But let there be spaces in your togetherness,
And let the winds of the heavens dance between you.
लहानपणी प्रत्येक लग्न समारंभात एक व्यक्तीमत्व नेहमी दिसे, ते म्हणजे 'मुलींच्या हस्तरेखा पहाणारा ज्योतिषी.' नो वंडर ही व्यक्ती नेहमी तरुणच असे आणि संधीसाधू. अवतीभवती जमलेल्या तरुण मुलिंचे हात बघण्याच्या निमित्ताने, हातात हात घेणारी
महाबिलंदर. कारण मुलं भविष्य विचारायला येतच नसत. लग्नाळू मुलींचा मात्र जबरदस्त घोळका असे. या घोळक्यात मी हमखास सापडे. नवरा कसा असेल, मुलं किती असले प्रश्न विचारण्यास पुढे. तेव्हा किती कुतूहल असतं. आता मात्र आयुष्य पार पडलेले दिवस जास्त आहेत आणि न पार पडालेले कमी. आता कळतं - अरेच्च्या! असं जाणार होतं तर आयुष्य. कधी मनात विचार तरी आला होता का की असं जाइल? 
प्रत्येकाचेच हे होत असावे.
लहानपणापासून मी अतिशय आईवेडी तर होतेच पण 'clingy' होते. आता या शब्दाला मराठी शब्द शोधला तर मला सापडत नाही लोचट नाही पण सारखा आईचा पदर धरुन. आई जाईल त्या खोलीत मी. आई म्हणे - सारखी लवलवाट करु नकोस. बाहेर खेळायला जात जा. जरा सुटवंग राहा. पण माझ्यावरती अजिबात परिणाम होत नसे.
हा 'clingyness' सर्वच बाबतीत. मैत्रीणही एकच घट्ट, जीवाभावाची. बाकीच्या सगळ्या काठाकाठावरच्या. पुढे पुढे मलाच माझे कळत गेले आपल्यातील एकच मोठ्ठा दोष सांगा असे म्हटले तर तो म्हणजे - clinginess. हाच सांगता येइल. Elephant in the room. बाकीचे दुय्यम. या दोषाचा सर्वाधिक त्रास मला वाईट स्मृती उगाळण्यात झाला. मी वाईट घटना विसरुच शकत नसे. मन तेच तेच उगाळत राही. आणि काट्याचा नायटा होइ.
अन्य काही तोटे म्हणजे - लोकंही माझा चांगुलपणा अध्याहृत धरत. माझ्याकडुन उत्तम गोष्टी, भेटवस्तू, स्तुती सारे काही उकळून परत जाताना दुगाण्या मारुन जात का तर मी जाणार नाही, मी चिकटूनच रहाणार असा त्यांना विश्वास असे. शिवाय त्यांना इनफ स्पेस न देण्याचा रागही असे. अपमान करत.
पण जसे जसे आयुष्य पुढे पुढे सरकत गेले, तसे तसे हा स्वतःचा स्वभावविशेष माझ्या लक्षात आला. एकदा अमूर्त मनातील अंधारातल्या कोपर्यावर प्रकाश पडला की तेथिल कोळीष्टके दूर होण्यास मदत होते तद्वत, मी लोकांना हेल्दी स्पेस देउ लागले. स्वतः एकच दु:ख वारंवार उगाळण्यापासून स्वतःलाच रोखू लागले. Let Them - Mel Robbins नावाचे माझ्याच साठी लिहीले गेलेले पुस्तक मला सापडले.
स्वतःतच करमणूक शोध, आधार शोध, आनंद शोध, मैत्रिण शोध हे मग साध्य झाले. बाहेर धावु नकोस. बाहेर काहीही नाही. जर चिंतामणी, कल्पवृक्ष ला असला, असला तर तो स्वतःतच सापडेल. हे कळले. Obsession/co-dependency या माझ्या वृश्चिक stellium च्या देणग्या (शाप) यांच्या कचाट्यातून हळूहळू मुक्त झाले, होते आहे. एक अलिप्तपणा अंगी बाणतो आहे. उदासीन वृत्ती. आयुष्य जे देइल ते निर्विकारपणे, स्वीकारण्याची वॄत्ती बळावते आहे.
हे काही त्या कुडमुड्या ज्योतिषाला सांगता आले नसते. त्याच्या मर्यादा, ज्योतिष शास्त्राच्या मर्यादा. पुढे आयुष्य कसे उलगडणार हे गूढच असते. आणि त्यातच मजा आहे.
