Submitted by अनन्त्_यात्री on 11 July, 2026 - 02:14
मला ओळखलंत?
आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने टोणगा निवडून दिला होता त्यानं परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष मीच
रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच
परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच
समूळ काँक्रिटलेल्या झाडाने धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच
ओळखलंत मला?
सॉरी, कसं ओळखणार तुम्ही मला?
मला चेहराच कुठंय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
दाहक...
दाहक...
हम्म्म!
हम्म्म!
बाप रे!!!
बाप रे!!!
(No subject)
वास्तववादी कविता..!
वास्तववादी कविता..!
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद!