ती (मृण्मयी गोडबोले) परक्या शहरात, परक्या देशात आहे, आणि तिला अचानक रस्त्यात तो (ललित प्रभाकर) दिसतो. तिच्या नजरेत त्याच्या बद्दल काही आहे. ती काही काळ त्याचा पाठलाग करते, त्याला भेटून ओळख द्यावी न द्यावी हा संभ्रम तिच्या डोळ्यात दिसतो आणि तो रस्ता ओलांडायला उभा असताना त्याच्या बाजुला ती उभी रहाते. त्याला ती दिसते, त्याच्या आणि तिच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडुन वहात असताना ते एकमेकांना आलिंगन देतात. ती संध्याकाळ दोघे एकत्र घालवतात. त्यातून त्यांच्यात काहीतरी जुने बंध, ओळखच न्हवे तर घट्ट मैत्री, बहुतेक त्याहुन जास्त अजुन काही आहे याची आपल्याला खात्री पटते. इथवर ते जपान मध्ये टोकियोत आहेत इतपत आपल्याला अंदाज आलेला असतो. एकत्र जेवण झाल्यावर ते रस्त्यातून भटकत असताना रस्त्यातून स्ट्रीट कार/ ट्राम धडधडत जाते आणि तो तिला आलिंगन देऊन चुंबन घेतो. दीर्घ चुंबन. स्ट्रीट कार जाते आणि ती त्याला दूर करते एकदा त्याच्या डोळ्यात बघते आणि तडक माघारी वळते आणि निघुन जाते.
तो तिच्या पाठमोर्या गर्दीत विरुन जाणार्या आकृतीकडे बघत रहातो, आणि वळून चालू लागतो. थोड्याच वेळात त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि लगेच ये, आत्ता?, हो आलोच अशी देवाणघेवाण होऊन पुढच्या शॉटला तो तिच्या घरी आलेला असतो. काही जुजबी संवाद होतात का काय लक्षात नाही, पण ती त्याला एका बेडरुम मध्ये नेते. तिकडे पलंगावर एक ६-७ वर्षांचा मुलगा गाढ झोपलेला असतो. दुसर्याच क्षणी तो तरातरा तिच्या घरातून बाहेर निघुन जातो.
इथवर बघितल्यावर ह्या दोघांचे पूर्वी संबंध होते त्या संबंधातून हे अपत्य जन्माला आले असणार, काही कारणांनी दोघांत दुरावा आला असणार. हा पहिला विचार मनात आला. पण तो तर तरातरा निघुन जातो म्हणजे हे मुल कदाचित त्यांचे नसेल का? किंवा त्याचे आहे हे त्याला माहित नसेल का? फारच बॉलिवुडी होतंय हे... कदाचित तिने दुसरे लग्न केले असावे, आणि आता ती सेटल झाली असावी आणि म्हणुनच कदाचित ती मगाशी चुंबन घेतल्यावर अनकंफर्टेबल होऊन निघुन गेली असावी का? आणि त्याला सत्य परिस्थितीची कल्पना द्यायला बोलावले आणि मुलाला दाखवले असावे का? याहुन जास्त काही वेगळं मला सुचलं नाही. सुचायची गरज ही नाही. हा रहस्य त्याची उकल वगैरे चित्रपट नाही. नात्यांचा नक्कीच आहे, पण रुढार्थाने त्याकडे बघणारा अजिबात नाही. सुरुवातीला रोम-कॉम वाटणारा आणि शेवटाला या नात्याला सेकंड चांस दिला, दोघांना आपपल्या चुका समजल्या आणि ते सुखाने नांदू लागले, 'नांदा सौख्यभरे' वगैरे वगैरे वगैरे तर अजिबातच नाही. पूर्वी काय घडलं आहे, त्यांच्यात काय नातं आहे, काय गुंता आहे आणि पुढे काय होणार? याची उकल होतेच पण ... उत्तरे मिळत नाहीत. ती नकोच असतात. हवेहवेसे प्रश्न तितके झोळीत पडतात. त्यातच तर गंमत!
****************** सिनेमा बघणार असाल तर यापुढे वाचू नका. मी स्पॉयलर न देता लिहिले आहे. तरीही *******************************
आता पुढचा सगळा चित्रपट दोन टाईम लाईन वर दिसतो. आजची जपान मध्ये घडणारी, उलगडत जाणारी गोष्ट आणि भूतकाळात ते एकमेकांना कसे भेटले वेगळे झाले असतील तर का आणि कसे झाले, मुलाचं रहस्य काय इ. इ. ठराविक वळणे असली तरी तपशील ताजा आणि मराठीत तरी न मांडलेला पण अगदी खराच घडेल असा आहे.
