एकदा झालेली चूक

Submitted by सतिष on 17 April, 2026 - 01:17

एकदा झालेली चूक आता पुन्हा नको,तुझ्यापुढे प्रेमाची ती भिकही पुन्हा नको ,
असलो जरी भुकेला मी भावनांचा,तुझ्या आपुलकीचे खोटे सुखही नको,
तुझ्या आठवणींच ओझ घेऊन का जगाव बर मी,माझ्या हृदयात तुझ्या प्रीतीची ती धाकधुकही नको,
नको स्वप्नातही भास तुझा आता,आणी तुझ्या सहवासाची आसही नको ..
जगेल माझ आयुष्य असेच एकट्यात मी,चुकूनही पुन्हा तुझी गाठ अन भेटही नको..
सतीश ❤️

Group content visibility: 
Public - accessible to all site users