जंबुकेश्वर मंदिर - जल तत्व
जंबुकेश्वर (Jambukeswarar) मंदिर हे दक्षिण भारतातील अत्यंत प्राचीन शिवमंदिर असून ते पंचमहाभूतांपैकी ‘जल तत्व’ दर्शवणारे मंदिर मानले जाते. हे मंदिर तिरुचिरापल्ली जवळील तिरुवनैकवल येथे कावेरी नदीच्या बेटावर आहे.
मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चोला साम्राज्याच्या काळात झाली. साधारण इ.स. दुसरे शतक ते इ.स. नववे शतक या काळात मंदिराची मोठी वाढ झाली. चोला राजघराण्याने मुख्य मंदिर बांधल्याचे मानले जाते.
मंदिराशी संबंधित प्रसिद्ध कथा अशी आहे की पार्वती देवीने येथे गुरु म्हणून शिवाकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपस्या केली. ती जांभूळ (Jambu) वृक्षाखाली मातीचा शिवलिंग बनवून पूजा करत होती. त्या शिवलिंगाखाली नैसर्गिक पाण्याचा झरा निर्माण झाला. म्हणून शिवाला येथे जंबुकेश्वर म्हणतात.
दुसरी हत्ती आणि कोळी कथा अशी आहे की एक हत्ती रोज शिवलिंगावर पाणी अर्पण करत असे. एक कोळी शिवलिंगावर जाळे विणून संरक्षण करत असे. दोघांमधील संघर्षात दोघेही मृत्यूमुखी पडले. म्हणून स्थानाचे नाव पडले तिरुवनैकवल
मंदिर द्रविड (Dravidian) स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे पाच प्राकार (भिंतींचे स्तर), सात मोठे गोपुरम (प्रवेशद्वार मनोरे), मोठे मंडप आणि स्तंभ आहेत. प्राकार रचना आहे. मंदिरात पाच भिंतींचे वर्तुळ (prakara) आहेत.
ही रचना काही अभ्यासकांच्या मते पंचकोश किंवा मानवी शरीराच्या स्तरांचे प्रतीक मानली जाते.
बाहेरील भिंत - भौतिक जग
आतले स्तर - आध्यात्मिक प्रवास
गर्भगृह - परम चेतना
जंबुकेश्वर मंदिर जल तत्वाचे प्रतीक मानले जाते.
मंदिरातील शिवलिंगाखाली कायम पाणी असते तसेच गर्भगृहात लहान झरा सतत वाहत असतो, उन्हाळ्यातही पाणी कमी होत नाही.
हे जल तत्वाचे प्रतिकात्मक रूप मानले जाते ही मंदिरातील सर्वात अद्भुत वैशिष्ट्य आहेत.
जंबुकेश्वर मंदिर - जल तत्व
Submitted by अविनाश जोशी on 6 March, 2026 - 05:58
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसिद्ध श्रीरंगम मंदिरापासून
प्रसिद्ध श्रीरंगम मंदिरापासून फक्त तीन किमी अंतरावर आहे. दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. आतमध्ये खूप सुंदर मूर्ती आहेत. पण फोटो काढायला बंदी आहे.