मनमर्जिया मधला विकी कौशल, तापसी आणि अभिषेक काहीसे आठवले. काहीशी गेहेराईया मधली दीपिका आठवली. दोघांतले टॉक्सिक प्रेम आहेच, पण ते कबीर सिंग सारखं एकतर्फी टॉक्सिक नाही. अशाच धर्तीवर ललितचाच एक चित्रपट हल्लीच आलेला ना? मला नाव नाही आठवत, पण तो काही इतका आवडला न्हवता. तर दोघांना काहीतरी दुखरी नस आहे, राग अनावर दोघांना होतो, प्रेम ही दोघे करतात म्हणजे 'सांगितल्याविण ओळख तू रे' वगैरे लेव्हलचं नाही, व्यवस्थित दिसेल असे शारीर प्रेम दोघे करतात, अँगर इश्युज आहेत, व्हल्नरेबिलेटी दोघांना आहेत, ताठमानेने जगणारे तर दोघे आहेतच, आहेत ना? का कक्विनियंट आहेत? पण असे सोयिस्कर निर्णय ही दोघांनी घेतले आहेत. दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपलं मुसळ दिसत नाही ही तर आदीम मानवी भावनाच! हे असं टॉक्सिक प्रेम! कुणालाही फक्त चांगलं किंवा फक्त वाईट न दाखवता त्यांच्या मुद्रा, वाचिक, कायिक अभिनयातून दिसत रहातं. ते दाखवताना काळानुरुप प्रसंगांची सरमिसळ होते पण त्यातील तीव्रता कमी न होता ती छान सहज जमून आली आहे.
'त्या'ची मोठी स्वप्नं आहेत पण त्यांची जबाबदारी घेणे त्याला जमत नाही आहे. तो गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेला पण आई वडिलांचा मनस्वी तिरस्कार करणारा आहे. अगदी एकाच मिनिटभराचा तो आणि ती त्याच्या आई वडिलांकडे जेवायला गेलेले असतानाचा प्रसंग. त्यांच्यातील परस्पर संबंध, ताण दाखवणारा, कमीत कमी संवादात घडतो. तो फार सुंदर जमलेला बोलका प्रसंग आहे, अगदी माझ्या मनात घर करुन गेला. साधे संवाद आहेत, पण जादू घडते त्यात.
मुलाची आणि त्याची भेट होते, त्यांची केमिस्ट्री घडू लागते तेव्हाचे ही काही प्रसंग असेच तुटक तीन चार वाक्यांचे आहेत. ती एका प्रसंगात नुडल सूप खाते आहे, पण एका मागोमाग एक घास नूडल्स वर नूडल्सच खात सुटते. त्यात तर एकही शब्द न बोलता या हृद्यीचे त्या हृद्यी समजते. 'ती' ची आई अंथरुणाला खिळलेली आहे, आई नंतर तिला कुणीच नाही आणि आजारपणात कर्ज झालेलं आहे. ती आपल्या पायावर उभी आणि आजची तरुणी आहे. लेव्हल हेडेड आणि परिस्थितीचे भान असणारी, ध्येय साध्य करण्यात काही तडजोडी स्वीकारण्यात काही कमी पणा न वाटणारी, पण स्वतःची मूल्ये तरीही जपणारी.
आता शेवटचा टायटल मधला फुजी. त्या दोघांना असा सहज दर्शन न देणारा धुक्याच्या पडद्या आड लपलेला माऊंट फुजी दिसतो का? ते दर्शन झालं तरी ते लाटांवरील तरंगांसारखेच क्षणभंगुर असेल ना? तसं असलं तरी त्यातुन काय मिळेल? मग दर्शन तरी घ्यावं का? कोण जाणे!
मृण्मयी आणि ललित दोघांचा अभिनय मला आवडला. डोळे आणि चेहरा बोलतो. मोहित टाकळकर आणि इरावती कर्णिक यांची कथा पटकथा आहे. दिग्दर्शन मोहितचे आहे. संपूर्ण सिनेमा दोघांची नावे कुठेच येत नाहीत. त्यांना नावेच नाहीत.
आत्ता आणखी लिहित नाही. आणखी लोकांनी बघितला, आवडला तर बोलूच.
