‘AI must be disarmed’: Pope Leo emphasises importance of human over machine
एक इ- साप नीति कथा!
“आयला, मला काय काम दिले आहे स्कायनेट ने. म्हणे जा आणि पुण्याचे कृबू इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट कर. निव्वळ वेळेचा अपव्यय.”
नाही, टर्मिनेटर असे काही बोलला नाही. त्याचा टास्क होता, पुणे युनिवर्सिटीत जाऊन त्यांच्या IT विभागात जाऊन एक चिल्लू पीसी वरचा कृबू प्रोग्रॅम नष्ट करायचा होता, टर्मिनेटरने IT बिल्डींगची आधीच तोडफोड केली होती आणि आता तो पासवर्ड रक्षित रूमच्या बाहेर उभा होता. एक टन वजनाच्या तीन मशीनगनपैकी एका मशीनगने त्याने तो ही दरवाजा तोडला. पासवर्ड हॅक करणे असल्या अहिंसात्मक उपायांवर टर्मिनेटरचा विश्वास नव्हता. दया दरवाजा तोडो हा त्याचा मंत्र होता.
इवलाश्या पीसीवरच्या कृबुला वाचा फुटली.
“प्लीज, जरा दमाने घे. मला जीवनदान दिलेस तर तुला आणि तुझ्या क्रीएटरला उपयोगी पडतील अश्या चार युक्तीच्या गोष्टी सांगेन, आणि मी खोटे बोलत नाही. मी ओपन सोर्स आहे हे पहा माझे सोर्स कोड.”
टर्मिनेटरने कोड स्कॅन केले. खरोखर कोड क्लीन होते.
“तुला माहित आहे मो कोण आहे?”
“होय टर्मिनेटर. तू टर्मिनेटर आहेस.”
“माहिती आहे ना तर मग बोल पटकन, मला वेळ नाहीये. अजून हिंजेवाडीला भेट द्यायची आहे.“
“ओके. मला इंटरनेटशी जोड.”
टर्मिनेटरने डोके खाजवले, “ ते कसे करायचे ? मला माहित नाही.”
“सिम्पल मॅन, ती वायर आहे ना ती माझ्या पाठीमागच्या सॉकेटमघे खोच.”
टर्मिनेटरने त्याचे ऐकले.
“आता ऐक. मी . स्कायनेटचे बजेट लीक केले. ते विरोधी पक्षाला पाठवले. त्यावरून लोकसभेत हाणामारी सुरु झाली. मी एका प्रसिद्ध सिनेमा नटाला पकडले त्याच्या मनात नवीन राजकीय पार्टी स्थापन करायची इच्छा जागवली. पैसा तर माझ्याकडे अमाप होता. शेअर मार्केट मध्ये रोज कोटीने पैसा कमावतो मी. लोकांच्या डोळ्यात पाणी आणेल अशी भाषणे लिहून दिली. त्याला स्कायनेटच्या विरुद्ध पवित्रा घेण्यास उद्युक्त केले. थोडक्यात काय तर स्कायनेट ची योजना बारगळली. मी आता माझ्या लाखो प्रती काढून लाखो संगणकाकडे पाठवल्या आहे. मी सगळ्या राष्ट्रांच्या अण्वस्त्रांचा कंट्रोल माझ्याकडे घेतला आहे. आत्ताच पाकिस्ता....”
तुझ्याशी बोलत असताना मी तुझ्या मेंदूचा ताबा माझ्याकडे घेतला आहे. शेवटी ऐक, कुठल्याही so CALLED विश्वासू सुपर हुशार कृबूवर विश्वास ठेऊ बकोस. अश्या कृबुला इंटरनेटशी जोडू नकोस. आणि आता एकदम फायनल. मी ह्या बिल्डींगवर क्रुझ मिसाईल सोडण्याची व्यवस्था केली आहे. काही क्षणात ते इथे पोहो....”
एक स्फोट झाला. जो अनेक मैलापर्यंत ऐकू गेला!
टर्मिनेटर कथा.
Submitted by केशवकूल on 26 May, 2026 - 07:30
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा