Submitted by Meghvalli on 26 February, 2026 - 04:34

दुःखाच्या सागरात सांज आयुष्याची होती,
चांदण्यांची चमचम, चंद्राची शीतलता होती।
झोपेच्या बिछान्याची जरी पोत काटेरी होती,
न कसलीच टोच होती, मनात शांतता होती।
सुखदुःखाची काहीच न चिंता होती,
संवेदना बोथट झाल्या, एक विरक्ती होती।
मला उधळण्यास जरी वादळांची दाटी होती,
डोक्यात तरीही एक निबिड शून्यता होती।
डोळे बंद होते, फक्त स्पंदनाची धडधड होती,
आयुष्याच्या क्षणांची गोळाबेरीज चालली होती।
बाहेरून मला किती स्वप्न खुणावत होती,
मी बधलो नाही त्यांना, जगण्यात निवृत्ती होती।
गुरुवार, २६/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
निबिड* अर्थात घनदाट. चूका दाखविण्याचा उद्देश नाही. पण निर्बिड असा शब्द बाही.
छान कविता. प्रगल्भ आशय.
छान कविता.
प्रगल्भ आशय.
छान !
छान !