अच्छा
अच्छा
तो ती आणि राजापूरची गंगा
तो ती आणि राजापूरची गंगा :हहपुवा: मला पुण्यामध्ये घडणारा आरपार वाटला. ललितची भूमिका तशीच आहे. ती आणि तो यांना नाव आडनाव नाही हे मला इथे वाचल्यावर लक्षात आलं. लहान पोरगा छान आहे पण कार्तिकेयचा short form कारतू, अगदीच फालतू सारखं वाटलं. तिचे मोठे केस म्हणजे भूतकाळ आणि छोटे केस म्हणजे वर्तमानकाळ असं मी लक्षात ठेवलं बघताना. मी दोन वेळा बघितला. पाऊण हिंदीमध्ये कारण त्याच भाषेत सुरु झाला सोनी लिव वर. भाषा बदलून मराठी केली पण पाऊण चित्रपट संपला तरी भाषा काही बदलली नाही. कंटाळून बंद केला कारण मराठीत बघायचा होता. दुसऱ्या दिवशी सुरु केला तर चक्क मराठीत ऐकू येत होतं मग उरलेला थोडा मराठीत आणि परत पहिल्यापासून मराठीत बघितला.
ती मित्राशी लग्न करते पण सात वर्ष झाली तरी तो मित्रच राहतो हे बघून मला तो मित्र गे वगैरे असतो की काय अशी शंका आली. ललित वडिलांची गाडी वापरतो तरी कसला एवढा राग असतो त्याला, वडील चांगले म्हणायचे जे अशा मुलाला घरात राहू देतात. तिने त्यांच्याकडून पैसे घेतले म्हणून त्याला एवढा राग येतो आणि तो हॉटेलमध्ये येऊन मारामारी करतो तर मला वाटले हा काही बापाच्या घरी कधी राहायला जाणार नाही तर कसचं काय. ती म्हणते वडिलांचे पैसे तुझे हक्काचे पैसे आहेत, हे आई वडील जिवंत असतानाच ठरवतात का, की वडिलांनी याला मृत्यूपत्र दाखवलेले असते की याचा थुक्रटपणा बघून तिला असे वाटते.
ती आईला मारून टाकते असे मला वाटले, पाणी नं देऊन किंवा तसे काहीतरी. शेवटी दोन्ही हिरो निघून जातात, तिचा नवराही तिथे रहात नाही, तो आधीपासून येजा करत असतो की हिरो आल्यावर बॅग भरतो काही कळलं नाही.
एका सीनमध्ये ते लग्न करायचं ठरवतात तेव्हा ते कोणाच्या घरी असतात. जर ते घर तिचे असते तर ते भाडयाने घर का घेतात. ती खरंच खूप चांगली असते कदाचित म्हणून त्याला इतकं सहन करते आणि परत सात वर्षांनी दिसतो तेव्हा त्याचा पाठलाग करते. पास्ता प्रसंग पण छान झालाय, पास्ता आहे ना आणि पाकीट ओट्यावर पडलेले असते.
>>>>>ती मित्राशी लग्न करते पण
>>>>>ती मित्राशी लग्न करते पण सात वर्ष झाली तरी तो मित्रच राहतो हे बघून मला तो मित्र गे वगैरे असतो की काय अशी शंका आली.

>> ती आईला मारून टाकते असे
>> ती आईला मारून टाकते असे मला वाटले, पाणी नं देऊन किंवा तसे काहीतरी. <<
नाही हो, मराठी दिग्दर्शक आहेत ते.
शिवाय ललित प्रभाकरला केअरलेस दाखवले निम्मा पैसा वसूल होतो असा गैरसमज झालाय बहुतेक बऱ्याच लोकांना. हा एक प्रकारच एनिमल इफ़ेक्ट आहे. म्हणजे टोकाची भांडणे वगैरे, आक्रमक सेक्स, आक्रमक इमोशन्स की जणू दोघांनाही बाइपोलर डिसॉर्डर असावा, तरीही त्यांच्यात एक आकर्षण कायम असणे वगैरे.
बास झालाय हाही ट्रोप.
एक प्रकारच एनिमल इफ़ेक्ट आहे.
एक प्रकारच एनिमल इफ़ेक्ट आहे. म्हणजे टोकाची भांडणे वगैरे, आक्रमक सेक्स, आक्रमक इमोशन्स की जणू दोघांनाही बाइपोलर डिसॉर्डर असावा, तरीही त्यांच्यात एक आकर्षण कायम असणे वगैरे. - खरंय, मी अजून प्रत्यक्षात हे असं प्रेमप्रकरण कधी बघितलेलं नाही.
