Submitted by विद्याधीश on 18 March, 2026 - 09:22
चाळताना पुस्तकांना वाचणे घडते कुठे?
वाचताना शब्द आशय वेचणे घडते कुठे?
पूर्व पश्चिम धावण्यातच जन्म जातो संपुनी
पाहण्या सूर्यास्त थोडे थांबणे घडते कुठे?
धर्म-जाती-प्रांत-भाषा भेद येती आडवे
माणसाला माणसासम भेटणे घडते कुठे?
चालण्याआधीच येथे लागते धावावया
घरभरी आनंद उधळित, रांगणे घडते कुठे?
वास्तवाचा सूर्य दाहक, तळपतो येथे नभी
रात्रभर स्वप्नांत वेड्या, गुंगणे घडते कुठे?
-विद्याधीश
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर.
खूप सुंदर.