जाहीराती

Submitted by पल्ली on 24 June, 2009 - 05:16

मी हे जे काही लिहित आहे ते खरंतर अत्यंत गंभीरपणे लिहित आहे, पण ते कुणाला विनोदी वाटु शकते म्हणुन इथेच पोस्टते.
टी.व्ही. वरच्या काही जाहीराती इतक्या स्सॉल्लीड विनोदी असतात की कधी विनोदी कार्यक्रम बघायचा मूड आला तर आम्ही जाहीराती बघतो आणि त्यावर चर्चा करुन फुक्कट धम्माल करतो. तापदायक मालिका बघण्यापेक्षा हे आवडतं आम्हाला. त्यातुन आम्हाला एक पुणेरी आनंदही मिळतो. उदाहरणादाखल ह्या काही जाहीराती.
लक्सः ही बया वरच्या मजल्यावर बाथरूमची दारं-खिडक्या उघडी ठेऊन अंघोळ करत असते. आणि रस्त्यावर लोक तिरपे बिरपे होउन पडत असतात. हा साबण आम्ही घरी विकत आणला. तो मी माझ्या मुलीच्या अंगाला लावत असताना ती बिचारी म्हणाली, 'आई, चेक कर. रस्त्यावर माणसं पडतायत का बघ.....' बरं, हिची बाथरूमही केवढी! बाथरूम आहे की बाथ हॉल? हिच्या ह्या उघड्या बाथ हॉलसमोर कुणीच कसं रहात नाही. आमच्या इथे तर खिडकी जरासुद्धा उघडायची सोय नाही. खिडकीतुन काय काय प्रकार आत शिरतील सांगता येत नाही. प्राणी, कॅमेरे, वास अगदी स्सगळं स्सगळं. अंघोळ झाल्यावर ती बाहेर पडते. ड्रेसच्या पट्टीला हाताने हळुहळु हसतमुख सुचक नजरेने वर सरकवते. असं पाह्यल्यावर कोण बिचारा कोसळणार नाही राव? कैच्या कै. ह्याच्याच नव्या जाहीरातीत तिची पट्टी खाली सारखी सारखी पडते. कोन नाय बघनार राव? अजुन काय पडतंय का म्हुन.
पीअर्सः एक गुणाची पोर मिम्मी कि मम्मी असं काहीतरी ओरडत घराच्या ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत सकाळी सकाळी हातातल्या बिच्चार्‍या बाहुलीला लोळवत ओढत घेऊन जाते. बघा हं, म्हणजे आईची रूम आणि पोरीची रूम घराच्या अशा २ टोकांना आहे का? वाटेत आज्जी, वडील असं कोण कोण तिला प्रेमानं जवळ घेऊ पहातात तर ती उद्धटपणाने त्यांना दूर ढकलुन ह्या सर्व 'अशुभ' व्यक्तींकडे पहायला लागू नये म्हणुन आपले डोळे झाकुन घेते! मग पडद्याआडुन 'मिम्मी' येते. माझी पोरगी अशी बोंबलत आली असती ना तर येक कानाखाली लावली असती. कान पकडुन विचारलं असतं, काये गं , काय कमी पडलंय तुला?
पण ही मिम्मी हसर्‍या चेहर्‍यानं समोर येते. खर्‍या जीवनातला हाच फरक आहे. तिथं माझ्यासारखी ओरडणारी खरी आई थोडीच दाखवता येते? ती गुणाची पोर म्हणते, 'आज्य माझी एक्झॅम आहे आणि तुझा चेहला माझ्यासाठी लकी आहे. जिला एक्झॅम म्हणता येतं तिला चेहरा म्हणता येणार नाही! अशा ढ मुलीला अभ्यास न करता काय आईचं लक्की तोंड पास कलनाले पलिक्षेत? बरं म्हणजे हा 'उत्कृष्ठ' साबण घरात काय फक्त आईच वापरते काय? मग घरातले बाकीचे कुठला वापरतात? ओके? की ज्यामुळे त्यांचा चेहला लकि नशतो. ह्यांच्याच घरात एकवाक्यता नाही - एकमत नाही तर, आम्ही का ह्यांचं ऐकुन हा साबण घ्यायचा? शांगा बलं??
