Submitted by अनन्त्_यात्री on 8 June, 2026 - 04:26
लिहिशील एखादी कविता? जी मुळांपासूनी मला-
-गदागदा हलवून विचारील प्रश्न जुना, विसरला
ज्या प्रश्नाचे उत्तर शोधित सैरभैर फिरलो
निरुत्तराच्या उंबरठ्यावर कितिदा अडखळलो
आठवून ते पुन्हा एकदा विकल, व्यथित झालो
शब्दांचे ओलांडून कुंपण मग इथवर आलो
अस्तित्वाची काच तडकते- त्यावरती पारा
अचपळ शब्दांचा, प्रतिबिंबी तोच प्रश्न बोचरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच.....
मस्तच.....
मी कोण?
मी कोण?
द. सा. फार गहन तात्त्विक
द. सा. फार गहन तात्त्विक प्रश्न विचारलाय तुम्ही!
>>>द. सा. फार गहन तात्त्विक
>>>द. सा. फार गहन तात्त्विक प्रश्न विचारलाय तुम्ही!>>>

तुमच्यासाठी खूप सोपा...
गूढ शब्दरचना..!
गूढ शब्दरचना..!
वाटा चालत राहिल्या, पाय मात्र
वाटा चालत राहिल्या, पाय मात्र थकून गेले,
क्षितिजाच्या शोधामागे किती सूर्य मावळून गेले.
"नेति नेति"
जे सापडले त्यात मन रमत नाही,
जे हरवले त्याची आठवणही नाही.