Submitted by किरण कुमार on 15 June, 2026 - 03:02
वाटणीने संकटे वाट्यात आली
वेदनेची वादळे थाटात आली
कुंपणे झाडास केली बाभळीची
सावली मग नेमकी काट्यात आली
मी तिच्या लग्नात बसलो पंगतीला
आठवांची जिन्नसे ताटात आली
शांत होतो मी लवादाच्या ठिकाणी
शेवटी ही जिंदगी वादात आली
खंत असते शूर वीरांची इथेही
बायको ना आजवर ताब्यात आली
दूर गेली ती तयाचे दुःख नाही
एक कविता छानशी दारात आली
... ... किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>दूर गेली ती तयाचे दुःख
>>>>दूर गेली ती तयाचे दुःख नाही
एक कविता छानशी दारात आली
उत्तम
छान कविता आहे, आवडली.
छान कविता आहे, आवडली.
शेळी जाते जिवानिशी
शेळी जाते जिवानिशी