अता ह्या जाहीरातीत प्रॉडक्ट कोणते आहे ते मला निटसे आठवत नाही. बघा म्हणजे किती चुकीची जाहीरात. एक गोड पिल्लु आईसोबत दवाखान्यात आलंय. ते कुठल्याही अंगानं आजारी होतं असं वाटत नाही. मग दोघेही धडधाकट असताना हे काय दवाखान्याचं इंटेरीअर बघायला आलेत का डॉक्टरांची ख्याली खुशाली घ्यायला? अखेर हसत हसत व्हिजीटर बाई, त्यांचा मुलगा बाहेर निघतात आणि त्यांना बाहेर पर्यंत सोडायला डॉक्टर येतात. तुमचे डॉक्टर येतात का हो तुम्हाला असे बाहेर पर्यंत सोडायला? अगदी कितीही घरेच असले तरी?? बाई आणि डॉक्टर गप्पात्-हसण्यात गुंग असताना बाळ आपल्या हातांनी पाणी घेतं. डॉक्टरांपेक्षा बाईच जास्त आरडाओरडा करतात. आपल्या डॉक्टरांसमोर आपण कसे शहाण्या बाळासारखे वागतो. तिथे काय बोलायची टाप असते का? ते सोडाच बर्‍याचदा डॉक्टर काय बोलले तेच मला नंतर नीट आठवत नाही. (गझनी फेम आजार) म्हणुन मग, 'जे काही असेल, ते सगळं लिहुन द्या' असं मी म्हणते.
एकात तर प्युअर ईट आय थिंकः सेल्समन बिच्चारा जीव तोडुन सांगत असतो, तेही पिवळा धम्मक रेनकोट घालुन. तर हा ग्राहक चक्क त्याला आपल्या चुळेने अंघोळ घालतो. ह्यावरुन तो सेल्समन किती निकड असलेला असणार ते समजते. आपण नाय बा अशा चुळा सहन करणार. लाथ मारुन सोडीन नोकरी, पण चुळ नाय.
दस का लक्सः ऐश्वर्या राय एक चिंटुकली पर्स घेऊन एकटीच शॉपींग मॉल मध्ये फिरत असते. दहादा लोक्स 'दहा-दहा' असं हाताची दहाही बोटं नाचवत तिच्यासमोर येतात. ही ऐश्वर्या शोल्डरलेस ड्रेसला (लेस लावलेला शोल्डर नव्हे, शोल्डर लेस म्हणजे शोल्डर नसलेला) नाडीच्या पट्ट्या लावून फिरतेय. लोक काय सोडतील तिला! १०-१० करण्यापेक्षा 'ऐश्वर्या ऐश्वर्या' म्हणत तिला गराडा घालतील की! तुमच्यासमोर अशी ती आली तर तुम्ही काय कराल? आ? आ??
संतुरः ही एक जेलसी क्रिएट करणारी जाहीरात आहे. कारण अशा जाहीराती बघुन माझ्यासारख्यांना हेवा -मत्सर ह्यानी ग्रासलं जाऊ शकतं. 'हाय, यंग लेडी.' असं म्हणत काही लोक चेहर्‍याचा जमेल तितका मोठा चम्बु करुन विचारतात. तिनं उत्तर देण्यापुर्वी तिची एक ६-७ वर्षाची पोर येते, 'मम्मी....' म्हणते. त्यावर पुन्हा तोच चंबु. पुन्हा प्रश्न. 'मम्मी??....' ह्या लोकांनी चंबुची दहावेळा प्रॅक्टीस केली असणार. इतका एक्सारखा सगळ्यांचा चंबु? ह्या मम्मीची मुलगी एवढी, म्हणजे हिचं लग्न ७-८ वर्षापुर्वी झालं असणार... मग हिचं वय.... काय टोटलच लागत नाहीये. बहुतेक ह्या मम्मीचं लग्न वयाच्या १८व्या वर्षी कायद्याला धरुन झालं असणार!
