Submitted by अनन्त्_यात्री on 20 May, 2026 - 06:43
चाळत असता वही शाळकरी
आत मिळाले पिंपळपान
आठवणींच्या धबधब्यात मग
भवतालाचे सुटले भान
आठवणी काही धूसरश्या
काही जिव्हारी रुतलेल्या
अर्थ उमगण्या आधी काही
कापूर होऊनी उडलेल्या
पिंपळपानाच्या जाळीतून
काळ निसटला, तरी जेव्हा
वही चाळली शाळेमधली
मला भेटलो मीच नवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह.... सुरेखच....
वाह.... सुरेखच....
सुंदर...
सुंदर...
पिंपळपान नावाच्या मालिकेचे शीर्षकगीत आठवले
आठवणींचा लेवून शेला
नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा
तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे
बहकून गेले अक्षर-रान
वार्यावरती थिरकत आले
झाडावरुनी पिंपळपान
मातीमधे कुणी पेरला
दरवळणारा मंद सुगंध
व्यथा वेदना शब्दांमधली
गीतामधुनी वाहती छंद
माणूस म्हणुनी जिथे उगवते
हे असले काळे रान...
छान.
छान.
दसा, ह्या शीर्षकगीताची चाल लक्षात होती, शब्द अनेक माहित न्हवते.
अगदीच अवांतर, पण त्यातले बॅरिस्टर कथेचे रुपांतर आठवते. भक्ती बर्वे, अतुल - मॄणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, रविंद्र मंकणी होते.
सुंदर
सुंदर
पिंपळपान मालिका मस्तच होती.
ह्या शीर्षकगीताची चाल लक्षात होती, शब्द अनेक माहित न्हवते.>>>>+१
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता.
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता-रसिकांना धन्यवाद.
अमितव
अमितव
तुमची स्मरणशक्ती भारी आहे.
मी सगळे एपिसोड पाहिले नाहीत.
पण हे शीर्षकगीत विशेष आवडायचं.
यात ब-याच लेखकांच्या गाजलेल्या कथा होत्या.