माझे आवडते सदर
नमस्कार मंडळी, सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
आपण सगळे मराठी वर्तमानपत्रे वाचतोच, नव्हे काही जणांच्या तर सकाळच्या आन्हिका मधील वर्तमानपत्र वाचन हा एक प्रमुख घटक असतो. आताशा बरेच जण ऑनलाईन वर्तमानपत्रे सुद्धा वाचतात पण तरीही बऱ्यापैकी मराठी घरांत अजूनही एखादे तरी छापील वर्तमानपत्र येतेच आणि ते नियमित वाचले जाते. तर या वर्तमानपत्रात तुमचे आवडते सदर कोणते? याविषयी इथे लिहूया.
लहानपणी मला सकाळ मधील चिंटू आवडायचा. त्यानंतर शाळेच्या वयात लोकसत्तेत "गाथा बलिदानाची" नावाचे एक सदर चालू झाले होते. त्याची कात्रणे जमवून मग एक वही केली होती आणि त्यासाठी प्रशस्तीपत्रक सुद्धा मिळाले होते. त्यावर अरुण टिकेकरांची लफ्फेदार सही होती. त्यानंतर दररोज येणारे विविध "कुतूहल" सदरातील लेख.
त्यावेळी नुकतेच चालू झालेल्या "दहावीचा अभ्यास" या सदराखाली येणारे अभ्यासाचे लेख सुद्धा खूप भारी असायचे. शनिवार रविवारच्या पुरवणीतील लेख सुद्धा विविध विषयांवर असायचे आणि तितकेच वाचनीय असायचे. त्यातून बरीच माहिती मिळायची.
आमच्या घरी लोकसत्ता यायचा/ येतो. त्यामुळे त्यातल्या चतुरंग, लोकरंग (लोकमुद्रा), वास्तुरंग अशा पुरवण्यांत बरेच दर्जेदार लेख यायचे.
वर्तमानपत्रांतील अशाच काही दर्जेदार आणि लोकप्रिय सदरांचे तर पुढे पुस्तकात रूपांतर होते. तर अशी कोणती सदरे आहेत जी तुम्हाला खूप आवडली होती किंवा अजूनही आवडतात.
त्याबद्दल इथे नक्की लिहा.
लोकरंग, चतुरंग पुरवण्या
लोकरंग, चतुरंग पुरवण्या आठवणीने वाचायचे. पण सर्वात जास्त आवडायचे ते सकाळमध्ये ब्रिटिश नंदी लिखित ढिंगटांग नावाचे एक सदर. आता सुरु आहे की नाही माहीत नाही. जनरल टॉपिक्सवर खुमासदार व्यंग असायचे. त्यातले काही लेख/काव्य सेव्ह करून ठेवले होते. सापडले तर इथे पोस्ट करू का काही नमुने?
लोकरंग / चतुरंग पुरवण्या आधी
लोकरंग / चतुरंग पुरवण्या आधी नियमित वाचत असे. हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतावर एक सदर येत असे त्याची कात्रणं जमा करून पुन:पुन्हा वाचत असे. सदराचे नाव काही आठवत नाही.
अशोक जैन यांचे “राजधानीतून” मटात यायचे. ते वाचणे नियमित असे.
मोहसीना मुकादम फार छान, नियमित लिहित. तंबी दुराई, ब्रिटिश नंदी हे आवडीचे.
मराठी वृत्तपत्रीय वाचन आता नि:संशय कमी झाले आहे.
लोकरंग / चतुरंग पुरवण्या आधी
दु. प्र.
तंबी दुराई, 2 फुल 1 हाफ.
तंबी दुराई, 2 फुल 1 हाफ. लोकसत्तेत लोकरंग रविवार पुरवणी.
खूप सदरं वाचली लोकसत्ता मधे.
शुभदा चौकर लिहायच्या ते वाचलं खूप.
