प्रथम तुज पाहता ....

Submitted by सामो on 20 March, 2026 - 11:13

माझी मुलगी आपण होउन, परत भारतवारी करणार आहे. यावेळेस एकटीच गोवा, केरळ, मुंबई, दक्षिणेकडील काही राज्ये. तिची पहीली भारतवारी आमच्याबरोबर २०१९ मध्ये झाली. तेव्हाचा हा अनुभव, मी शब्दबद्ध करुन ठेवलेला होता कारण माझ्याकरता ते अप्रुप होते. तो परत इथे मांडते आहे.
अन्यत्र पूर्वप्रकाशित ...
------------------------------
------------------------------
परदेशी नागरिकत्व मिळूनही, मला भारताबद्दल अतूट प्रेम वाटते, किंबहुना या भूमीवरती पाऊल ठेवले की भरून येते. इथे ना कधी उपरेपणा जाणवला ना जाणवेल. किती का पाश्चात्य संस्कृती अंगवळणी पडलेली असू देत, पण या जागेबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल जो जिव्हाळा वाटतो तो अवीट आहे व तसाच राहील. मुलगी तीन वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत गेलो त्यापश्चात, यावेळेला मुलीबरोबर पहिली भारतवारी केलेली. म्हणजे तिच्याकरता पहिली होती. मला खूप anxiety होती की तिला हि भूमी कशी वाटेल , तिला आवडेल का, ममत्व वाटेल का? अर्थात आवडेल ना आवडेल त्यात मला काहीच say नव्हता, तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक अनुभव होता. पण तरीही!

आणि काय आश्चर्य मुलीला भारत देश पहिल्यांदा पाहूनच , अतिशय आवडून गेला. तिच्याच शब्दात सांगायचे झाले 'तिला surreal वाटले". काहीतरी ओळखीचे पण हातात धरू पाहाताही चिमटीतही ना येणारे, काहीतरी illusive . तिला इथली झाडे, पक्षी , लोक, गर्दी सारे काही आवडून गेले. आणि हे सर्व तिच्या मनात मी काहीही भरविले नसताना. तिला, आपणहोऊन हा जो आपलेपणा वाटला याला काय म्हणावं. आणि तरी अजून तर बेस्ट ऑफ कंट्री yet टु सी. कोकण, केरळ, गोवा, दक्षिणेतील मंदिरे , राजस्थान काहीकाही पाहिलेले नाही.
दर वेळेला इथे आलं की गलबलून येतं. इथे आपलेपणा वाटतो. इथे आपण फक्त ब्लेंडच होत नाही तर I belong here - हे आवर्जून लक्षात येते.
coming बॅक टु रुटस म्हणजे काय हे अनुभवायला, आधी आपली मूळे उखडून, दूर वेगळ्या परक्या वातावरणात स्वतः:ला रुजवावे लागते नंतरच हे सुख अनुभवता येते.
मुलीच्या हृदयाला तिच्या मातृभूमीच्या घातलेली ही साद मला कशी वाटते सांगू. अज्ञेय यांच्या शब्दात -

वह सोने की कनी जो उस अंजलि भर रेत में थी जो
--धो कर अलग करने में--
मुट्ठियों में फिसल कर नदी में बह गई--
(उसी अकाल, अकूल नदी में जिस में से फिर
अंजलि भरेगी
और फिर सोने की कनी फिसल कर बह जाएगी।)
.
काळाच्या प्रवाहात कधीतरी उन्हात चमचमणारी सोन्याची बांगडी हाताला लागते काय आणि हातात धरेधरे स्तोवर ती विखरून परत नदीत विखरून जाते काय. तसे झालेले आहे. उन्हाने लाटांवरती निर्माण केलेली ही बांगडी ना कधी धरता येईल परंतु , एका क्षणी ती तशी illusively का होईना हातात आली, हेही नसे थोडके.

.
हे क्षण नाही धरून ठेवता येणार पण ते तसे निर्माण झाले, अनुभवता आले, हेच इतके मोठे आहे. तिला वाटलेला हा जिव्हाळा, माझ्याकरता, अत्यंत सुखद धक्का आहे. कोणी सांगावे, आमच्या पश्चातही.पुन्हापुन्हा, ती घरट्याकडे झेपावत राहिला. फक्त देशाकडे एक स्थान, ठिकाणं, या दृष्टीने नाही तर मनातील जागा, एका हळवा कोपरा, एक चिंतन, तिची मूळे, तिच्या values म्हणूनही. मी अतिशय आनंदात आहे की तिला एकदा तरी देश दाखवता आला, तिच्याबरोबर तो परत अनुभवता आला.
________________________
२२ डिसेंबर - रात्री ९ ला एकविरा दर्शन झाले. अत्यंत निवांत. कोणीच नाही. फक्त आम्हीच. मनसोक्त वेळ दर्शन घडले.खाली येताना, किर्र काळोख आजूबाजूला पण पायवाटेवरती बंद होत जाणाऱ्या दुकानांचे दिवे. फारच मजा आली. नाना प्रकारची मंगळसुत्रं - माशाचं पदक, माणीकमोत्यांच्या कलाकुसरीची पदके, मोत्याच्या घोसांची पदके. काय काय व्हरायटी. माझ्या मैत्रिणींकरता काही ना काही घेता आले. मग तांब्याचे कडे, गोमेद मणी, कवड्या. मुलीला हे सर्व अनोखे होते, एक्सायटिंग होते. तिने नानाविध एथनिक वस्तू, तिच्या मैत्रिणींकरता घेतल्या. फुलपाखरासारखी भिरभिरत होती मुलगी. एक कवडी विकत घेतली. माझ्या देवघरात ठेवेन बहुतेक.

फार फार संस्मरणिय दिवस होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लज्जागौरी खूप पुर्वी वाचले होते. शंकर पार्वतीच्या विहाराच्या कथा ही छान असतात. पार्वती लोकांच्या दु:खाचे निवारण शंकराच्या मदतीने करत असते.

आवडला लेख.
भारत आवडण्या सारखाच आहे, फक्त जरा गर्दी कमी असली तर... जरा आवाज कमी असला तर... जरा वाहतुकीचे नियम पाळले तर... जरा शिस्त पाळली तर...

लेख आवडला.

जरा शिस्त पाळली तर... ..या सगळ्या यादीत सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची स्वच्छता ही पहिल्या क्रमांकावर येईल.

>>>>>>नेवो, नेते, जड तनुस या दूर देशास दैव
राहे चित्ती प्रिय मम परी मातृभूमी सदैव!
क्या बात है!! सागरा प्राण तळमळला हे आमच्याकडे, आवडते गाणे आहेच.

स्वच्छंदी, अनंत यात्री, शर्मिला, देवकी - खूप आभार.

मुलीने कालच तिकीट बुक केलेले आहे. २ की ३ आठवडे भारतभर फिरणार आहे.