छान लेख. स्वतःबरोबर वेळ
छान लेख. स्वतःबरोबर वेळ घालवायला जमले पाहिजे.
clingy ला चिकटू म्हणता येईल का?
पुढे आयुष्य कसे उलगडणार हे
पुढे आयुष्य कसे उलगडणार हे गूढच असते. आणि त्यातच मजा आहे.>>+1
मी तर ट्रॅव्हल कंपनी बरोबर प्रवासाला जाते तेव्हा ढोबळ मानाने कुठल्या प्रदेशात जायचं एवढच बघते. रोजचा कार्यक्रम काय आहे ते माहिती करून घेतच नाही. अचानक समोर आलेल्या गोष्टी आवडतात कधी कधी.
>>>>>clingy ला चिकटू म्हणता
>>>>>clingy ला चिकटू म्हणता येईल का?
होय तसे म्हणता यावे. पण त्याला 'clingy ' ची सर नाही.
>>>>>>>>अचानक समोर आलेल्या गोष्टी आवडतात कधी कधी.
कदाचित मला आधी कळले असते तर बर्याच गोष्टी आवडल्या नसत्या. क्वचितच काही आवडल्या असत्या.
माझ्याकडुन उत्तम गोष्टी,
माझ्याकडुन उत्तम गोष्टी, भेटवस्तू, स्तुती सारे काही उकळून परत जाताना दुगाण्या मारुन जात का तर मी जाणार नाही, मी चिकटूनच रहाणार असा त्यांना विश्वास असे. शिवाय त्यांना इनफ स्पेस न देण्याचा रागही असे. अपमान करत.
बेस्ट! हे माझ्यासोबत सुद्धा होई. फरक इतकाच की मी clingy नसलो तरी भिडस्त आहे (आजही) मला कदाचित मायबोली ही एकमात्र खिडकी आहे मनमोकळे बोलायला इतका भिडस्त !
उगाच कशाला कोणाला दुखवायचे, कोणाला तरी त्रास होईल, कोणाला तरी राग येईल, ह्यातच आयुष्य गेले, कन्फेशन धाग्यावर मी थोडासा ह्या स्वभावंगला पण touch केले आहे स्वतःच्या !
पण आता हळूहळू थोडा उद्धटपणा म्हणा किंवा स्पष्टवक्ते पण आणले आहे अंगी, आता मागे वळून पाहता, उद्धटपणा अन् स्पष्टवक्तेपण ह्यातील धूसर रेषा ओळखता येईल की नाही ह्या धाकधुकीने मी कदाचित गप्प बसत होतो, पण हल्लीच जाणवले की आत्मरक्षा म्हणून एखादेवेळी ती धूसर रेषा ठिकठाक ओलांडून आपले ठाणे राखणे पण काही वाईट नाही अगदी नाकातोंडाशी येत असेल तर....
परत ह्याच्यात मी चूक का बरोबर ते माहिती नाही पण असे काहीसे flow मध्ये काम सुरू आहे सध्या.
खूप मस्त प्रतिसाद आहे जेम्स
खूप मस्त प्रतिसाद आहे जेम्स वांड. मला हा ईश्यु आहे. समोरच्याला दुखवायचं नाही - याचा अ तिरेक. सतत पडतं घेणं. लिव्ह नाही तर फक्त ‘लेट लिव्ह‘
पण हळूहळू सुधारणे. अ तिचांगुलपणा इज अ कर्स. याबद्दल नंतर जास्त लिहीन. उदाहरणे आहेत.
मात्र तुमचा प्रतिसाद फार आवडला.
पुढे आयुष्य कसे उलगडणार हे
पुढे आयुष्य कसे उलगडणार हे गूढच असते. आणि त्यातच मजा आहे.>>+1
खरोखर. मस्त लिहिलंयस नेहेमीप्रमाणे.
प्रांजळ लेखन!
प्रांजळ लेखन!
छान लिहिले आहे. माझा स्वभाव
छान लिहिले आहे. प्रामाणिक एकदम!
