा नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:
२३ ऑगस्ट: बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन आणि अनुराधापुराकडे प्रयाण.
२४ ऑगस्ट: अनुराधापुरा शहर दर्शन: श्री महाबोधी, रुवानवेलीसाया, जेतावनारामया, अभयगिरी
मठ, इसुरुमुनिया मंदिर, थुपारामया, कुट्टम पोकुना.
• मिहिंथले रॉक (Mihinthale Rock). संध्याकाळी 'तिस्सा वेवा' (Tissa Wewa) परिसरात निवांत वेळ घालवणे.
२५ ऑगस्ट: पोलोन्नरुवा प्राचीन शहर – गाल विहार, रॉयल पॅलेस, क्वाड्रँगल, डंबुल्ला लेणे मंदिर (Cave Temple).
• कँडी (Kandy) कडे प्रयाण.
२६ ऑगस्ट: बहिरवकांडा बुद्ध पुतळा.
टेम्पल ऑफ टूथ रेलिक' (Temple of Tooth Relic) ला भेट. बोट क्लबमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'एसाला पेराहेरा' (Esala Perahera) पाहणे.
२७ ऑगस्ट: रामबोडा धबधब्याकडे प्रयाण.
• नुवारा एलियाकडे प्रयाण.
२८ ऑगस्ट: नुवारा एलिया – चहाचे मळे आणि चहाचा कारखाना (Tea Factory).
श्री भक्त हनुमान मंदिर (Sri Baktha Hanuman Kovil).
२९ ऑगस्ट: कितुल्गला (Kitulgala) येथे थांबा – केलानी नदी, 'ब्रिज ऑन रिव्हर क्वाई' (Bridge on River Kwai) चे ठिकाण.
कोलंबोकडे प्रयाण.
• गॅले फेस ग्रीन (Galle Face Green) येथे फेरफटका... कोलंबो.
३० ऑगस्ट: कोलंबो शहर दर्शन – गंगारामया मंदिर, इंडिपेंडन्स मेमोरियल हॉल, राष्ट्रीय संग्रहालय, लोटस टॉवर (बाह्य दृश्य), इंडिपेंडन्स स्क्वेअर. हॉटेल सफायरमध्ये कँडियन नृत्य कार्यक्रम.
३१ ऑगस्ट: विमानतळाकडे प्रयाण.
आम्हाला इतिहास आणि निसर्गात रस आहे, पण समुद्रकिनाऱ्यांवर (beaches) फारसा रस नाही, म्हणून आम्ही समुद्रकिनारे वगळले आहेत. तसेच, चढाई करण्यास त्रास होत असल्याने आम्ही सिगिरिया (Sigiriya) चा समावेश केलेला नाही.
प्रवास खूप घाईगडबडीचा न करता यात काही बदल (काही जोडणे किंवा वगळणे) करण्याबाबत तुमच्या काही सूचना आहेत का?
आणि हवामान कसे असेल?
ज्यांनी आधी भेट दिली आहे ते काही आण खी सुचवू शकाल का?
श्रीलन्केत पाउस खूप असतो
श्रीलन्केत पाउस खूप असतो मुम्बैसारखा. . दर दोन महिन्या नन्तर दोन महिने पाऊस असे चक्र चालते. तेवढे बघून घ्या.
आणखी प्रतिसादासाठी विनंती
आणखी प्रतिसादासाठी विनंती करतो
मी अजून श्रीलंकेला गेलो नाही,
मी अजून श्रीलंकेला गेलो नाही, पण साधारण असाच प्लॅन बनवला होता मागे. Colombo => Anuradhapura => Sigiriya/Dambulla => Kandy => Nuwara Eliya => Galle => Colombo असा रिंगरूट) मला Elephant rescue center बघायचे होते ते मी माझ्या सहलीत टाकले होते. नक्की नाव आठवत नाही, सापडले तर सांगतो. (Nuwara Eliya to Galle च्या दरम्यान कुठेतरी होते. कदाचित Udawalawe National Park ) पण याव्यतिरिक्त जमले तर वाटेत Elephant Freedom Project इथे हत्ती बघता येतील, आवड असेल तर कदाचित हत्तीवर बसून सफारी करता येईल.
धन्यवाद सर- उपाशी बोका
धन्यवाद सर- उपाशी बोका
@ रेव्यू
@ रेव्यू
मायबोलीवर श्रीलंका प्रवासाबद्दल दिनेश यांची एक मालिका आहे.
त्यातली माहिती थोडीशी dated असली तरी first hand असल्याने डोळ्याखालून घालावी अशी सुचवणी :
श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
श्रीलंका सहल - भाग ५ - नुवारा एलिया ते कँडी http://www.maayboli.com/node/55900
श्रीलंका सहल - भाग ६ - सिगिरीया http://www.maayboli.com/node/55940
बाकी जालावरचा रीसर्च तुम्ही केला असेलच.
सहल सुखरूप झाल्यावर तुमचे अनुभव अवश्य लिहा ही विनंती.
Colombo, Dambulla, Kandy,
Colombo, Dambulla, Kandy, Nuvara Eliya, Bentota, Colombo.
मी वरीलप्रमाणे केलं होतं.
मायबोलीवर निरू यांचा पण एक
मायबोलीवर निरू यांचा पण एक लेख आहे श्रीलंके संबंधित - जेफ्री बावा ? फारच आवडला होता म्हणून लक्षात आहे.
https://www.maayboli.com/node/62801
अस्मिता, अश्विनी, अनिंद्य,
अस्मिता, अश्विनी, अनिंद्य, धन्यवाद.. वाचेन