Submitted by Madan Hunkare on 19 April, 2026 - 10:26
मी एखाद्याचं खूप कौतुक करतो. म्हणजे मला राहवत नाही म्हणून आपोआप होतं.
या सवयीमुळे कुणी म्हणत कि, "काय बायकांसारखं कौतुक करतोस?"
बायका कौतुक करतात हे खरं आहे. पण हा बायकी गुण कसा काय हा प्रश्न पडायचा. सगळ्या बायका कौतुक करतात असं काही नाही.
त्या वेळी असं सोशल नेटवर्किंग मीडिया नव्हता. नाहीतर त्या वेळी विचारले असते. जन्मत घेतलं असतं.
पुरूष कौतुक करत नाहीत किंवा हातचं राखून कौतुक करतात.
बायका मात्र उघड कौतुक करतात असं खरंच आहे का?
तुमचं मत सांगा बरं का.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी घरच्या स्वयंपाकाबाबत काही
मी घरच्या स्वयंपाकाबाबत काही आवडले तर लगेच तसे कौतुकाने सांगतो. जास्त आवडले तर भरभरून कौतुक करतो. पण त्याचवेळी नाही आवडले तर त्यात काय आवडले नाही हे देखील सांगतो. घरच्यांनी मेहनतीने प्रेमाने केले आहे तर मुकाट खावे असा विचार करून गप्प बसत नाही.
कारण घरच्या स्वयंपाकाबाबत तरी प्रामाणिक फीडबॅक गेला पाहिजे असे वाटते जेणेकरून नेहमी आपल्या जिभेच्या चवीनुसार आपल्या आवडीचे मिळेल
बायका किती राबतात आपल्यासाठी
बायका किती राबतात आपल्यासाठी. रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण समजावून सांगण्यासाठी एव्हढे चपखल उदाहरण दुसरे नाही.
रोज जेवण बनवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे माहिती असल्याने एकमेकींच्या स्वैपाकाचं कौतुक करावं लागतं. चांगलं बनलं नाही तरीही त्या मेहनतीचा आदर करता यायला पाहीजे. अब्दुल कलाम यांच्या वडलांची गोष्ट वाचली होती.
पण ही उपरती टिकत नाही. आपण आपल्या जगात गेलो कि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होत असतात.
त्यातून उलट बायकांवरचे जोक्स. एकदा अनुपम खेरने कपिल शर्माला अशा जोकवरून सुनावलं होतं. पहिल्यांदा अनुपम खेर सेन्सिबल वाटला.
खरं सांगायचं तर इथे हे लिहीलं तरी स्वतःमधे सुधारणा झाल्या तर त्याला किंमत आहे. इथे लिहीण्यासाठी खोटं लिहीणं म्हणजे अप्रामाणिकपणाच आहे.
राबणाऱ्या व्यक्तीला
राबणाऱ्या व्यक्तीला कौतुकाजागी सुटका मिळाली तर जास्त आवडेल. नाहीतर आमची ही बिर्याणी काय भारी बनवते म्हणत नवरा दहा मित्रांना खायला घेऊन येत असेल आणि सारे मिळून तोंड फाटेस्तोवर कौतुक करत असतील तर त्याचा तिला काय फायदा.. उलट आता हे पुन्हा पुन्हा येतील याचे टेन्शनच येत असेल.
पण तेच तिला आपल्या पाक कौशल्याचे कौतुक असेल आणि स्वतःहून कोणाला करून खाऊ घालण्यात आणि कौतुक करवून घेण्यात आनंद असेल तर गोष्ट वेगळी.
म्हणून आयुष्यात तेच काम करावे जे स्वतःला करायला आवडते. मग त्याचे कौतुक झाले तर आनंद द्विगुणित आणि नाही झाले तरी काही फरक पडत नाही. आपण आपल्या आयुष्यात खुश असतो.
मलाही माझ्या एखाद्या लिखाणाचे, फोटोचे, व्हिडिओचे, एखाद्या सवयीचे, वर्तनाचे, स्टाईलचे, अगदी दाढी मिश्या हेअर कटचे वगैरे कौतुक झाले की बरे वाटते. ते सगळे हौसेने अन आवडीने केले असते.
पण तेच ऑफिसमधील कामाचे कौतुक झाले की टेंशन येते, की अरे देवा आता हे आणखी काम लावतील
ऋ हा प्रतिसाद आवडला आणि पटला
ऋ हा प्रतिसाद आवडला आणि पटला
हा धागा वाचला तेव्हा स्त्री
हा धागा वाचला तेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्या एका गुणातील तथाकथित फरक हा विषय वाटला. विरंगुळा विभागात आहे.
त्यात स्त्री विरुद्ध पुरुष किंवा पुरुषांनी स्त्रियांचे विरुद्ध स्त्रियांनी पुरुषांचे केलेले कौतुक अपेक्षित आहे वाटले नव्हते.
तसे असल्यास आपला पास.
काही पोस्ट्सचा अपवाद वगळता
काही पोस्ट्सचा अपवाद वगळता इथे बाई-पुरुष अशी विभागणी कौतुक करायच्या बाबतीतसुद्धा दिसते आहे. असं का?