क्लोज्-अपः 'पास आओ.. पास आओ....... पास आओ ना.....ऊऊऊ उ' हा. असंच आहे ते. असे पार्श्वगीत चालु असताना एक नवयौवना साबणाचे फुगे-बुडबुडे जत्रेंत सोडत असते. ह्याच उद्देशाने जत्रेत आली का काय ही. सोड बुडबुडा-गाठ मुलगा. तर त्यातला एक बुडबुडा एका उच्चासनावर बसलेल्या माकडाच्या अगदी जवळुन सरकतो. माकड हात लांब करुन चांन्स घ्यायचा प्रयत्न करते पण बुडबुडा त्याच्या हाती लागतच नाइ काइ. माकडांना फ्रेश ब्रेथची गरज नाही असे वाटत असणार ह्यांना. आता ते माकडालाच विचारले पाहिजेल, पण त्या मुलीला माकड नको असेल म्हणुन तो आज्ञाधारक बुडबुडा आपली मार्गक्रमणा करीत राह्यला. आणि मग तो निर्णायक क्षण. एवढ्या गर्दीतुन वाट काढीत तो बुडबुडा त्या भाऊगर्दीतल्या त्या एकमेव देखण्या तरुणाच्या तोंडावर फुटतो. कुणी फोडला बरं, म्हणुन तो प्रेमाने पहातो तर ती तरुणी त्याच्या समोर पाय क्रॉस करुन उभी. अशी अ‍ॅक्शन लहानपणी आम्ही ' बाई, मला घाईची लागलीय. मी जाऊ....' च्या वेळी करत असु. कुठल्या लिक्वीडने असे दिर्घकाळ आणि लांबवर टिकणारे बुडबुडे तयार करता येतात ते मला कुणी कळवेल का प्लीज. अहो, माझ्या मुलीनं हट्टच धरलाय. तिलाही असेच बुडबुडे बनवायचेत.
ह्या जाहीरातींवरुन एक जाहीरात आठवली, एक माणुस आपल्या बाथरूममध्ये दात घासत असतो. त्याच्या दातात कळ येते, अचानक दार उघडुन एक दाताडी तरुणी माईक, कॅमेरामन्स, फोटोग्राफर्स वगैरे बराच् मोठा जामानिमा घेऊन आत येते. रागावुन विचारते, 'तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे काय?' आता बोला! नशिब, तो बिचारा कपडे बिपडे घालुन बिलुन असतो. नाहीतर त्याचं दात घासणं असं जागतीक लेव्हलच्या ऑलीम्पिकच्या उदघाटनासारखं प्रक्षेपीत झालं तर? आणि पेस्टमध्ये मिठ घालण्यापेक्षा आम्ही मिठच पेस्ट म्हणुन वापरु. निदान तिथे तरी आमची हुकुमत असावी. देवा रे, ती जाहीरात मी जेव्हा प्रथम पाहिली तेव्हापासुन भितीनं मी दात घासताना किंवा अंघोळ करताना, अगदी 'ते' करताना सुद्धा कपडे घालुन किंवा सावरुनच बसते. न जाणो, आपल्याही दारातुन कुणी अचानक आलं तर. निदान कडी तरी घट्ट लावल्याची खात्री पुनःपुन्हा करुन घेते. आणखी एक सुरक्षिततेचा उपाय म्हणुन मोठ्याने 'मी आत आहे' अशी घोषणा करुनच आत जाते. अजुन एक भिती म्हणजे अचानक बिल्डींग कोसळली किंवा भुकंप झाला किंवा एखादं विमान आमच्या बिल्डींगमध्ये घुसलं तर! काहीही होउ शकतं हल्ली. तुम्ही पण विचार करा ह्याच्यावर.
(शेवटची जाहीरात माझ्याच 'माझी प्रेमकथा' ह्या लेखातुन साभार चोरलेली आहे. केवळ नवीन वाचकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणु ही पुनःप्रकाशनाची योजना केली आहे. धन्यवाद)
अजुन बर्‍याच जाहीरातींवर वैचारीक मंथन केले आहे. टायपायचा कंटाळा आला म्हणुन थांबले. पुढच्या वेळी पकवेन. जमल्यास. Happy

