
आशा भोसले वयाच्या ९२ व्या वर्षी गेल्या. कसं वाटतं ना हे ऐकायला?
साठीला टेकलेली माणसंही चेहऱ्याने आंबट, स्वभावाने कडवट खडूस होत जातात त्या वयात आशा वयाने निम्म्याही नसलेल्या ए आर रहमानचं ‘तनहा तनहा’ गात होत्या. नुसत्या गातच नव्हत्या तर लोकांना वय विसरून तिच्याबरोबर थिरकायला लावत होत्या. महत्वाचं म्हणजे २८ च्या रहमानला हाताशी गायकांची फौज असताना या गाण्यासाठी आशाला बोलवावंसं वाटलं कारण आशा भोसले चिरतरुण होत्या. Age is just a number म्हणवणाऱ्यांना त्यांच्याएवढा चांगला आयकन शोधून सापडणार नाही. कारण त्या नेहमी काळाशी जोडून घेत जगल्या. हौशे, नवशे, गवशे जुन्या गाण्यांचे फ्यूजन करतात म्हणून इतरेजन नाक मुरडत असताना त्यांनी टिच्चून स्वतःच्या गाण्यांचं फ्यूजन गायलं.
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुँए में उड़ाता चला गया
बर्बादियों का सोख मानना फ़िज़ूल था
बर्बादियों का जश्न मनाता चला गया
हे त्यांच्याकडे बघून लिहिलं असेल का असं वाटावंसं जगल्या, वैयक्तिक आयुष्यातील चटके सोसत ज़िंदादिल राहिल्या. संघर्ष
त्यांच्या पाचवीला पुजलेला होता. मास्तर दीनानाथांची मुलगी आणि साक्षात लता मंगेशकरांची छोटी बहीण या ओळखीनिशी
गाण्यात करिअर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. त्या पाय रोवून उभ्या राहिल्या आणि जगाला त्यांची दाखल घ्यायला भाग
पाडलं त्यांनी.
नुसतं गाणंच नाही तर त्यांचा वावरही सुखद असायचा. ९०च्या दशकातल्या त्यांच्या गाण्यांच्या व्हिडिओमधल्या हिरोईन्स आता लक्षात नाहीत. पण आशाच्या साड्या, त्यांचं ते झालरवालं मोत्याचं ब्रेसलेट चांगलंच लक्षात आहेत. स्टेटमेंट ज्यूलरीशी ती पहिली ओळख असावी बहुतेक.
शाळकरी वयात एकदा पुण्यात श्रेयस हॉटेलमध्ये जेवत असताना अचानक नजरा एका दिशेने वळू लागल्या म्हणून पाहिलं तर आशा भोसले आल्या होत्या. कसलीही आढ्यता न बाळगता कौतुकभरल्या नजरांचा सहज स्वीकार करत त्या जेवायला बसल्या. त्यांची ती सुहास्य मुद्रा आणि केसात खोचलेला पिवळा गुलाब काल अगदी पाहिल्यासारखा लक्षात आहे.
लताबाईंचा आवाज सात्विकतेचे मूर्त रूप असेल तर आशाचा आवाज तरुणाईचा होता. तरुणाईला कोण श्रद्धांजली वाहिल? तिचा उत्सव साजरा करायचा असतो तिच्याच गाण्यांतून....
का रे दुरावा का रे अबोला
दुरावा मधला ‘दु’, अबोल्यातला ‘बो’ किंचित खेचलाय कारण तो खुपतोय. ‘अबोला’ शब्दात एक आर्जव आहे. इथे खरं खोटं
करायचं नाहीये तर केवळ दुरावा संपवायचा आहे. ‘नीज येत नाही’ मध्ये एक लाडिक हट्ट आहे. हे गाणं चिरविरहाचं नाही पण सध्या सोबत नाही त्याचं हळवेपण आहे.
तरुण आहे रात्र अजुनी
आयुष्यभरासाठी आशाचं केवळ एकच गाणं ऐकायची शिक्षा मिळाली तर मी हे गाणं निवडेन यापलीकडे काय बोलू?
उषःकाल होता होता
हिंदीत नायिकेची मनस्थिती दर्शवणारी गाणी पुरुषाच्या आवाजात असण्याची उदाहरणे आहेत पण नायकाच्या मनाची स्थिती
दाखवणारे गाणे स्त्रीच्या आवाजात असण्याचे उदाहरण मला तरी फारसे आठवत नाही. निळू फुलेंचा अभिनय आणि 'अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' म्हणणारा आशाचा आवाज एकमेकांना अत्यंत सूट करतो.
