Submitted by मंदार गद्रे on 10 July, 2026 - 01:01
श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च अंबर तू
युगायुगांची तहान मी
कातळांतला पाझर तू
संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू
महाभारता कारण मी
पार्थाचा योगेश्वर तू
चिंता, शंका, संभ्रम मी
त्या साऱ्यांचं उत्तर तू
- मंदार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
>>>>>संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू
अप्रतिम!
धन्यवाद, सामो!
धन्यवाद, सामो!
श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च हा शब्द प्रथमच वाचला, जरा भरगच्च शब्द वाटला पण छोटी बहर निभवायची आहे त्यामुळे हा नवा प्रयोग इंटरेस्टिंग (रोचक म्हटले तर तो अर्थ निघत नाही) वाटला.
या शेरानंतर एक पॅटर्न पकडलेला दिसतोय, मी..तू वाल्या ओळींचा. त्या प्रेडिक्टेबिलिटीमुळे जरा मजा कमी होतेय पण प्रतिमा आवडल्या सगळ्यांच.
इथे ज्योती शब्दाने एका शब्दाची जागा घेतलीय असे वाटले, यावर विचार व्हावा.
आवडले.
एक "मी..तू" चा पॅटर्न ठरल्या मुळे गज़लेपेक्षा कवितेच्या अंगाने रचना वाचली गेली. आशय छानच आहे आणि आवडलेला आहे.
धन्यवाद, तुष्कीनागपुरी!
धन्यवाद, तुष्कीनागपुरी!
सुंदरच !
सुंदरच !