गुलमोहर: 

Rofl

भयंकर आहेस तू !

सह्हीच..मज्जा आली..
कधी विनोदी कार्यक्रम बघायचा मूड आला तर आम्ही जाहीराती बघतो आणि त्यावर चर्चा करुन फुक्कट धम्माल करतो. >> मी ही असंच करते...
मस्तंच...

पल्ले लय भारी Lol

पल्ले माझा प्रवास ह्या संतुर मॉम पासुन सुरु झाला, घरी एकमताने पिअर्स वापरुन तुम्हारा चेहरा पण करुन झाला लेकीचा, घराबाहेर आता ओ काकी काय हवय तुम्हाला अस विचारतात दुकान्दार Proud

टक्या तुला इतकं लोळायला काय झालं? Uhoh
पल्ले, बरं जमलंय, इतकं काही खास नाही. लिखाण अजून खुमासदार करता आलं असतं.
तु ही आवरतं घेतलंस की काय? (सगळ्या पल्लव्यांना 'आवरतं घेण्याच्या रोग झालाय का काय? :फिदी:)

मी पण पिअर्स वापरते, परवा नविन मोबाईल घ्यायला गेले तिथे २४/२५ वर्षाचा मुलगा.. मध्येच मला म्हणाला वैसा नही होता आँटी... Uhoh

पल्ली Lol ... अगदी अगदी.. हाच टारगटपणा आम्ही घरी जाहिराती पाहुन करत असतो... त्या लक्सच्या किश्श्याला तुला एक सेम पिंच... माझी लेक म्हणते ती बया बाल्कनीत का आंघोळ करतीये ? Wink अगं ती जाहिरात राहिली की हमामची "मुझे मेरी बेटी को बचाना होगा ?' ... :खीखी:

लयीच भारी लिहीलयस (अगदी गंभीरपणे सांगतेय हं ;-))

पल्ले, पल्ले, पल्ले काय बोलु आता? किती दांडगे निरिक्षण हे
पण काहीही म्हण मजा आली बाकी.
अजुन बर्‍याच जाहीरातींवर वैचारीक मंथन केले आहे. टायपायचा कंटाळा आला म्हणुन थांबले>>>>>>>>कंटाळा करु नको लिहायचा बिनधास्त लिह.

पल्ले, मस्तच गं. कवे, तू एवढीशी आहेस तरी तुला काकी? मग मला तर आजीच म्हणतील Uhoh

***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

पल्ले, अगदी अगदी! Happy मस्त लिहिलहेस
या जाहिराती बघताना माझ्या मनात पण अगदी असेच विचार येतात!
च्यामारी, येड्यासारख यान्नी पब्लिकला खुळ तरी किती समजायच ????
अजुन लिही ग! Happy

(सगळ्या पल्लव्यांना 'आवरतं घेण्याच्या रोग झालाय का काय? ) >>> दक्षु.. याला जात्याच असलेला समजुतदार पणा म्हणतात बाई Wink पण पल्ली तु नको आवरतं घेऊस... येऊ दे अजुन... झक्कास लिहीतेस बघ

>>>> "मुझे मेरी बेटी को बचाना होगा ?' LOL
अरे महान आहे ती जाहिरात, ती जाहिरात बघितली की लिम्बी जाम खवळते! का कुणास ठाऊक!
की तिच तिलाच "मुझे मेरी लिम्बोणीको बचाना चाहिये" अस म्हणत धावत पळत (अर्थातच धापा टाकत) चाललेली ती स्वतः जाणवते????