स्वर्गीय वारं माहीत नाही पण
स्वर्गीय वारं माहीत नाही पण नुसतं वारं माहीत आहे. ते अंगात आल्यावर माणसं घुमतात. मग मी झाडू घेऊन जातो आणि धपाधप धपाधप मारून विचारतो बोल कुठून अलास सोड हे झाड. गंगाजल म्हणून नळाचं पाणी घेऊन जातो.
व्वा!
व्वा!
जरा अवांतर होतंय पण खलिल जिब्रानचे टुगेदरनेस आणि मुलांवरचे विचार अगदी डोळे उघडणारे आहेत..,
Notes to self मध्ये आमचा
Notes to self मध्ये आमचा जलालुद्दीन मोहम्मद रुमी कायम पुढेच ! गडी स्वतःला सांगतोय, ह्या सगळ्या खऱ्या आणि खोट्या, बरोबर आणि चुकच्या भाऊगर्दी पलीकडे एक उन्मुक्त, लिबरेटेड कुरण आहे ! मी (तुला = स्वतःला) तिथेच भेटेन.
आमच्या कुवतीनुसार, जेव्हा ह्याचा अर्थ लावायला जातो तेव्हा वाटते, मला कोण काय judge करतोय, किंवा मला कोणी काय judge करेल ? ह्या दोन्ही विषयांच्या पलीकडे उठून मी पंखासारखा हलका होतो, डोळे मिटून उड्डाण करतो आणि डोळे उघडतो तेव्हा मंगोलियन स्टेप्समधे बसलेला असतो लांबच लांब गवताळ कुरणे असणारा, रूमीचे नॉन जजमेंटल कुरण
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
छान प्रामाणिक लेखन..!
छान प्रामाणिक लेखन..!
आता कळतं - अरेच्च्या! असं जाणार होतं तर आयुष्य. कधी मनात विचार तरी आला होता का की असं जाइल?
प्रत्येकाचेच हे होत असावे.>> हो.. हे , अगदी मनातलं लिहिले आहे.
जेम्स वांड, मला त्या ओळी गूढ
जेम्स वांड, मला त्या ओळी गूढ वाटत पण मग एकदा माझ्या लक्षात आले की तो जो नॉन्जजमेन्टल प्रदेश आहे तो आप्ल्या स्वप्नसृष्टीचा भाग असू शकतो. स्वप्नामध्ये आपला जजमेन्टल स्वभाव निद्रिस्त असतो.
वर्षा, आबा, अस्मिता, माझेमन आणि अनंत यात्री व रुपाली आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
जिवंतपणी त्या अवस्थेला पोचणे
जिवंतपणी त्या अवस्थेला पोचणे म्हणजे आयन रँडचा हॉवर्ड रोर्क होणे ! तिथे पोचल्यावर फार भारी वाटेल पण तोवर ठकसी ठक नटखटासी नटखटच हेच बरे.
आजच मी नॉन जजमेंटल या
आजच मी नॉन जजमेंटल या विषयावरती (पोलरायझेशन) अर्थात भले-बुरे, चांगले-वाईट, सत्य-असत्य वगैरेंवरती पेमा शॉद्राँ यांच्या पुस्तकातील एक प्रकरण ट्रेनमध्ये, वाचले. मला त्या विषयावर लिहायचे आहे. याच लेखात कमेंटमध्ये देते. नंतर ---- आत्ता ऑफिसात आहे.
खूप खूप छान लेखन सामो.
खूप खूप छान लेखन सामो.
>>> पण मग एकदा माझ्या लक्षात आले की तो जो नॉन्जजमेन्टल प्रदेश आहे तो आप्ल्या स्वप्नसृष्टीचा भाग असू शकतो. स्वप्नामध्ये आपला जजमेन्टल स्वभाव निद्रिस्त असतो.>>>
अगदी पटलं.
जेम्स वांड यांच्या notes to self वरून he सुचलं बघ.
To the missed lives.
To the conversations that never happened.
To the homes we almost built.
To the versions of ourselves that waited at stations where no train arrived.
To the people who loved us in the ways they knew, and the people we could not keep.
Simply woww!
Simply woww!
>>>>To the people who loved
>>>>To the people who loved us in the ways they knew, and the people we could not keep.
कळ आली हृदयात. आई आठवली.
>>>>>>आजच मी नॉन जजमेंटल या
>>>>>>आजच मी नॉन जजमेंटल या विषयावरती (पोलरायझेशन) अर्थात भले-बुरे, चांगले-वाईट, सत्य-असत्य वगैरेंवरती पेमा शॉद्राँ यांच्या पुस्तकातील एक प्रकरण ट्रेनमध्ये, वाचले.