एखाद्या "व्यक्तीचं" तिच्या कामाच्या पद्धतीसाठी कौतुक केलं जातं का? संघटनकौशल्य, संवादकौशल्य, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढणं, आर्थिक नियोजन, माणसं जोडण्याचा गुण अशा अनेक गोष्टी आहेत ना ज्या "माणूस" म्हणून जगताना रोज/ अनेकदा गरजेच्या असतात? आणि त्या लिंगनिरपेक्ष असतात. कोणतीही स्त्री किंवा पुरुष दुसर्या कोणत्याही स्त्रीचं किंवा पुरुषाचं या गोष्टींसाठी कौतुक करतेय/ करतोय हे प्रमाण अजूनही म्हणावं तसं वाढलेलं दिसत नाही. अर्थात हे एक विधान आहे, संपूर्ण वास्तव नाही. माझा सॅम्पल सेट खूप मोठा नाही, पण सहजपणे हे घडताना निदान आजूबाजूला राजरोस दिसत नाही.
"तो किती कर्तबगार आहे! मोठ्या कंपनीत नोकरीला आहे! चांगलं मोठ्ठं घर आहे!" आणि "तिने घर छान सांभाळलंय हो! आणि पुरणपोळ्या तर इतक्या मऊसूत करते की बास!" हे मी अनेक कुटुंबातून ऐकत आले आहे. यातल्या "त्याने" दुसरं काही केलं तरी ते गौण आहे, आणि "तिने" तर दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण असंच चांगलंचुंगलं करून घरच्यांना वाढावं ही अपेक्षा कौतुकामार्फत अधोरेखित होते. (वर ऋन्मेषची पोस्ट आहे तसंच काहीसं). मग बाकी "व्यक्ती" म्हणून असलेले गुण राहिले बाजूलाच!
असो. कदाचित विषयांतर वाटेल, पण हे लिहिणं गरजेचं वाटलं.
कदाचित विषयांतर वाटेल, पण हे
कदाचित विषयांतर वाटेल, पण हे लिहिणं गरजेचं वाटलं...... खरं आहे. स्त्री आपल्या विश्वात कितीही कर्तबगार असो, ती घर कसं सांभाळते त्यावर तिचे कौतुक होते.
पण 'Ways ऑफ कनेक्टिंग' मधे
पण 'Ways ऑफ कनेक्टिंग' मधे खरच फरक आहे.
कसलं भारी लिहीतात इथे. एक
कसलं भारी लिहीतात इथे. एक से एक कमेण्टस आहेत.
बायका पटकन कौतुक करतात किंवा तसा मनमोकळेपणा असतो हे माझं मत बरोबर आहे.
ऋन्मेष यांचा प्रतिसाद भारी आहे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांचे आभार. मनापासून आभार.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांचे आभार. मनापासून आभार. >> :ऑ ऑ ऑ! इतकं कौतुक!!!
(No subject)
अमितव ते आभार मानणे झाले.
अमितव ते आभार मानणे झाले. कृतज्ञता व्यक्त करणे झाले.....
<ऋन्मेष यांचा प्रतिसाद भारी आहे.> कौतुक याला म्हणतात
मला उगीचच भरभरून कौतुक नाही
मला उगीचच भरभरून कौतुक नाही करता येत. जनरली बायका एकमेकींना, एकमेकींच्या मुलांना येता जाता कॉम्प्लिमेंट करतात ते मला जमत नाही. काहींना मी खडूस वाटत असेन. नवरा तर कौतुकाच्या बाबतीत माझ्यापेक्षाही कृपण आहे. आता सवय झाली.
जेन्यूइनली एखादी गोष्ट आवडली तर मी मनापासून कौतुक करते. ते करताना मी वय, जेंडर वगैरेचा विचार करत नाही. सुदैवाने कुठल्याही पुरुषाने ते वेगळ्या अर्थाने घेतल्याचा अनुभव आला नाही कधी.
जेन्यूइनली एखादी गोष्ट आवडली
जेन्यूइनली एखादी गोष्ट आवडली तर मी मनापासून कौतुक करते. >>> मी पण. व्यक्ती नावडती असेल तरी तिने काही कौतुक करण्या जोगं काम केलं असेल तर मी नक्की कौतुक करते.
पण बेस्ट फ्रेंड ने बेकार ड्रेस घातलेला असेल आणि विचारले तरी सांगेन, मला नाही आवडला पण तुला आवडला ना? बास मग
काल बायको, सूनबाई, नात असे
काल बायको, सूनबाई, नात असे एका सिरीयस पेशंटला म्हणजे काकीला घायला गेलो होतो. त्या पिढीची शेवटची शिलेदार. तिच्या घरापर्यंत गाडी जात नसल्याने थोड्या अंतरावर लावली आणि चालत गेलो. घ्यायला चुलतनातसून आली होती.
रस्त्यात सर्वांनी एकमेकींच्या आधीच्या लांब आणि दाट केसांचं कौतुक केले. काकीला बोलायला येत नाही, उठता येत नाही पण तिने खुणांनी सुनेचं आणि नातीचं कौतुक केले. अगदी तोंडभरून हसली.
ते बघूनच रडायला आलं. शेवटच्या दिवसात पण बायका कौतुक करतात.. त्यात काही खोटं नव्हत. कसली अपेक्षा नव्हती. बायकांत देव वास करतो.
Pages