भोगले जे दुःख त्याला
सुरेश भटांच्या या गझलेत दुःखाचे कढ नाहीत. एक निमूट स्वीकार आहे आणि आशाबाईंनी तो मॅटर ऑफ फॅक्ट मूड कुठल्याही करामती न करता, ताना पलटे न घेता पकडला आहे.
एका तळ्यात होती
सगळ्या कुरूप बदकांना कधी ना कधी आपलेसे वाटणारे गाणे. चित्रपटातले मूळ गाणे मधुबाला झवेरी यांचे आहे. पण मी
लहानपणापासून आशाताईंचे व्हर्जन ऐकत आले आहे आणि मला तेच आवडते.
पतंग उडवीत होते पतंग शब्दाला जो ठसका दिलाय आशाबाईंनी त्यासाठी मी हे गाणे ऐकते.
फुलले रे क्षण माझे
व्हिडीओ पाहताना झालेल्या मानसिक छळास लेखिका जबाबदार नाही.
रुपेरी वाळूत माडांच्या बनात या गाण्यात जुन्या गाण्यातली आवाजाचा कस लावणारी चाल नाही, कसली शाब्दिक करामत नाही. पण हे गाणं ऐकताना मूड एकदम लाईट होतो आणि यातला 'हाय' तर खासच.
तुम्हाला आशाताईंची कोणती गाणी आवडतात?
खूपच छान लिहले आहे!
खूपच छान लिहले आहे!
अशी असंख्य मराठी हिंदी गीते आहेत.
अजून एक गाणे अॅड करा वर.
जिवलगा राहिले रे दूर घर माझे...
अन्धारच मज हवा - https:/
बुगडी तर हवीच या यादीत - https://youtu.be/GOEJZslEu6I?si=Z14MczsEMzgueOPD
अन्धारच मज हवा - https://youtu.be/RnZLdPK8k_E?si=-v4JwWyY-uV2wUZL
रुपास भाळलो मी - https://youtu.be/qmXHU1m-5SA?si=GRzDEpS9tnc8_-3g
लई तुडुंब भरलंय आज इश्काचं तळं - सोबत उषाही आहे -
https://youtu.be/yhAwzKkN6N4?si=5Xmgoim9qLidpNg3
थकले रे नंदलाला ..
थकले रे नंदलाला ..
या सुखांनो या..
तुला पाहते रे तुला पाहते..
जिवलगा कधी रे येशील तू..
मराठी मध्ये या गाण्यांना तोड नाही
मलमली तारुण्य माझे तू पहाटे
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
आज कुणीतरी यावे
गेले द्यायचे राहूनी
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
तुमुल कोलाहल कलय मे
तुमुल कोलाहल कलय मे
मला एकच गाणे ऐकण्याची, शिक्षा केली तर मी हे गाणे निवडेन - सलोना सा सजन है
रघुपती राघव गजरी गजरी
माझेमन लेख छान झालेला आहे. फा
माझेमन लेख छान झालेला आहे. फा किंवा अमित, अस्मिता यांनीही एक लेख लिहावा.
ये राते ये मौसम नदी का किनारा
ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
नक्षत्रांचे देणे
रुपेरी वाळूत
चंदा राणी
जय शारदे वागीश्वरी
.....
खूप मोठी यादी होईल
आवडती गाणी लिहिले ही शिक्षा
आवडती गाणी लिहिणे ही शिक्षा वाटावी अशी परिस्थिती आहे!
कौन ठगवा नगरिया लूटन हो
मी गाताना गीत तुला लडिवाळा
अंबर की एक पाक सुराई
श्रावणाचं उन्ह मला झ्झेप्पेना (हे लिहितानाच शहारे येतात अंगावर)
खाली हात शाम आई है
बीते ना बीते ना रैना, कोरे है नींद से नैना (रुदाली मधलं)
यु ना थी मुझसे बेरुखि पेहेले
सलोना सा सनज है, और (आ हा!!) मै हु!
मोरे कान्हा हो आए पलटके, अबके होरी मै खेलुंगी डटके
चाहे मार डालो राजा, हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे
बाई मी प तं ग उडवित होते ... हे एंडलेस आहे. हे राहिलं ते राहिलं वाटत रहाणार. आणि खरंच आहे ते.