ती त्याला सांगायचा प्रयत्न करते की ती गरोदर आहे - what's app वर एक मेसेज नाही पाठवू शकत? एखादा sms, messenger, मित्रांतर्फे निरोप, एवढे पर्याय उपलब्ध असताना भेटून बोलायचंय, तुझ्या घराच्या बाहेर आहे वगैरे, केवढा ड्रामा, सिरीयल मध्ये दाखवतात असं.
मी कुठला वेगळा सिनेमा पाहिला
मी कुठला वेगळा सिनेमा पाहिला कि काय असं वाटतय इतके पॉझिटिव रिव्ह्युज बघून
माझी एकच प्रतिक्रिया #कपाळबडवति
किती विस्कळीत मांडणी, काय ती कथा आणि काय शेवट !
अशाच टाइपचा ललित प्रभाकरचाच ‘आरपार’ नुकताच पाहिला होता, देजावु होऊ लागला मधे !
पण तो सिनेमा चांगला वाटला होता, हिरो हिरॉइन दोघेही विक्षिप्त होते त्या सिनेमात.
इथे हिरो म्हणजे निकम्मा , अॅब्युजिव, नुसतीच आदळापट करणारा मॅन चाइल्ड !
मुळात फिजिकल अॅट्रॅक्शन शिवाय काय कॉमन होते दोघात ? कशाला ते एकत्रं रहात होते ? प्रेम वगैरे कधी नव्हतेच , काय पॉइन्ट होता पूर्णं स्टोरीचा ?
सेक्स सीन्स, प्रेग्नन्सी टेस्टच्या वेळी बॉटमलेस (हाफ न्युड) बसलेली मृण्मयी हे अगदी बळेच काहीतरी बोल्ड दाखवायचे वेब सिनेमा आहे म्हणून असे वाटले.
हिरो हिरॉइनचे अॅक्टिंग चांगले आहे पण मुळात कथा , दिग्दर्शन हेच काही जमून आले नाहीये.
तो चाइल्ड अॅक्टर मात्रं अगदीच वाइट अॅक्टिंग करत होता, काय रटाळ संवाद बोलतो सगळे एका सूरात तेच कळत नवह्ते !
बाकी 'फुजी ' म्हणजे आत मधे सतत ज्वलन्त लाव्हा असणारा , वरून शान्त तरी कायम थ्रेट असलेला (त्यांच्या रिलेशनशिप सारखा) असा मला अर्थ लागला.
कार्तिकेयचा short form कारतू,
कार्तिकेयचा short form कारतू, अगदीच फालतू सारखं वाटलं

<<
ओह गॉड, मला वाटले कार्तु हे जॅपनिज नाव आहे
खरच आता या सिनेमाचा पुणे ५२ होणार आहे
अमलताश मध्ये ती प्रेग्नंट
.
>> निकम्मा , अॅब्युजिव,
>> निकम्मा , अॅब्युजिव, नुसतीच आदळापट करणारा मॅन चाइल्ड <<
आजकाल हेच हिरो जास्त खपतात. त्याशिवाय कथेला खोली आणि सिनेमाला उंची येत नाही म्हणे.
मला आईला मरू दिले आहे असे
मला आईला मरू दिले आहे असे वाटले, मारलेय असे नाही वाटले. वर्षानुवर्षं आईची सेवा-शुश्रूषा केली आहे कोंडी - अडकलेपण - हतबलता पाहिली असल्याने आई गेल्यानंतर ती आक्रमक, लहरी, मनस्वी वगैरे वागणं साहजिक वाटलं. सुटल्यासारखं झालं असेल तिला, वाहवत गेली. अशा नाजूक वेळी माणूस एकदम स्खलनशीलतेने वागू शकतो. हे पटवून वगैरे देत नाहीये, जे घडलं ते या कारणांमुळे मला एकदम "बायपोलार" वाटलं नाही एवढं सांगतेय. बायपोलार असती तर नंतरही कायम तशीच वागली असती. पण नंतर शांत व निर्णयक्षम होत गेली आहे. नंतर ते आकर्षण "फ्लिंग"ची स्मृती या स्वरूपात उरले असणारच! प्रेम नव्हतंच ते, फ्लिंग होतं. बरेचदा ते नातं विरून गेल्याशिवाय ते प्रेम नव्हतं हे लक्षातच येत नाही. कामातुरानां न भयं न लज्जा.
बाकी तो मित्र आणि त्यांची सिच्युएशनशिप मलाही फारसं कळलं नाही, म्हणजे तो इतका त्याग करण्यामागे काहीही आधार दिसला नाही. पण पिक्चरमधे एकदम (ओव्हररेटेड- असेक्शुअल -स्थितप्रज्ञ) "जिस्म नहीं रूह का प्यारबिर करनेवाले" चांगले बॅकप मित्र असतात.
