नशिबाचा हिशोब

Submitted by एम . प्रविण on 21 June, 2026 - 02:42

नशिबाच्या या कोऱ्या कागदावर, दुःखाचीच का फक्त शाई?
मी खचणारा माणूस नाही, नसांत माझ्या अजून विझली नाही आग ही!
रोज सोसाव्या फसव्या चांदण्या, रोज वाटेत काटे पेरले,
मी जरा हसू पाहतो कुठे, तोच डोळे पुन्हा आसवांनी भरले.

अडचणींचा सुटलाय हा वेढा, भोवती एकटेपणाचा अंधार दाटतो,
पण अशाही एकाकी रात्री, मी स्वतःच्याच साथीने दिवा लावतो!
कितीही छळू दे ही वेळ मला, कितीही लावू दे माझा अंत,
माझ्याच कष्टाने लिहीन आता, माझ्या उद्याच्या विजयाची वाट.

थिजलेल्या या मनगटात माझ्या, हिंमतीचा अजून एक महासागर आहे,
...........................................................अजून संपलो नाही मी, माझा तर हा केवळ पूर्वार्ध आहे!

Group content visibility: 
Use group defaults