एंडलेस आहे. हे राहिलं ते
एंडलेस आहे. हे राहिलं ते राहिलं वाटत रहाणार. आणि खरंच आहे ते.>>
+१
तुमच्यावतीने: राधा गवळण करिते मंथन
आशाताईंचा मराठी भावगीतात अमीट
आशाताईंचा मराठी भावगीतात अमीट ठसा दिसतो. पण नाट्यगीते! दीनानाथांची किती नाट्यगीतं त्यांनी पेश केली. ताकदीनं, तयारीनं, जोरकसपणे. वडिलांचा वारसा इरेसरीनं मांडला. असा मांडला, की त्या नाट्यगीतांसाठी सार्वकालीक मापदंड ठरला आहे!
युवती मना दारूण रण रुचिरप्रेयसे
रवि मी, हा चंद्र कसा बघ
विलोपले मधुमीलनात या
परवशता पाश दैवे
शूरा मी वंदिले
आणि किती तरी.
एकेका जॉन्रामधली दहा दहा गाणी
एकेका जॉन्रामधली दहा दहा गाणी लिहायची म्हटलं तरी पंचाईत होईल!
तूर्तास तिची चिरतरुण खेळकर गाणी : किशोरची मॅड एनर्जी तिनेच मॅच करावी!
सी ए टी कॅट - कॅट माने बिल्ली
पाँच रुपय्या बारा आना
मैं बांगाली छोकरा
इना मिना डिका
अच्छा जी मैं हारी
छोड दो आँचल
हाल कैसा है जनाब का
भँवरा बडा नादान
बडे हैं दिल के काले
आये हैं दूर से
मुथुकोडी कव्वारी हडा
भिनी भिनी भोर .. भोर आयी -
भिनी भिनी भोर .. भोर आयी - https://youtu.be/-pQ0EB-7qi8?si=CKrDuL3AFY8hOPSX
कसला लखलखता आवाज लागलाय यात.
घनराणी सांग ना
घनराणी सांग ना
काल मी रघुनंदन पाहिले
चांदणे शिंपीत जाशी
चांदण्यात फिरताना
निगाहें मिलाने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
आये हैं दूर से मिलने हुजूर से
रात अकेली है बुझ गये दिये
तोरा मन दरपन कहलाए
जन्माला आलेला प्रत्येक जण
जन्माला आलेला प्रत्येक जण जाणार हे कटु सत्य आहे. लता आणि आशा दोघींनीही नव्वदी पार केली. ही मोठी गोष्ट आहे.
पण त्या असेपर्यंत कधी लोकांशी डिसकनेक्ट झाल्या नाहीत. लता शेवटच्या काही दिवसात अज्ञातवासात गेल्या, पण कमी कालावधीसाठी. त्यामुळे त्यांचं जाणं चुटपुट लावून गेलं. धक्का नाही बसला. दिलीप कुमार हे अनेक वर्षे अज्ञातवासात आणि नंतर विस्मरणात गेले. त्यांच्या जाण्यानंतर फारशा प्रतिक्रियाही आल्या नाहीत.
उसवून श्वास माझा फसवून रात गेली
आशा भोसले शेवटपर्यंत सक्रीय राहिल्या. त्यांना मरणही धडधाकट असताना आलं. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल वाहिन्या विनाकारण चर्वण करत आहेत. एव्हढी गाणी असताना अशा गोष्टींची गरजच नाही. मागे खूप काही सोडून गेल्यात. सदाबहार गाणी आणि सदाबहार आवाज यातून आशा नेहमीच राहणार आहेत. त्यांच्याच गाण्यातल्या या ओळी आज अर्थहीन झाल्या.
स्मरल्या मला न तेव्हां माझ्याच गीतपंक्ती
शेवटपर्यंत त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती हे दिसलं. त्यामुळं आता हे बदलावं लागेल.
स्मरल्या मला या तेव्हां माझाच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली
रफी, लता , आशा, किशोर, मुकेश, मन्ना डे, हेमंतकुमार हे सुवर्णयुग आता अधि़कृतपणे अस्तंगत झालं.
उरले उरात काही आकाश चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली
श्रेया मधे लता आणि आशा शोधत बसायचं.
खूपच छान लिहीलं आहेस. एवढ्या
खूपच छान लिहीलं आहेस. एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीवर लिहिणे अवघड असते पण तुला ते साधलं आहे.
भरजरी ग पितांबर दिला फाडून खूप आवडत. नातवंडांना ही झोपताना ऐकून ऐकून पाठ झालं आहे.
एकदा आशा भोसलेजींना भेटायचा
एकदा आशा भोसलेजींना भेटायचा योग आला.