सरसकटीकरणाचे अभंग

Submitted by अनन्त्_यात्री on 5 July, 2026 - 02:01

अलिप्त, स्वमग्न | ऐसी ज्यांची ख्याती
पडीक असती | ऐ x वर ||१||

कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
म म व लोटले | मा x वरी ||२||

उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||

नेमका पर्याय | पा/सी/बो मधून
घ्यावा निवडून | फुल्ली साठी ||४||

आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||५||

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऐसीचा आदर | मिपाही चांगले परी मन जुळले | मायबोलीशी ||
नाही केली वारी | ऐसी अन् मिपाची ओढ मात्र साची | मायबोलीची ||
कथा अन् कविता | गप्पा मनमोकळ्या वाचता ओघळत्या | वेळ कळेना ||
म्हणुनी संस्थळ | आवडे मज भारी मायबोली खरी | मनाजवळी ||

मस्त Lol

कॉमी
ऐ, मा, मि पुढे पा/सी/बो योग्य ते जोडा.

मानव पृथ्वीकर
हे तुम्ही सांगितले म्हणून समजले .
मस्तच आहे!

मस्त आहे!

तिन्ही ठिकाणी भरपूर लिहीले आहे. प्रतिसादांमधे वेगळेपणा जाणवतो तिन्हीकडे.

पण होम ग्राउण्ड माबोच.

छान कविता..!
मी फक्त मायबोली संस्थळावरच आहे. इथेच आवडते.