मग सोनाली कुलकर्णी (सिनिअर) चं सोकुल, डॉक्टर गिरीश ओक- चिवित्र, नीना कुळकर्णी- अंतरंग ( आणि मग दोघांनी मिळून केलेला एकत्रित अभिवाचनाचा प्रयोग), अच्युत गोडबोले - अर्थात (अर्थशास्त्र) आणि गाण्याबद्दल एक असायचं ते.
राजीव तांबे मुलांसाठी लिहायचे.
अजून एक 'हार्ट टु हार्ट ' म्हणून असायचं लोकरंग मधे.
वानप्रस्थ आईचं आवडतं.
अनुदिनी दिलीप प्रभावळकर.
आठवतील तशी भर घालते.
माझे आवडते सदर - सकाळ -
माझे आवडते सदर - सकाळ - मुक्तपीठ
चतुरंग पुरवणी आवडते.
चतुरंग पुरवणी आवडते.
रोज अग्रलेखा बरोबरच वाचकांची पत्रे वाचायला आवडतात.
पण सर्वात जास्त आवडायचे ते
पण सर्वात जास्त आवडायचे ते सकाळमध्ये ब्रिटिश नंदी लिखित ढिंगटांग नावाचे एक सदर. आता सुरु आहे की नाही माहीत नाही.
नवीन Submitted by माझेमन on 27 February, 2026 - 12:46
ढिंग टांग अजूनही सुरु आहे,
मी सकाळ पेपर फक्त ढिंग टांग साठीच घेतो
त्यातले काही लेख/काव्य सेव्ह
त्यातले काही लेख/काव्य सेव्ह करून ठेवले होते. सापडले तर इथे पोस्ट करू का काही नमुने?>>>>> माझेमन नक्की टाका.
मोहसिना मुकादम फार छान, नियमित लिहित.>>>> हो नुकतीच त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना सांगितलं की पुन्हा लिहायला घ्या नियमित सदर.
अविनाश बिनीवाले यांचे पण सदर छान होते
अरुणा ढेरे एक "जुना जमाना" नावाचे एक सदर लिहायच्या.
"विशी तिशी आणि चाळीशी" हे सदर सुद्धा भारी होतं.
आणखी आठवलं की लिहितो.
आमच्याकडे सकाळ यायचा / येतो.
आमच्याकडे सकाळ यायचा / येतो. त्यात शाळेत असताना चिंटू सदर येत असे. ते फारच लोकप्रिय होते त्यावेळी. शाळेत जाण्याआधी ते वाचून च जात असू. मग शाळेत जाताना आजचं चिंटू मस्त होतं ना अशा गप्पा. अजून एक लोकप्रिय सदर म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार. ह्यात काहीही पत्रे येत. पण ती वाचायला जाम मज्जा यायची. संपादकीय पण उत्तम असे. नंतर सकाळने लोकरंग अशी गुरुवारची पुरवणी काढली बॉलीवुड बातम्या साठी. सकाळच्या मुपी ने तर किती आनंद दिला, सर्वोत्तम विनोदी सदर ते असावे. सकाळच्या चित्रपट आणि नाटकांच्या जाहिरातीचे पान सुद्धा फार आवडायचे एके काळी. शब्दकोडी पण आवडायची. लोकसत्ता, मटा कधीच आपले वाटले नाहीत.
टाइम्स ऑफ इंडिया आठवीत असताना चालू केला. फारच आवडायचा. शनिवारी पण मोठी पुरवणी निघत असे त्यांची. आणि रविवारचा संडे टाईम्स तर मस्त असे. त्यांचे संपादकीय पण भारी होते. टाइम्स मुळे वीरकर डिक्शनरी आणली गेली. वाचताना खूप वेळा उघडावी लागे. शब्दसंग्रह चांगला झाला त्यामुळे.
@ सकाळ मुक्तपीठ
@ सकाळ मुक्तपीठ
दैनिक सकाळच्या मुक्तपीठने इतिहास रचला तो त्या सदरातल्या लेखांमुळे नाही तर त्यावरच्या वाचकांच्या प्रतिसादांमुळे. आणि ते बहुतेक online आवृतीतच असत.
मला मुक्तपीठ-शोध खूप उशिरा लागला “लुनावाले ब्रम्हे” वाचून.