>>>>> पल्ले, बरं जमलंय, इतकं काही खास नाही. लिखाण अजून खुमासदार करता आलं असतं.
>>>>> मध्येच मला म्हणाला वैसा नही होता आँटी...
त्या पहिल्या वाक्याच्या प्रभावामुळेच तो तुला आँण्टी म्हणला असेल! Biggrin Light 1

तुम्ही पण विचार करा ह्याच्यावर. >>> Rofl

अरे हे धमाल आहे. Rofl तरी ती राहीलीच आता कसे होणार माझ्या मुलीचे वाली.

छान लिहिलंय. आणखी बर्‍याच अशा आचरट जाहिराती आहेत. त्याबद्दल लिहि बघू. Happy

Lol
पल्ले लेख मजेशीर आहे!
ऐशची ती अ‍ॅड मॅकडोनल्डच्या अ‍ॅडवरुन ढापलेली आहे बहुतेक.( तशीच मॅकडीची अ‍ॅड बघितलीय.)
_______________________________
"शापादपि शरादपि"

क्या बात है | लिहीत रहा.
*************************************************
मी उगाच हळवे, अंतर राखून बोलत नाही
त्या आठवणींना मनामध्येही तोलत नाही.

आवडली बरका ठमे.. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

न म स्का र ..........
प हील्याच जाहीरातीने मन जि॑कले....मस्तच....
कोल्हापूरी मध्ये - नाद नाही करायचा...
ध न्य वा द.............

<<<टी.व्ही. वरच्या काही जाहीराती इतक्या स्सॉल्लीड विनोदी असतात की कधी विनोदी कार्यक्रम बघायचा मूड आला तर आम्ही जाहीराती बघतो आणि त्यावर चर्चा करुन फुक्कट धम्माल करतो. तापदायक मालिका बघण्यापेक्षा हे आवडतं आम्ह<<<>>>
पल्लीजी,
अरे, ही तर " ताण घालवण्याची तुमची युक्तीच".
छान लिहीलंय ! खरंच एकदम विनोदी, हल्क फुल्कं.
धन्यवाद.
------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
१. http://www.maayboli.com/node/8639
२. http://www.maayboli.com/node/8628

खा खा खा Lol खरय पल्ले..वाचा फोडलीस.. अत्याचाराला Happy

Lol Lol

<मी पण पिअर्स वापरते, परवा नविन मोबाईल घ्यायला गेले तिथे २४/२५ वर्षाचा मुलगा.. मध्येच मला म्हणाला वैसा नही होता आँटी...> Lol Lol

पल्ली :हहगलो:, अजुन्पण अत्याचार करणार्या जाहिराती सुटल्या ग तुझ्या तावडीतुन, पार्ट २ मधे लिहि आता

वैसा नही होता आँटी Lol

पल्ले मस्त लिहीलंय...
भाग दोन होउन जाउ दे ...
सार्‍या गावात मळून माखून लाईफबॉय चा एक रुपया घेउन आलेला मुलगा रहिला की..

वा ... खरच सुंदर विश्लेषण आहे.
बाकीच्या जाहीरातींचे विश्लेषण पण येऊ देत. टायपायसाठी काही मदत हवी आहे का ? Wink
बाकी इतर जाहीरातींमधे 'माझ्या मुलीला वाचवायला हवं' बरोबरच ती स्म्रुती ईराणी ची 'दूध उबालुन घेता तर पाणी का नाही' किंवा 'हत्तींच्या दातातून निघालेल्या प्रकाशाने जंगल मे मंगल होने' वाली जाहीरातसुद्धा खूप विनोदी आहे. कारण दोन्हीमधे दाखवत अस्सलेल्या कृत्याचा आणि त्या वस्तुचा कुठल्याच अंगाने काही संबंध समजत नाही.
=== I m not miles away ... but just a mail away ===

भन्नाट लिहीलस गं.. ह.ह.पु.वा.. Lol नशिब आजुबाजुला कोणी नव्हतं.. अजून लिही की, कंटाळा नगं करूस, अशी माझी तुला विणम्र विणंती हाय.. Happy

Pages