
आज्जीच्या कथा.....
बघता बघता आपण किती मोठे झालो...
आज्जीच्या कथेतल्या पात्रांना,
प्रत्यक्षात पाहु लागलो....
ती जादुची परी म्हणे,
सगळे प्रश्न सोडवायची....
एक छडी फिरवुन,
सारं काही बदलायची....
किती ही दूर असलो आपण,
तरी सहज आपल्याला गाठायची.......
ती जादुची परी म्हणे
सगळे प्रश्न सोडवायची.....
आत्ता दिसते ना आपल्याला ती "आईत",
मोठे प्रश्न सहज सोडवताना ....
थकलेला असलो आपण की,
जादुची छडी फिरवताना.....
ती असते धीर देत,
तीच असते कायम,
आपल्या पाठीशी खंबीर उभी खरी....
नाही वाटत का तुम्हाला,
हीच तर आहे, आपल्या कथेतली जादुची परी...
दुडु दुडु धावणारा ससा ही,
डोकावतो अधनं मधनं आपल्यातच कधीतरी....
जेव्हा जिंकणारच ही बाजी,
असे अतोनात वाटे अंतरी......
पण जिंकलेली बाजी ही
सहज आपण हरतो .......
तेव्हां मात्र, जिंकणारच म्हणून,
वाटेत झोपलेला ससाच, आपल्याला आठवतो......
कधी कधी आपण,
कासव सुद्धा होतो.....
हातात नसलेला डाव,
केवळ प्रयत्नांनी मिळवुन जातो.....
ससा कासव सुद्धा,
आपल्यातच असतात...
आज्जीच्या कथा काही,
काल्पनिक नसतात......
लोकांच्या म्हण्यामुळे,
आपण किती दा, स्वतःलाच कुरूप बदक समझतो..
आपण वेगळे आहोत, कुरूप आहोत,
असं उगाचच नाही का,
स्वतःला आपण ठरवतो.....
लोकांन सारखे,
आपण भले ही नसु...
कदाचित आपण, कुरूप नसून,
राजहंस असु......
खरोखरच आपण,
किती मोठे झालो....
आज्जीच्या कथेतल्या पात्रांना,
प्रत्यक्ष पाहु लागलो...
प्रत्यक्ष पाहु लागलो...
धनश्री प्रभुखानोलकर
छान
छान