अपार आनंद दिलाय लेखांवरच्या प्रतिसादांनी.
Fabulous, hilarious content.
हा एक नमुना सकाळ मधील ब्रिटीश
हा एक नमुना सकाळ मधील ब्रिटीश नंदी लिखीत "ढिंग टांग सदरामधून साभार. प्रसंग सांगण्याची गरज लागणार नाही.
प्राचीन पिंपळावरती, पक्ष्यांची गजबज होते
कंठात कोवळ्या ताना, भरवाया पक्षीण येते
घरट्यातच फडफड करते, रोजचे अनन्वित जगणे
स्मरणातील संध्याकाळी, हे काळोखाचे गाणे
जरि क्लांत लोचनी केव्हा, अस्वस्थ साकळे नीज
धडधडत्या हृदयी माझ्या, मग विव्हळती आवाज
विसरून वेदना सारी, अन वांझ तिला समजून
छेडित बसतो आता, ही काळोखाची धून...
माझ्याच दुश्मनी लाटा, माझेही फितुर किनारे
गाफील समुद्रावरती, कपटाचे मोसमी वारे
नि:शंक परतणीच्या वेळी, गर्दीत गारदी घुसला
जगण्याचा रामभरोसा, तेव्हाच तोडला...तुटला!
पंखांची फडफड झाली, हा कर्दम रक्तपिसांचा
सस्त्यात लावला कोणी, हा वाटा कलेवरांचा
ती क्रूर लावसट खाते, रस्त्यावर उचलून प्रेते
खदखदा हासते, गाते, भेसूर भयानक गीते
जगण्याचा पिंपळ होता...हे जीवित पिंपळपान
मौनातच जगणे त्याचे- गळणे, हेच इमान
तो पिंपळ वठला वठला, ही मुळे निघाली खोल
वैराण उन्हाच्या पोटी, असतेच नेहमी ओल
या महातरूच्या ठायी, बीज खडकावर रुजण्याचे
पुन्हा पुन्हा मरण्याचे, अन पुन्हा पुन्हा जगण्याचे
चारित्र्य असे वृक्षाचे, संहिता चिवट गोंदाची
बुंध्याशी विस्तव होता, वर स्वप्ने नवगेंदांची
महातरू तो होता, मग फुटला पुन्हा भराने
बहराची पहाटगाणी, सृजनाची नवीन स्वप्ने
भयभीत पालवी केव्हा, मौनात बोलते काही
मरणाच्या शंभर वाटा, जगण्याला फांदी नाही...
प्राचीन पिंपळावरती, मग गजबज झाली थोडी
पुनःश्च फांदीवरती, चोचीत घेऊनि काडी
शेजारील घरट्यामधला मग पक्षी बोलला होता,
"मोठ्याशा वृक्षावरती, छोटाच हादसा होता...‘
इथे विषय मराठी वृत्तपत्रांतील
इथे विषय मराठी वृत्तपत्रांतील सदरांचा आहे म्हणून “द हिन्दू” च्या विशेष पुरवण्या आणि त्यातील सदरांचा उल्लेख केला नाही.
त्यांच्यासारखे उत्तम लेखक आणि कसदार कंटेंट वर्षानुवर्षे मिळवणे अजिबात सोपे नाही.
माझेमन, २६/११ ना?
माझेमन, २६/११ ना?
छान धागा. आधीही असा एक धागा होता का?
अच्युत गोडबोल्यांच्या संगीतविषयक सदराचा वर अनेकांनी उल्लेख केला आहे, ते सदर बहुतेक 'नादवेध'. सुलभा पिशवीकर (त्यांची बहीण) यांच्याबरोबर ते हे सदर लिहायचे. अच्युत गोडबोल्यांचं 'किमयागार' हे सदर मला आवडायचं, पण नंतर ते पुस्तकाच्या स्वरूपात वाचायला कंटाळवाणं वाटलं.
