कुणासारखी तू, कुणासारखी

Submitted by deepak_pawar on 18 June, 2026 - 01:14

कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.

तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
कधी वागते ना मनासारखी.

तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
कधी वागते ना मनासारखी.

गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
कधी वागते ना मनासारखी.

https://youtu.be/Waz-9JC5yu4

Group content visibility: 
Use group defaults

दीपक जी
अरे मस्त आहे हे. गाणे वाचले ऐकले आवडले.
Wish you all the Best!

केशवकूलजी, रूपालीजी, सामोजी मन:पूर्वक धन्यवाद.
सामोजी,
गावाकडे काही वयस्कर व्यक्ती तरी हा शब्द दारू साठी वापरायचे कविता लिहिताना हाच अर्थ डोक्यात होता पण दुसरा अर्थ
"तरी" (नाव/होडी) झुलणाऱ्या होडी सारखी मनाला एका वेगळ्याच धुंद जगात घेऊन जाणारी आहे