Submitted by किरण कुमार on 5 May, 2026 - 02:43
त्या चातकाप्रमाणे गेली हयात माझी
तेव्हा गझल जराशी आली वयात माझी
गंधाळल्या मिठीचा पुसता न डाग आला
वर्षे निघून गेली खंगाळण्यात माझी
उत्सव दहा दिसांचा झाल्यावरी म्हणे तो
"का फेकलीस भक्ता मूर्ती तळ्यात माझी ?"
बेभान मैफिलीने काळीज का जळावे
गाणी जुनीच बहुधा आली लयात माझी
काळीज खोदल्यावर येतील शब्द ओठी
शोधू नकोस वेडे कविता गळ्यात माझी
किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतल्यातील अलामत सर्वत्र पाळली
मतल्यातील अलामत सर्वत्र पाळली जायला हवी कृपया
ओके, धन्यवाद बेफिकिरजी
ओके, धन्यवाद बेफिकिरजी
ह्यात म्हणजे कशात?
ह्यात म्हणजे कशात?
@Madan Hunkare
@Madan Hunkare
हयात ( जीवन /जीवनभराचा काळ)