Submitted by अनन्त्_यात्री on 20 March, 2026 - 12:07
कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे
छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या स्वप्नभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे
निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरमान तो काफी दिलचस्प है आपके
अरमान तो काफी दिलचस्प है आपके....

पहील्या दोन कडव्यात काल्पनिक
पहील्या दोन कडव्यात काल्पनिक मिथकांची रेलचेल आहे. तिसर्या कडव्यातही दोन मिथके येतात. हंसगानास मिथक म्हणता यावे मला वाटते.
आवडली.
वचने किं दरिद्रता?
वचने किं दरिद्रता?
इंग्रजीत Swan Song म्हणजे
इंग्रजीत Swan Song म्हणजे एखाद्या कलाकाराची, व्यक्तीची, संस्थेची अखेरची कृती. सर्वोत्कृष्ट आणि अंतिम.
ही कविता सुंदर थकव्याची आहे. जगण्याचा नाद नाही असे नाही, पण आता अशक्य गोष्टींचीच इच्छा उरली आहे. विवेक नको, वास्तव नको , फक्त एक क्षणाचे स्वप्न, आणि मग शेवटचे गाणे.
भरपूर लिहावेसे वाटले या कवितेवर. पण कवीचा वरचा प्रतिसाद पाहून लिहावे कि नको असे वाटते. ते बरोबरच आहे.
अवांतर
मधुमागसि माझ्या सख्या परि हे भा रा तांबेंचे हंसगान आहे असे म्हटले तर ?
स्वानंदी१, धनश्री- धन्यवाद.
स्वानंदी१, धनश्री- धन्यवाद.
रानभुली माझ्या प्रतिसादातील sarcasm सोडा, पण तुमचा प्रतिसाद भिडला.
मधु मागसी हे प्रतिभावान तांब्याचं हंसगान आहे असं मला नेहमी वाटतं.