गे असता तर तो ललित प्रभाकरकडे पाहून तरी आकर्षित झाला असता. हा तर सेमी -नागडाच फिरत होता असेही. हाकानाका. ओशोच्या "संभोगसे समाधी तक" सारखे "फ्लिंगसे फुजी तक" नाव देता आले असते.
मला त्या सीनने ही केअरगिव्हिंग वरची शॉर्ट फिल्म आठवली. खतरनाक आहे , टीस्पून -
https://youtu.be/PG6-BaPDa24?si=vhr3kXcEJRKE7qOO
जाऊ द्या, झालं.
रॉय, पकडके रखेगा, छोडेगा नहीं चाललंय.
कार्तू ला ( मला ते नाव ही
कार्तू ला ( मला ते नाव ही आवडलं. कार्तिकेय फार बोर हाक झाली असती. आणि अशी शॉर्ट नावं क्यूट वाटतात. ) फादर फिगर... रादर फादर हवा म्हणून ती विचारते लग्न करशील का? तो हो म्हणतो. तेव्हा ती बुरसटलेल्या जगात रहात असते. जपानला आल्यावर ओपन अप होते. त्यांनी लग्न फक्त कार्तुला कारण द्यायला केलेलं असतं. ते का केलं? नसतं केलं तर काय फरक पडता? तर हो, काही फरक पडला नसता. करूनही फार काही कथेत फरक पडला नाहीच. त्यांचा चॉईस. बाकी ती आणि तो सेक्शुअली एकत्र आले नाहीत म्हणजे तो गे असणार!
अरे!!! हे असं वाटणार माहीत असल्यानेच तो ती आणि चतुःश्रृंगी आणि तो ती आणि कळसुबाई नाव न ठेवता फुजी ठेवलं असणारं
पोराला चांगला अभिनय जमलेला नाही +१ फार किरकिर पोट्टा आहे. पण जपानी बोलणारा आणि मराठी बोलू शकणार अट ठेवल्याने ऑडिशन पूल आक्रसला असणार आणि जेबीसीडी आगाऊ पोराशिवाय गत्यंतर राहिलं नसणार. त्यावर मेहेनत हवी होती.
आईला मरू दिले आहे असे वाटले, मारलेय असे नाही वाटले >> हो. तिला कंटाळा आलेला सतत शुश्रुषा करत रहायचा. तो सीन चांगला घेतलाय. काहीही न बोलता काय ते दाखवलं आहे.
ती दुसऱ्या वेळेला ती पोटूशी आहे हे तिला जेव्हा समजलं तेव्हा जिवावर बेतेल अशी अटीतटीची वाईट मारामारी होऊन ती बाहेर पडली होती. परत जुळवून घ्यायचं नाही, ताठ मान होतीच पण प्रेम आकर्षण शारीरिक मानसिक आर्थिक जे काही मिळत होतं आणि ते मिळवायला ज्या काही तडजोडी करत होती त्यातून हाती काहीच पडत नाही आहे हे समजल्याने पाश तोडून ती बाहेर पडली होती. पोटूशी आहे हे एकदा सांगावे या आवेगात तिने फोन केला पण तो बोलण्याच्या सोडा ऐकून घेण्याच्या परिस्थित न्हवता. तरी तिने परत परत सांगून पाहिले. तो आवेगच होता. नंतर मन शांत झाल्यावर त्याहून जास्त व्हॉट्स ऍप आणि फेसबुक लाईव्ह करण्याची वेळ गरज संपलेली होती. त्याने तिला गर्भपात करायला सांगितला असता. शी वॉज डन! त्याच्यापासून दूर जायचे पण मुल वाढवायचे हा तिचा निर्णय झालेला होता. ती कधीही त्याला/ परिस्थितीला फार नावे वगैरे ठेवताना दिसली नाही. तिला तिचा फुजी सापडला होता, दिसला होता. समाजासाठी शेजाऱ्याशी लग्न केलं, तो तयार झाला. मुलाला ही सांगेलच वेळ आली की.
आकर्षण, प्रेम, शारीरिक जवळीक वगैरे सीन मराठीत इतके सहज आणि मॅटर ऑफ फॅक्ट दुसरे कुठे आहेत का? किळस न वाटणारे, ते कामुक आहेत, आवेगात आहेत ते तसेच वाटणारे, पण आपल्याला कामुक न वाटू लावणारे! मला आवडले ते सीन. प्रेग्नंसी टेस्ट वाल्या न्यूडिटीची गरज न्हवती. ते का केलं कोण जाणे.
Pages