मास्टर्स (Data Science or AI ) साठी जर्मन scholarship apply कशी करायची?

Submitted by San deep on 23 March, 2026 - 03:07

नमस्कार मायबोलीकर

माझा मुलगा सध्या डेटा science मधून इंजिनीरिंग करतो आहे , मास्टर साठी त्याला जर्मनी ला जायचे आहे , तो इंजिनीरिंग च्या ३ ऱ्या वर्षाला आहे बऱ्याच लोकांच्या सांगण्या नुसार जर्मन पब्लिक युनिव्हर्सिटी ऍडमिशन प्रोसेस आत्ताच करायची आहे. आणि ती मोस्टली पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये आणि scholarship सॊबत. बऱ्याच युनिव्हर्सिटी तिथे फ्री आहेत किंवा फीस पण कमी आहे तिथले living expneses per year १५ लाख आहेत . काही संस्था like DAAD यासाठी मदत करतात. तर मला काही प्रश्न आहेत

१. चौकशी केली असता काही consultancy ही सगळी प्रोसेस करून देतात आप्लिकेशन ची , त्यासाठी मला त्यांनी ६७००० सांगितले , जाला वरती शोधले असता consultant अँपॉईंट करावा कि नाही यावर दुमत आहे, तर please मला यावर proper सल्ला हवा आहे?
२ आणि आताच्या परिस्थिती नुसार scholarship मिळण्याची शक्यता किती आहे.?
३ हि सगळी प्रोसेस आपण स्वतः करू शकतो का ?

आणि जर CONSUTANT अँपॉईंट करायाचाच असेल तर कोणी मला मुंबई मध्ये त्यांचे डिटेल्स देऊ शकता का, ज्याच्याकडून याआधी मुलांना scholarship मिळाली आहे.म्हणजे त्यांचा success rate मास्टर साठी चांगला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत तर नाही माहिती, पण दिल्लीतला कन्स्लटंट आहे. माहितीतले दोघे जर्मनीला गेले आहेत.
त्यांची फीस काहीच नाही. पण लोन करून देणारे सीए १% फीस घेतात. एव्हढाच खर्च.

तुम्हाला तुमच्या प्रयत्नाने जर थेट काम होत असेल तर ते बघा आधी. नाहीतर मग पाठवीन तुम्हाला नंबर.
भरपूर वेळ आहे अजून.

छान. ओळखीतला एजंट मिळल्यास उत्तम.
मला या विषयी काही माहिती नाही.
तुमच्या मुलाला पुढील शिक्षणास शुभेच्छा.

धन्यवाद , मानव जी , रानभुली .

सगळ्यांच्या माहिती नुसार १८ महिने आधी प्रोसेस सुरु करायची आहे, त्यामुळे आम्ही आतापासून शोधात आहोतं , मी वर उल्लेखलेली कन्सल्टन्सी दिल्ली मधलीच आहे. शोध घेतल्यास कन्सल्टन्सी through appear झालेल्या मुलांना कमी प्रेफरेन्स मिळतो, आणि जे individually अँपिअर होतात त्यांना जास्त, खूप
confusion आहे.

तुम्ही वर उल्लेख केलेली मुलं त्याच कन्सल्टन्सी मधून विथ scholarship गेली आहेत का ?

मी स्कॉलरशिप बद्दल काही लिहिले नाही. लोन बद्दल लिहिले आहे. स्कॉलरशिप बद्दल माहिती नाही.

अठरा महीने हे मला माहीत नाही. तुम्हाला जर सर्वानी तसे सांगितले असेल तर त्यांच्या कडे अपडेटेड माहिती असेल. तेच तुम्हाला सांगू शकतील. इथेही अपडेट करा म्हणजे कुणी नंतर विचारले तर त्यांना योग्य ती मदत करता येईल. Happy