राणी दुर्वे चतुरंगमध्ये 'शेजार' नावाचं सदर लिहायच्या, ते मला आवडायचं. प्रकाश बाळ यांचं 'झोत' सदर आवडायचं. अजून आठवतील तसतशी लिहीन.
२६/११ ना? हो.
२६/११ ना? हो.
ब्रिटिश नंदी म्हणजे प्रविण
ब्रिटिश नंदी म्हणजे प्रविण टोकेकर. ते लोकप्रभेचे संपादक होते तेव्हा मी इंजिनिअरिंगला कराडला होतो(२००९- २०१३). लोकप्रभेचा अंक तेव्हा इतका दर्जेदार निघायचा कि दर शुक्रवारी घेतलाच जायचा.
महाराष्ट्र टाईम्स मधले "धावते
महाराष्ट्र टाईम्स मधले "धावते जग" मला खूप आवडायचे . ते सदर कोण चालवायचे ते माहिती नाही.
मायबोलीवरचे अनिद्य , चिनूक्स यांचे लेख वाचून "धावते जग" पुन्हा वाचायला मिळाले असे वाटते
आमच्याकडे कायम सकाळच येतो/
आमच्याकडे कायम सकाळच येतो/ आहे. सकाळ मधील चिंटू , ब्रिटिश नंदी यांचे ढिग टांग , उत्तम कांबळे यांचे फिरस्ती , दिलीप प्रभावळकर यांचे अनुदिनी ही लगेच आठवलेली सदरे. सप्तरंग मधील सुनंदन लेले यांचे क्रिकेट विषयक सदर पण वाचनीय असते.
@ अजय,
@ अजय,
मटात दि.वि. गोखले चालवायचे “धावते जग” असे आताच बाबांनी सांगितले. ते नियमित वाचत, मी वाचल्याचे आठवत नाही.
पण ते सदर छान असावे आणि मला compliment मिळालीय असे गृहित धरतो, थँक्यू म्हणतो.
चिनूक्स यांच्या लेखनाचा चाहता तर मी आहेच.
कलंदर या नावाने अशोक जैन
कलंदर या नावाने अशोक जैन मटामध्ये कानोकानी नावाचे सदर लिहायचे. भारी सटायर असे.
मी म टा प्रेमी होते. आता
मी म टा प्रेमी होते. आता पेपर अजिबात वाचत नाही म्हणून भूतकाळ (कधी बंद करेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण अति पेपर वाचन ते पेपर तसाच कोरा न उघडता रहाणे असा प्रवास आहे माझा, खरंतर हे कटू सत्य आहे, लिहायला जड जातंय).
म टा ने खूप काही दिलं, समृद्ध केलं.
फिरोज रानडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, अशोक जैन, रविप्रकाश कुलकर्णी, कमलाकर नाडकर्णी, मोहसीना मुकादम, संजीव साबडे, मुकेश माचकर, प्रकाश अकोलेकर. अजून अनेक जण.
प्रत्येक महिन्यात दर रविवारी एक गेस्ट लेखक म्हणून सदर सुरू केलेले त्यात श्री विलासराव देशमुख, कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं, हे दोघे प्रामुख्याने आठवतायेत. कृष्णमेघ कुंटे यांचं वाचल्यावर त्यांचं 'एका रानवेड्याची शोधयात्रा' पुस्तक वाचावं असं खूप वाटलं आणि ते पुस्तक वाचलं, फार आवडलं.
ललित लेख, आयफेल टॉवर, सिनेमाविषय हे जास्त आवडायचं. चित्रपश्चिमा हे सदर परदेशी चित्रपटांची ओळख करून देणारे होतं. बाबा संपादकीय वाच सांगायचे, मला कंटाळा यायचा.
मला बऱ्याच सदरांची नावंच आठवत नाहीयेत खरंतर पण काही लेख अगदी आठवतात.
फिरोज रानडे आधी दिल्लीहून मग काबूलहून लिहायचे. दुर्गाबाई भागवत वेगवेगळ्या पाककलेबद्दल लिहायच्या, हटके असायची माहिती. मोहसीना मुकादमही पाककला, त्याचा इतिहास वगैरे लिहायच्या.
