ओंजळीतलं सुख

Submitted by एम . प्रविण on 21 June, 2026 - 12:22

पहाटच्या पारी उठू, काटा पायात रुततो,
घाम पुसत डोळ्यांचा, जीव शेतात राबतो.
ऊन-पावसात नशिबाच्या, जळलीये पुरणाची पोळी,
काट्याकुट्याने लाल झाले हात, ओंजळीत थोडी फुलं जरी!

घराच्या त्या उंबऱ्यात, धनी हताश बसून,
जीव खचतो आत . मोडलेले बघून पाय,
लोकं गावकुसाबाहेरची , काळज टोचती ,

"करम हीच काळ !" हसू चवीनं पाहती
माज्या कपाळाचं हे कुंकू, नुसता लाल मळवट न्हाई,
अंधाऱ्या संसाराला माझ्या , तोच उजेड गाठाई.

धनी माझा न बोलता, नुसत्या नजरेनं धीर देतो,
थरथरत्या हाताने, अश्रू ओघळून गळा
ऊन-पावसाच्या खेळी धावे , तीच माझी विठाई पुण्याई
कातडी जळलीये पुरी , नशिबाच्या या खेळापाई

चंद्रमौळी घर माझं , त्या डोंगरी शिवारी
दोन गुणी लेकरं , गाय बकुळी जांभळीखाली
धुरानं रोज गरिबीच्या , डोळा घळघळ पाणी
धनी मायेचं पाखरू, अश्रू हसून जागती

रोज नवा फास-डाव , कुंकवाच्या धन्यासाठी
पाठी संसार घेऊन , पाऊले शिवार धावती
दुनिया बोले बारातोंडी, उरा काळजीच नाही
साथ धन्याची श्वासासंगे , तयार मी जग जिंकायला स्वारी !!!!

Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार माबोकर , मी हि कविता पहिल्यांदाच पोस्ट करत आहे , मी ती कविता या सरळ ग्रुप मध्ये पोस्ट केला आहे .
मला समजत नाही कि हे बरोबर योग्य त्या ग्रुप मध्ये पोस्ट झाले आहे कि नाही. तसे नसल्यास कृपया मला मार्गदर्शन करा योग्य ठिकाणी सामाविस्ट करण्याबद्दल. आभार