पेमा शॉद्राँ माझ्या आवडत्या बुद्धिस्ट लेखिका आहेत. त्या गोर्या आहेत पुढे नन झाल्या. त्यांची पुस्तके प्रॅक्टिकल असतात. परंतु हे 'पोलरायझेशन' प्रकरण पहील्यांदा जरी मला आवडले तरी पुढे पुढे मला प्रश्न पडले. सुरुवात सुंदरच आहे की आपण प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना, विचार यांची विभागणी करत असतो - 'आव्डाणारे' 'न आवडणारे'. आपला जो मेंदू आहे ज्याला त्यांनी काहीतरी बुद्धीस्ट नाव आहे त्याने संबोधले आहे तो फक्त लेबलिंग, जजमेन्ट करत असतो. 'आय अॅम फॉर इट'/ 'आय अॅम अगेन्स्ट इट'. या पलिकडे जायला आपल्याला शिकायचे आहे. समोरची व्यक्ती आपल्यासारखीच आहे. तिला आपल्यासारखाच आनंद होतो, दु:ख होते वगैरे.
.
पण मग प्रश्न आला - गँगस्टर्स, मर्डरर्स, रेपिस्ट , टेररिस्ट वगैरेंचा. त्या वरती बुद्धिझमला अजुन तरी उत्तर सापडलेले आहे असे मला वाटले नाही. जी व्यक्ती अन्याय करते ती स्वतः पिडीत व्यक्तीपेक्षा अधिक पिडीत असू शकते. त्यांनाही करुणेची आवश्यकता आहे वगैरे मला बुलशिटिंग वाटले.
>>>>>मी clingy नसलो तरी
>>>>>मी clingy नसलो तरी भिडस्त आहे
मला बाऊंडरीज आखता येत नाहीत. मी अति पर्सनल गोष्टी शेअर करते. त्यामुळे बाउंडरीज अजुनच आक्रसतात कारण जसे आपल्यात हे दोष असतात तसे अन्य व्यक्तीतही 'बोट दिलं तर हात पकडायचा' वगैरे दोष असू शकतात. हे सर्व तेव्हा नाही तरी नंतर कधी ना कधी बॅकफायर होते.
>>>>>>पण खलिल जिब्रानचे
>>>>>>पण खलिल जिब्रानचे टुगेदरनेस आणि मुलांवरचे विचार अगदी डोळे उघडणारे आहेत..,
अगं ते प्रॉफेट संपूर्ण पुस्तकच सुंदर आहे.
>>>>>>ह्या दोन्ही विषयांच्या
>>>>>>ह्या दोन्ही विषयांच्या पलीकडे उठून मी पंखासारखा हलका होतो, डोळे मिटून उड्डाण करतो आणि डोळे उघडतो तेव्हा मंगोलियन स्टेप्समधे बसलेला असतो लांबच लांब गवताळ कुरणे असणारा, रूमीचे नॉन जजमेंटल कुरण
ही कल्पनाशक्ती फार आवडली.
मीही कल्पनाविलास करते. म्हणजे झोपताना. एखाद्या विशाल वॄक्षाखाली आपण ध्यानस्थ आहोत (पण आपण पुरुष आहोत) असे काहीसे मध्यंतरी क्लिक झालेले. खूप शांत वाटे. पण मग पुढे ते विरत गेले. आता नवीन शोधावे लागणार
माबो वाचक, शर्मिला, जेम्स
माबो वाचक, शर्मिला, जेम्स वांड, आबा, मनीम्याऊ, रुपाली, अनंतयात्री, माझेमन, वर्षा, बोकलत - सर्वांचे आभार.
अगं ते प्रॉफेट संपूर्ण
अगं ते प्रॉफेट संपूर्ण पुस्तकच सुंदर आहे. >>> हो. मला नावच आठवत नव्हतं पुस्तकाचं
थोडे यथोचित.
थोडे यथोचित.
छान प्रामाणिक लेखन..!
छान प्रामाणिक लेखन..!
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
जेम्स वांड उत्तम सुविचार.
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
जेम्स वांड उत्तम सुविचार.
सुरेख लिहिलं आहे.
सुरेख लिहिलं आहे.
जेवां,उत्तम सुविचार.
Pages