कॉमन मॅन कार्टूनही मस्त मार्मिक होतं, आर के लक्ष्मण यांचं.
लेखाचा छान विषय..
लेखाचा छान विषय..
सकाळ मध्ये एक साप्ताहिक पुस्तिका यायची तेव्हा तिचे खूप अंक संकलित करून ठेवले होते, त्यात गोष्टी, कोडी आणि अजून खूप काही असायचं. त्यांचं नाव काही केल्या आठवत नाहीये.
तसंच आमच्या आजोबांकडे लोकसत्ता यायचा तेव्हा, त्यामुळे चतुरंग आणि लोकरंग खूप वाचायचे. या पुरवणी प्रेमामुळे लग्नानंतर आपण लोकसत्ता लावायचाच हे ठरवले होते तसे आता नियमित हाच घेतो.
क्रिकेटविषयी एक सदर द्वारकानाथ संझगिरी चालवायचे ते आठवते, तसेच सोकुल आणि चिवित्र सुद्धा चांगले आठवते.
सध्या गिरिजा ओक चे फाफटपसारा आवडीने वाचते. मृदुला भाटकर यांचे सदर पण खूप मस्त होते, त्यांच्या व्यवसायातील आठवणी बद्दल(आधी वकील मग न्यायाधीश).
आठवतील तसे लिहीन.
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचन
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचन म्हणजे आता भूतकाळ झालाय.
सुरुवातीला मटा यायचा.
त्यातील r.k लक्ष्मण यांचं काय बोललात ( you said it TOI) व्यंगचित्र बघणं व्हायचं.
धावत जग आवडायचं -
ते आवडायला लागलं त्याचं कारणही मजेशीर होतं.
एका नेत्याने कुठल्यातरी मोहिमे अन्तर्गत बहुदा स्वच्छता, शाळेतल्या मुलांना रांगेत बसावे आणि पाण्याच्या नळीने फवाऱ्यासारखे सगळ्यांना धुवून टाकले.
वाचून खूपच मौज वाटलेली.
हा नेता म्हणजे लालू प्रसाद ( नंतर त्याची अजून ओळख झाली)
दुसरी त्यातच लक्षात राहिलेला किस्सा
एक कोणी नेता खूप तळमळीने खोट बोलू नये यासारखं काही बोलत होता. त्याच नाव बिजू पटनाईक. मी तेव्हा फार प्रभावित झाले.
नंतर कळलं हा खोट बोलण्यात पटाईत असलेला होता..
राजकारण आणि राजकारणी यांची ओळख व्हायला बहुदा इथून सुरुवात झाली असावी.
नाटकाच्या/ सिनेमाच्या जाहिराती नित्य बघितल्या जायच्या.
शेवटून २ रे विद्न्यान वृत्त यायचे (आठवड्यातून एक दिवस (?)) , अर्थकारणाचे पान सोमवारी की शुक्रवारी (?) यायचेवते वाचले जायचे.
पुढे मटाने रंगीत पाने मुंबई / ठाणे वृतांत द्यायला सुरुवात केली.
सो कुल हा सोनाली कुलकर्णीचा कॉलम आवडायचा ( मटा की लोकसत्ता ही नाही आठवत).
लोकरंग पेक्षा चतुरंग आवडायची.. वेळ नाही मिळाला तर आठवड्याभरात वेळ मिळेल तशी वाचून संपवायची.
अनिल बर्वे, शुभदा चौकर, राजीव तांबे ही नावे ही आठवतायत.
बहुतांशी रोज सुडोकू सोडवल जायचं.
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचन
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचन म्हणजे आता भूतकाळ झालाय.
सुरुवातीला मटा यायचा.
त्यातील r.k लक्ष्मण यांचं काय बोललात ( you said it TOI) व्यंगचित्र बघणं व्हायचं.
धावत जग आवडायचं -
ते आवडायला लागलं त्याचं कारणही मजेशीर होतं.
