बा शहारूख (कसली असहिष्णुता आणिक कसल काय ? )

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

बा शहारूख! कसा आहेस रे? झोकातच असायला हवयस. काही प्रश्नांची उत्तर आपल्याला ठावूक असतात. तरीही आपण ते विचारतो.

साधारण तूझ सिनेमात यायच वय आणि माझ शाळेतून महाविद्यालयात जायच वय, एकदम जूळुन आल बघ. सर्वात पहिल्यांदा तूला पाहील ते टी व्ही वरील 'फौजी' मालीकेत. नाही तसा 'दिलदर्या' मालीकेत होतास तू, पण ते 'असण' असून नसल्यासारख होत. तो रोल काही खास असा नव्हता. खरा भावलास तू तो 'फौजी' मालीकेत. त्यातल्या 'I Say Chap' म्हणणार्‍या सहकलाकारापेक्षा, मोठ्या भावाला ' कबाबमे हड्डी' म्हणणारा किंवा प्रेयसीच्या मांडीवर डोक ठेवून, 'लगता है जन्नत मे हू' अस म्हणणारा 'अभि' आम्हाला अधिक आवडला. त्यानंतर 'सर्कस' मालिकेतला सर्कस मालकाचा (श्री. सूनील शेंडे) यांचा ' Foreign Returned' मूलगा असू दे की 'वागळे की दूनिया' मधला उर्मट तरूण असू दे, तू कायम आवडतच राहीलास. काही माणसांशी तार अगदी लगेच जूळून येते. तसा तू ' अगदी जवळचा' मित्र कधी झालास ते कळलच नाही बघ.

आता सिनेस्रूष्टीला तूझी दखल घेण भागच होत. सुरूवाती-सुरूवातीला तूटपूंज्या भूमिका केल्यास हे खरय, पण ते इथे कोंणालाच चूकलेल नाहीये. दूय्यम नायकांच्या भूमिका तू न कूरकूरता स्वीकारल्यास. मग ते ऋषी कपूर बरोबर ' दिवाना' असू दे की जेकी श्रॉफ बरोबर ' किंग अंकल' असू देत. पण हे फार काळ चालणार नव्हत. तूझा पहिला सोलो पिक्चर ' कभी हा कभी ना' येऊ घातलेला. पण दूर्दैव आमच की त्यावेळेला तूला म्हणे 'Star Value' नव्हती, म्हणून त्या चित्रपटाच वितरण करायला कोणी वितरकच मिळत नव्हता. तेंव्हा यश चोप्रांचा अमिर खानने नाकरलेला आणि तू अगदी कसदार अभिनयाने 'सोन' केलेला 'डर' आला. त्यातही तूला मोजून १० ते १२ सीन आणि २ गाणी (त्यातही एका गाण्यात केवळ तूझा गीटार वाजवणारा हात दिसत रहातो) पण ते तूला पूरेस होत की रे. अशाप्रकारे रोल निभावलास तू की तू चूकीचा आहेस हे प्रेक्षकांना उमजूनही सगळी सहानूभूती तूलाच की रे लेका. त्यात एक सीन आठवतो. नायक सनी देवोल तूझा पाठलाग करतोय आणि तू अगदी जीवाच्या आकांताने धावतोयस. मध्येच एका खांबाला तू आपटतोस. कित्येक प्रेक्षकांबरोबर, मी ही हळहळलोय रे तूझ्यासाठी. (अशाच प्रकारचा एक सीन ऋतीक रोशन अभिनित ' कहो ना प्यार है' मध्ये पाहील्याच स्मरत) खलनायक नायकाला भारी पडल्याच एक उत्तम उदाहरण आहे हे. त्यानंतर ' बाझीगर' अब्बास-मूस्तानचा एक सम्पूर्ण मसाला चित्रपट. त्यात तूला 'अथ' पासून 'इती' पर्यंत अगदी पूर्ण वाव. मग कसला ऐकतोयस तू? त्यात एक आवडलेला प्रसंग म्हणजे खलनायक तूला भेटायला यायचा आधी तूझी lense बेसीन मध्ये पडते आणि तू ती शोधतोस तो. ह्या चित्रपटाचा cliamax कसा विसरता येइल? मी पाहिलेला एक जबरदस्त cliamax सीन होता तो. तूझ्या पोटात दगाबाजीने सळी खूपसून खलनायक हसतोय. आम्ही कववळतोय रे तूझ्यासाठी. आणि अचानक तूझ हसण सूरू होत. खलनायक अचंबीत. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तू त्या सळीच दूसर टोक खलनायकाच्या पोटात खूपसतोस. आता अचंबीत व्ह्यायची पाळी आम्हा प्रेक्षकांची असते. हे केवळ तूझ्यासाठीच आम्हाला खर वाटल. मग कूठेशी तूझी मूलाखत वाचली तूझा 'अंजाम' चित्रपट यायच्या अगोदरची. त्यात तू म्हटलेलस " बाझीगर चित्रपटात माझी २५% टक्के नकारात्मक भूमिका होती. डर चित्रपटात माझी ५०% टक्के नकारात्मक भूमिका होती. तर अंजाम चित्रपटात माझी १०० % नकारात्मक भूमिका आहे" आमच कूतूहल अधिकच चाळावलेल. पण केवळ तू आहेस हे एकम्-एव कारण आम्हाला पूरेस होत की रे चित्रपट पहायला. आणि तो चित्रपट जरी आवडला नाही तरी त्यातल तूझ काम अगदी द्रुष्ट लागण्यासारख होत.

