स्मृतींची पाऊलवाट
साडेसात दशकांनंतर मागे वळून पाहताना आज,
बरेच काही आठवत नाही
स्मृतींच्या या धुक्यात आता, बरेच काही गवसत नाही
काळाची ही ओढ की, वार्धक्याची ही सावली?
पण एक गोष्ट मात्र, मनी अजूनही रुजलेली
आठवतंय लख्ख मला, गरिबीचे ते दिवस होते
खिसे जरी रिकामे, तरी स्वप्न मात्र श्रीमंत होते
त्या स्वप्नांत होती गाणी, अन साहित्याचा तो सुगंध
काव्याच्या त्या ओळींमध्ये, गवसला होता धुंद छंद.
ठाऊक होतं मला तेव्हा, की शिल्पकार मीच माझा
स्वप्नांना या मूर्त रूप देणारा, मीच एक राजा
निघालो प्रवासाला, अन मग ती सोबतीला आली
तिची अन माझी स्वप्ने, एकरूप होऊन गेली.
मग अंगणात आले ते, चैतन्याचे छोटे अंकुर
मुलांच्या त्या हास्याने, घर झाले सुरांचे मयूर
गाणी आम्ही गायलो एकत्र, साध्या सुखात सामावलो
गोड घास अन् गाण्यांच्या, विश्वात आम्ही रमलो
परदेशातील उंच डोंगर,
स्वदेशातील खळाळते निर्झर,
साद त्या दरीची
मंदिरातल्या घंटांची ती,
लय सात्विक स्वरांची
देश-परदेशाचे सखे लाभले,
त्या मैफिलीत जीव रंगला
बोलीभाषा नव्हे तरीही,
त्यांच्या हृदयीचा भाव उमजला.
मुलांच्या त्या खोड्या अन्,
छोटेखानी ते पराभव
क्षणभंगुर होते सारे,
परंतु ठाऊक होते त्यांचे वैभव
त्यांच्या उत्साहाच्या लाटांवर,
प्रौढत्व स्वार झालं
वयाने जरी वाढलो,
तरी मन मात्र तरुणच राहिलं
इंद्रधनुष्याचे रंग ल्यालेली,
मुलांची जरी वेगळी स्वप्ने होती
आमच्या अन त्यांच्या जगात,
प्रेमाची एकच गुंफण होती
रडलो, हसलो, सावरलो,
एकमेकांत गुंतून गेलो
संकटांच्या वादळातही,
पाय रोवून उभे राहिलो
अखेर आली ती वेळ, निरोप देण्याची
हृदयात साठवलेल्या,
त्या गोड आठवणी सांभाळण्याची
वेदना नव्हती मुळीच त्यात,
ना कुठला खेद होता
देहाने जरी दूर झालो,
तरी आत्म्याचा अभेद्य बंध होता.
कारण ठाऊक आहे मला...
नश्वर या जगा पलिकडे,
आपण आजही एकत्र आहोत
युगायुगांच्या प्रवासात,
आपण एकमेकांचे सोबतीच राहणार आहोत.
खूपच छान !!!
खूपच छान !!!
वाटलं जरी हे साधं, सरळ, सगळं
कळालं तरीही आहे किती हे आगळं II
खूप सकारात्मक कविता रेव्यु.
खूप सकारात्मक कविता रेव्यु. आय विश ७५ व्या वर्षी मी इतकी सकारात्मकता जोपासू शकेन.
वा सुंदर, पुळणीवरुन चालताना
वा सुंदर, पुळणीवरुन चालताना बर्याच वेळाने मागे वळुन पाहिल्यावर जश्या पाऊसखुणा दिसतात तसेच हे स्मरण चित्र. म्हंटलं तर यु री लिव्ह ईट म्हंटलं तर यु जस्ट रिमेंबर इट. बट बोथ वेज इट हॅज टू मेक यु हॅपी!