एका नेत्याने कुठल्यातरी मोहिमे अन्तर्गत बहुदा स्वच्छता, शाळेतल्या मुलांना रांगेत बसावे आणि पाण्याच्या नळीने फवाऱ्यासारखे सगळ्यांना धुवून टाकले.
वाचून खूपच मौज वाटलेली.
हा नेता म्हणजे लालू प्रसाद ( नंतर त्याची अजून ओळख झाली)
दुसरी त्यातच लक्षात राहिलेला किस्सा
एक कोणी नेता खूप तळमळीने खोट बोलू नये यासारखं काही बोलत होता. त्याच नाव बिजू पटनाईक. मी तेव्हा फार प्रभावित झाले.
नंतर कळलं हा खोट बोलण्यात पटाईत असलेला होता..
राजकारण आणि राजकारणी यांची ओळख व्हायला बहुदा इथून सुरुवात झाली असावी.
नाटकाच्या/ सिनेमाच्या जाहिराती नित्य बघितल्या जायच्या.
शेवटून २ रे विद्न्यान वृत्त यायचे (आठवड्यातून एक दिवस (?)) , अर्थकारणाचे पान सोमवारी की शुक्रवारी (?) यायचेवते वाचले जायचे.
पुढे मटाने रंगीत पाने मुंबई / ठाणे वृतांत द्यायला सुरुवात केली.
सो कुल हा सोनाली कुलकर्णीचा कॉलम आवडायचा ( मटा की लोकसत्ता ही नाही आठवत).
लोकरंग पेक्षा चतुरंग आवडायची.. वेळ नाही मिळाला तर आठवड्याभरात वेळ मिळेल तशी वाचून संपवायची.
अनिल बर्वे, शुभदा चौकर, राजीव तांबे ही नावे ही आठवतायत.
बहुतांशी रोज सुडोकू सोडवल जायचं.
एकावर थांबता येणार नाही. मी
एकावर थांबता येणार नाही. मी लोकसत्ता वाचक. जी नावे वर आली नाहीत, तीच लिहितो. खूप जुन्या सदरांत शं ना नवरेंचं आठवतंय. अरुण टिकेकर, लता राजे, माधव गडकरी ही नावं आठवताहेत. त्यांची सदरं आठवत नाहीत. शिरीष कणेकरांचं डोळे हे फिल्मी गडे लोकसत्तेतच वाचलंय.
मग थोडं नंतरच्या काळात अशोक नायगावकर ( जयवंत दळवींच्या अलाणे फलाणेसारखं - त्यांची ती शाकाहारातला हिंसाचार ही कविता यातच वाचली होती) , मंगला गोडबोले यांचं मराठीबद्दलचं , शैलजा शेवडे यांचं विनोदी अशी सदरं आठवतात.
रवी आमलेंचं प्रचारतंत्राबद्दलचं सदर. मानसिक आरोग्याबद्दलचं एक सदर असे. त्या प्रत्येक लेखातली काही ना काही लक्षणं आपल्यात आहेत, असं वाटायचं :D.
त्यांची भारतविद्या यात ब्रिटिश अमदानीत त्या लोकांनी रचलेला भारताच्या माहितीचा पाया - शब्दकोश , नकाशे, इ. त्यांची भारतविद्या असं शीर्षक होतं बहुतेक.
गेल्या वर्षातले - आनंद नाडकर्णी , अंधश्रद्धा- बुवाबाजीत अडकलेल्या स्त्रियांच्या सुटका करणार्या लेखिका, कालगणनेबद्दलचं एक सदर. गिरीश कुबेरांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे आणि त्यांच्या युरोप दौर्यात पाहिलेल्या वेगळ्या गावांबद्दलचं .
ज्यांचे आईवडील आता वृद्ध होत आहेत त्यांनी मेधा कुलकर्णींचं सदर आवर्जून वाचा. ते वाचताना Been there done that असं होतं.
रविवारचे पेपर आले की इंडियन एक्स्प्रेसमधल्या तवलीन सिंग यांच्या कॉलमवरून नजर फिरवली की दिवसाची सुरुवात हसरी होते.