मग आला तो चोप्रा आणि जोहर पटांचा 'सिलसिला'. दिलवाले दूल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कूछ कूछ होता है, मोहब्बते, कभी खूशी कभी गम, वीर झारा.... त्यातला डी डी एल जे आणि मोहब्बते (आचरट पणा वगळून) सोडले तर बाकीचे चित्रपट काही खास नव्हते. त्या चित्रपटात गाणी आणि शहारूख वगळता काहीच नव्हत. पण बघीतले रे आम्ही ते. त्यात आमचा 'शहारूख' होता ना. अगदी आमच घरच कार्य असल्यासारखे बघून घेतले आम्ही ते. माझा एक मित्र तूझे चित्रपट कमीत कमी २५, २७, २९, ३५ ... इतक्या वेळेला बघत असे (म्हणजे बघ आमचा राहूल द्रवीड सध्या ज्या स्कोरला आउट होतो ना तितक्या वेळेला. आणि योगा योगाची गोष्ट म्हणजे माझ्या मित्राने चित्रपट बघण्याचा आणि राहूल द्रवीड बाद होण्याचा काहीही सम्बंध नाही.) असो. तर 'मित्राचा मित्र तो आपला मित्र' ह्या न्यायाने तो माझा अधिकच घनिष्ट मित्र बनला.

तू भूरळ पाडलीस ती ' कभी हा कभी ना', 'राजू बन गया जंटलमन', ' येस बॉस' , ' चलते चलते' , ' स्वदेस' ह्या सारख्या चित्रपटात.. त्यातला ' कभी हा कभी ना' मधला ' सूनील' कसा विसरता येइल रे. अगदी आमच्या ग्रूप मधला कोणी चित्रपटात जाऊन भूमिका साकारतोय अस वाटल आम्हाला. हा चित्रपट कीतीही वेळा बघण्याची तयारी आहे आमची. ' राजू बन गया जंटलमन' 'येस बॉस' हे त्याच पठडीतले म्हणून आवडले रे आम्हाला.

स्वतः च्या होम प्रोडक्शन मध्येही तू प्रयोग करून पाहीलेस. ' फिर भी दिल है हिन्दूस्तानी' असो की 'असोका' की ' पहेली'. त्याबद्दल तूला दाद ही द्यायलाच हवी. मग पून्हा तू नेहेमीची वाट धरलीस ' मै हू ना' , ' ओम शांती ओम' . पण प्रयत्न तर केलास. 'फ्लायींग ओवर कूक्कूज नेस्ट' ह्या एका नितांत सून्दर इंग्रजी पटात नायक एक पाण्याची अवजड टाकी उचलू शकत नाही म्हणून सर्व जण त्याला हसतात. तेंव्हा नायक शांतपणे म्हनतो ' but i have tried' अगदी तसच म्हणावस वाटत 'you have tried mister shaharukh'.

मध्येच आठवतो तो तूझा ' बादशहा' ह्या चित्रपट. त्यात 'james bond' स्टाईल चा गूप्तहेर विनोदी अंगाने उभा करत धमाल उडवलीस तू. त्यातही तू वटवलेला सर्व फिल्मी आंधळ्यांची खिल्ली उडवणारा ' आंधळ्या' चा सिन तर अगदी लाजवाबच. आम्हाला अगदी रमेश मंत्रींच्या 'जनू बांडे' ची आठवण झाली तेंव्हा.

सर्वात शेवटी उल्लेख करावासा वाटतो तो ' कबीर खान' चा. इतका अप्रतिम वटवलायस तू तो. अगदी खराखूरा प्रशिक्षक जणू ( बाय द वे - BCCI ने तूला विचारलय का रे भारतीय क्रिकेट टीम चा प्रशिक्षक होण्याविषयी). अस वाटल की 'फौजी' तला अवखळ ' अभिमन्यू राय' अगदी प्रगल्भ झालाय आणि नव्या रूपात आमच्या समोर उभा ठाकलाय ' कबीर खान' म्हणून . नेहेमीप्रमाणेच 'झोकात'.

समाप्त.
***************************************************************

विषय: 
प्रकार: 

हो ग अगदी म्हणजे अगदीच.

हो! असं मोठ्ठ्याने म्हटलं.... टाईपतानाच. मस्तं वाटलं. आता तुम्ही काय वाट्टेल ते म्हणा. केदार, हे 'झोकात' अगदी खर्र खर्र!

दादला २१ मोदक .....!!!!

शाहरुखचे सगळे सिनेमे नाही बघीतले पण जे बघितले त्यातील कबिर खान is the best!!!! एकदम झोकात... आवडला
yes boss, कभि हा कभी ना सुध्दा खुप आवडले.

केदार, सहीच रे. तुला हवे तेवढे मोदक. east or west, shahrukh is and will remain THE BEST.

कोणी कितीही काहीही बोलूदे त्याच्याबद्दल, तो कायम चमकत रहाणार हे नक्की. खूप छान लिहिलं आहेस. अजून येऊदेत.

केदार मस्त रे !
डिडिएलजे मधे भिषण आवडला होता शाहरूख. कबीर मस्तच. कालच पहेली पाहीला. खूप आवडला.

शाहरूख बद्दल छान लिहिले आहे.

पण "दिल से " कसा काय विसरलात आपण................... मला तर सगळ्यात जास्त (खासकरुन मनिषा आणि त्याचे सीन्स) भावलेली आहे हि फिल्म म्हणुन सान्गितल...........

खर तर हा पाचेक वर्षापूर्वी लिहीलेला लेख आहे. नव्याने वर काढलाय
शहारुख खान / आमीर खान आणि असहिष्णुता अस समीकरण जुळवल की लेख हमखास खपतो म्हणून लेखाच नाव थोडस बदलय इतकच. Wink